AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही, नमो निर्माण सेना, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचलं

महाराष्ट्राच्या शत्रूंना राज्यात पाय ठेवायला देऊ नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. आता अचानक असा काय चमत्कार , साक्षात्कार झाला हे राज ठाकरेंनाच विचारावं लागेल. अचानक पलटी मारून ते आता महाराष्ट्राच्या शत्रूंना सपोर्ट करत आहेत. आता जनतेला काय उत्तर द्याल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही, नमो निर्माण सेना, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचलं
| Updated on: Apr 10, 2024 | 11:19 AM
Share

महाराष्ट्राच्या शत्रूंना राज्यात पाय ठेवायला देऊ नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. आता अचानक असा काय चमत्कार , साक्षात्कार झाला हे राज ठाकरेंनाच विचारावं लागेल. अचानक पलटी मारून ते आता महाराष्ट्राच्या शत्रूंना सपोर्ट करत आहेत. आता जनतेला काय उत्तर द्याल ? राज ठाकरेंची अशी कोणती फाईल उघडली आहे ? असा सवाल विचारत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

नवनिर्माण सेनेचा नमो पक्ष का झाला ?

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राची अक्षरश: लूट सुरू आहे, खोक्याचं अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आहेत. राज्यातून उद्योग पळवला जातोय, मुंबई तोडण्याचा, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला जो पक्ष आहे, तोच महाराष्ट्राच्या दुश्मनांना, शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका उत्पन होतात. त्याचीच उत्तर त्यांना (राज ठाकरे) त्यांना द्यावी लागतील.

असं काय घडलं की तुम्ही राज्याच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात, असा प्रश्न लोकं त्यांना विचारतील. तुमचा जो ‘नवनिर्माण पक्ष’ आहे त्याचा ‘नमो निर्माण पक्ष’ का झाला ? त्याची का गरज पडली ? हे राज ठाकरेंनी सांगितलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

आम्ही शरणागती पत्करणार नाही

आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी लढत आहोत. समोर नरेंद्र मोदी असोत की अमित शाह,आम्ही शरणगती पत्करणार नाही , असेही राऊत यांनी नमूद केले. आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपसोबत राहिलो नाही. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी,प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळात ही युती केली होती. ती २५ वर्ष चालली. पण भाजपने जेव्हा त्यांचे खरे दात दाखवायला सुरूवात केली, तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आमची स्वतंत्र भूमिका घेतली असे राऊत यांनी स्पष्ट केलं. जर कुणी महाराष्ट्रावर घाव घालणार असेल तर आम्ही एकत्र येऊन असे राऊत म्हणाले.

तुम्ही त्या ओवाळू टाकलेल्या नेत्यांपैकी एक आहात का ?

राजकीय व्यभिचार कशाला म्हणतात ? हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून समजून घेतल पाहिजे. आम्ही सगळे प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार मानणारे आहेत. ते (राज ठाकरे ) प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहेत. राजकारणातून ओवाळून टाकलेले नेते आणि व्यभीचारी यांना भाजपाने आपल्याकडे घेतले आहे. त्यातील हे एक हे महाशय (राज ठाकरे) आहेत का नमो निर्माण वाले ?

पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्यभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात वॉशिंगमशीन मध्ये घेऊन साफ करण हा व्यभिचार नाही का ? त्याच व्यासपीठावर पाय ठेवला असेल तर राज ठाकरेंना लोकांना उत्तर द्याव लागेल, असं राऊत म्हणाले.

अजित पवार, हसन मुश्रीफ अशी अनेक नावं आहेत ज्यांनी बिनशर्त भाजपसोबत जायचं मान्य केलं. ते का गेले कोणाच्या दबावामुळे गेले हे सर्वांना माहीत आहे . मला असं वाटत नाही त्यांचं (राज ठाकरे) असं झालं असेल. पण शरणागती त्यांनी यासाठी पत्करली की त्यांच्या अनेक फाइली उघडल्या गेल्या, धमक्या दिल्या. म्हणून मला असं वाटतं व्यभीचार हा भाजपचा जगजाहीर आहे. अशा व्याभीचारी पार्टी बरोबर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.

आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो. ठाकरे हे असं नाव आहे त्यांना कोणी झुकवू शकत नाही . उद्धव ठाकरेंना झुकविण्याचा प्रयत्न झाला ते झुकले नाहीत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला आणि तुटलो नाही. त्यांच्याशी लढत आहोत, असं राऊत म्हणाले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.