आता कोर्टात रंगणार शाखेचा सामना, मुंब्रा प्रकरणात कायदेशीर लढाई

Udhav Thackeray High Court | हायहोल्टेज ड्रामानंतर मुंब्रा शाखेचा वाद आता हायकोर्टात रंगणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शनिवारी संध्याकाळी ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी शक्तीप्रदर्शन केले. तर पोलिसांची शिष्टाई कामी आल्याने वाद चिघळला नाही. मात्र मुंब्र्यातील शाखेच्या वादाचे पडसाद लवकरच दिसतील, असा राजकीय विश्लेषकांचा सूर आहे.

आता कोर्टात रंगणार शाखेचा सामना, मुंब्रा प्रकरणात कायदेशीर लढाई
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 9:27 AM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेचा हायहोल्टेज ड्रामा शनिवारी संध्याकाळी उभ्या महाराष्ट्राने पाहिला. काल दुपारपासूनच या वादाचे पडसाद ठाणे आणि मुंबईत दिसत होते. ऐन दिवाळीत पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी शाखेच्या ठिकाणी गर्दी केली होती. तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पण किल्ला लढवला. यामध्ये पोलिसांची शिष्टाई कामाला आली. मोठा वाद उफळला नाही. आता या वादावर उद्धव ठाकरे गट कायदेशीर सामना करण्याच्या तयारीत आहे. शाखेचा वाद लवकरच हायकोर्टात पोहचणार आहे. ठाकरे गट याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

वादाचे  कारण काय

भांडणाचे निमित्त ठरली ती मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा. गेल्या आठवड्यात मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा अतिक्रमणचा आरोपाखाली पाडण्यात आली. त्यानंतर शनिवारी उद्धव ठाकरे मुंब्र्यात आले. शाखा पाडल्यानंतरच उद्धव ठाकरेंनी आपण मुंब्र्याला शाखेची पाहणी करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावली.

हे सुद्धा वाचा

अगोदर नोटीस, मग माघार

उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर प्रचंड दबाव होता. उद्धव ठाकरेंना शाखा परिसरात येण्यास मनाई केल्याने वाद चिघळला. उद्धन ठाकरेंना कमल 144 ची नोटीस बजावण्यात आली आणि थोड्याच वेळात पोलिसांनी ही नोटीस मागे घेतली. उद्धव ठाकरे शनिवारी संध्याकाळी मुंब्र्यात दाखल झाले.

मुंब्र्याला छावणीचे स्वरुप

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनुचीत प्रकार टाळावा यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली. मुंब्र्यात 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. संपूर्ण मुंब्रा शहराला छावणीचं स्वरुप आलं होतं. दोन्ही गटाचं कार्यकर्ते जमल्यानंतर वातावरण अधिकच स्फोटक झालं. त्यात उद्धव ठाकरे शाखा परिसरात आल्यानंतर सर्वांचीच धाकधूक वाढली होती.

पोलिसांची शिष्टाई आली कामी

उद्धव ठाकरे पाडलेल्या शाखेच्या पाहणीसाठी पुढे आले. त्यावेळी याठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. शाखेच्या 10 मीटर अंतरावर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत उद्धव ठाकरे यांना पुढे जाता येणार नाही, असं सांगितलं. यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पोलिसांना समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी स्वत: पोलिसांची समजूत काढण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण पोलीस ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे 10 मीटर लांबूनच उद्धव ठाकरे यांना शाखेची पाहणी केली आणि ते परतले. सर्वांनीच निःश्वास सोडला.

Non Stop LIVE Update
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.