AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dina Patil: बाप फुटला, मुलगी का फुटली नाही? मोठं कारण आलं समोर, थेट मनसेच्या नेत्याचा दावा; संजय दिना पाटलांची वेगळी चाल?

Sanjay Patil-Rajol Patil Shiv Sena: उद्धव सेनेचे खासदार संजय दिना पाटील हे शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. पण त्यांची मुलगी राजुल पाटील यांनी मात्र आपण उद्धव सेनेसोबतच असल्याचे सांगितले. त्या काल परवा मातोश्रीवर पण येऊन गेल्या. पण त्या वडीलांमागे शिंदे सेनेत का गेल्या नाहीत, याविषयी मनसे नेत्यानं मोठा दावा केला आहे.

Sanjay Dina Patil: बाप फुटला, मुलगी का फुटली नाही? मोठं कारण आलं समोर, थेट मनसेच्या नेत्याचा दावा; संजय दिना पाटलांची वेगळी चाल?
संजय पाटील, राजुल पाटील
| Updated on: Jun 23, 2026 | 2:33 PM
Share

Sanjay Patil-Rajol Patil Shiv Sena: उद्धव सेनेला सहा खासदारांनी सुरूंग लावला. दुसर्‍यांदा उद्धव सेना फुटली. सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेनंतर शिंदे सेनेत विलिनीकरणाचा निर्णय घेतला. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदे सेना जवळ केली असली तरी त्यांची मुलगी आणि नगरसेविका राजुल पाटील या मात्र वडीलांसोबत शिंदे सेनेत गेल्या नाहीत. त्या का फुटल्या नाहीत, याविषयी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी गोटातील बातमी दिली आहे. काय आहे किल्लेदार यांचा दावा?

राजुल पाटील यांना दिलेली जागा चुकीचीच

खासदार फुटीनंतर मनसेतूनही महापालिका निवडणूकीत झालेल्या जागावाटपावरुन नाराजीचा सूर आळवला. संजय दिना पाटील यांची मुलगी राजुल पाटील यांना महापालिका निवडणूकीत भांडुपला दिलेली जागा ही चूकीचीच ठरल्याचा सूर मनसेच्या बैठकीत समोर आला. ती जागा मनसेचीच होती. मनसेकडून अनिषा माजगांवकर निवडून आल्या असत्या असा दावा पक्षाने केला आहे.

महापालिकेत ऑपरेशन टायगर नाही

दर महिन्याला मनसे नगरसेवकांची आढावा बैठक होते. मनसेचा ठसा महापालिका कामकाजात दिसला पाहिजे. विरोधी पक्षांना अल्प निधी दिला जात आहे. सगळे प्रश्न उभे असतांना तोडफोड राजकारण सुरू आहे. मात्र महापालिकेत ऑपरेशन टायगर होणार असल्याचा खोटा दावा केला जातोय; असं आजिबात वातावरण नाही. महापालिकेत असा प्रयत्न केला गेला तरी यशस्वी होणार नाही. खासदारांमुळे आत्मविश्वास वाढला असला तरी महापालिकेत यश मिळणार नाही, असा दावा यशवंत किल्लेदार यांनी केला.

राजुल पाटील शिंदे सेनेत का गेल्या नाहीत?

मुंबई महापालिका निवडणुकीवेळी खासदार संजय दिना पाटलांनी स्वत:च्या मुलीसाठी या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. संजय दिना पाटील खोटं बोलत आहेत, असे मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले. आता वडीलांच्या पाठोपाठ राजुल पाटील जर एकट्या बाहेर पडल्या तर त्या अपात्र ठरतील. त्यामुळेच त्या वडीलांच्या पाठोपाठ शिंदे शिवसेनेत गेल्या नसल्याचा दावा यशवंत किल्लेदार यांनी केला. जिथे संजय दिना पाटलांची मुलगी राजोल पाटील निवडून आल्या ती जागा आमचीच होती. अनिषा माजगांवकर जर अपक्ष राहून चांगली मतं घेतात तर त्या ठिकाणी नक्कीच निवडून आल्या असत्या, असा दावा किल्लेदार यांनी केला आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!