AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षण : 29 नोव्हेंबरला सरकार सभागृहात थेट विधेयक मांडणार

समीर भिसे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार 29 नोव्हेंबर 2018 रोजी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ‘टीव्ही 9 मराठी’ला यासंदर्भात माहिती दिली. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये सरकारतर्फे मराठा आरक्षणासाठीचं विधेयक मांडणार आहे. सध्या विधीतज्ज्ञांकडून विधेयक बनवण्याचे काम सुरु […]

मराठा आरक्षण : 29 नोव्हेंबरला सरकार सभागृहात थेट विधेयक मांडणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

समीर भिसे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार 29 नोव्हेंबर 2018 रोजी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ‘टीव्ही 9 मराठी’ला यासंदर्भात माहिती दिली. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये सरकारतर्फे मराठा आरक्षणासाठीचं विधेयक मांडणार आहे. सध्या विधीतज्ज्ञांकडून विधेयक बनवण्याचे काम सुरु आहे.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 19 नोव्हेंबरपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे 20 नोव्हेंबरपासूनच विरोधकांनी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेला मराठा आरक्षणावरील अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडण्याची मागणी सुद्धा विरोधकांकडून केली जात आहे. विशेषत: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तर मराठा आरक्षणाचा अहवाल पटलावर मांडण्याची जोरदार मागणी सभागृहात केली.

मराठा ‘संवाद’ यात्रेआधी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून ‘मुस्कटदाबी’

राज्य सरकारकडून मात्र सातत्याने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण दिले जाईल, तसेच मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत, एवढेच सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा अहवाल मात्र राज्य सरकारकडून सभागृहात मांडण्यात येत नाही. त्यावरुन अधिवेशन सुरु झाल्यापासून सभागृहात विरोधकांनी जोरदार मागणी करत, सरकारला जेरीस आणलं आहे.

अखेर राज्य सरकारने 29 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षणासदंर्भात थेट विधेयक आणण्याचे ठरवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. आता मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विरोधकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड