Uddhav Thackeray: गद्दारांना भेटायला पंतप्रधानांना वेळ, मात्र… उद्धव ठाकरे यांनी सोटाच हाती घेतला
Uddhav Thackeray criticized to PM Narendra Modi: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका केली. जंतरमंतरवर CJP आंदोलन झाले, त्याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना थेट सवाल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत नुकताच IIT च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. जंतरमंतरवर CJP आंदोलनात देशातील हजारो विद्यार्थी उतरले. 35 दिवस दिल्लीत आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची आठवण काढत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. त्यांनी अनेक मुद्यांना हात घालत मोदी सरकारवर तोफ डागली. त्यांनी मोदी हे नवीन स्वामी झालेत का? असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांशी संवाद न साधल्याबद्दल जळजळीत प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसने इतक्या शिव्याकधीच खाल्ल्या नाहीत
जे काँग्रेस वर्षात ६० वर्षात ते यांनी करून दाखवलं. काँग्रेसने एवढ्या शिव्या कधीच खाल्ल्या नव्हत्या. त्या मोदी आणि शाहांच्या वाट्याला आल्या आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तरुणांना भेटायला वेळ नाही. ते गद्दारांना भेटत आहे, असा सोटाच त्यांनी फिरवला. शाह सेना स्थापन करणाऱ्या गद्दार पंतप्रधानांना भेटले. त्यांना भेटायला मोदींना वेळ आहे. शाह सेनेचे प्रमुख अमित शाह मुंबईत होते. त्यांचं गद्दाराने स्वागत केलं आहे, अशी खरमरीत टीका ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांवर केली.
मोदी नवीन स्वामी झालेत का?
मोदींनी गद्दारांना सांगितलं. स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठिशी. तसं मोदी नवे स्वामी झाले का. तरुणाई त्यांची निंदा नालस्ती करते. पण मोदी महाशय गद्दारांना सांगते भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. गद्दारांना चिंता कशाची आहे. वॉशिंग मशीनमध्ये गेले. पण गद्दारीचा डाग काही जात नाही हे वार उद्धव ठाकरे यांनी केला. देशातील तरुण न्याय हक्कासाठी आंदोलन करताना तुम्ही त्यांना भेटत नाही. बेशरमपणे गद्दारांना नुसते भेटत नाही. तर मी तुमच्या पाठिशी आहे असं बेशरमपणे सांगतात. त्यांनी तरुणांना भाऊ, आजोबा फ्रेंड्स म्हणून भिऊ नका मी तुमच्या पाठिशी आहे हे सांगायला पाहिजे होतं, असे ठाकरे म्हणाले.
इन्स्टा लाईव्हवरून सरकारला घेरले
कोरोना काळात उद्धव ठाकरे हे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते फेसबुकवरून सरकार चालवत असल्याची टीका विरोधक करत होते. तर शिवसेना फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी यावरून त्यांच्यावर सतत निशाणा साधला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवरून तरुणाईशी संवाद साधला. तोच अचूक धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी आता मोदी हे इन्स्टावरून देश चालवत आहेत, असे म्हणाल का? असा जबरी टोला हाणला.