Smart Wallet : स्मार्ट वॉच, स्मार्टफोननंतर आता स्मार्ट वॉलेटचा आविष्कार पाहा, चोरी होण्याचा प्रश्‍नच नाही

या आधुनिक काळात आपण अनेक स्मार्ट प्रोडक्ट वापरली, पाहिली किंवा ऐकली तरी नक्कीच असतील. परंतु तुम्ही कधी स्मार्ट वॉलेट वापरले आहे का? जर तुम्ही विसरभोळे असाल अन्‌ तुमच्या रोजच्या वापरातील सामान वारंवार विसरण्याची तुम्हाला सवय असेल तर तुमची सोय झालीच म्हणून समजा... कारण या लेखात सांगण्यात आलेले प्रोडक्ट अशा लोकांसाठी खूप कामाचे ठरणार आहे.

Smart Wallet : स्मार्ट वॉच, स्मार्टफोननंतर आता स्मार्ट वॉलेटचा आविष्कार पाहा, चोरी होण्याचा प्रश्‍नच नाही
स्मार्टफोननंतर आता स्मार्ट वॉलेटचा आविष्कार पाहाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 11:29 PM

स्मार्टफोनसह इतर अनेक स्मार्ट उत्पादनांनी (smart products) सर्वसामान्य लोकांचे आयुष्यच बदलून गेले आहे. दररोज नवनवीन प्रोडक्टची आपल्या जीवनात एंट्री होत असते. यात एक चांगली गोष्ट म्हणजे नवीन प्रोडक्स देखील आता स्मार्ट झालेली आहेत. जर तुम्ही तुमच्या वस्तू वारंवार विसरत असाल तर आम्ही तुम्हाला या लेखातून एक नवीन प्रोडक्टची ओळख करुन देणार आहोत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्मार्ट वॉलेटला चांगलीच मागणी वाढली आहे. चोरीच्या (Theft) घटना रोखण्यासाठी अन्‌ विसरभोळ्या लोकांसाठी हे प्रोडक्ट अतिशय उपयुक्त आहे. परंतु आता अनेकांच्या मनात असा विचार येउ शकतो, की वॉलेटमध्ये काय स्मार्ट असू शकते, या सर्वांचीच उत्तरे या लेखातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.या सोबतच स्मार्ट वॉलेटची (smart wallet) किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.

स्मार्ट वॉलेट कसं काम करत?

हे स्मार्ट वॉलेट टॅग 8 ब्रँडिंगचे असून इतरही ब्रँड या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. युजर्सना या टॅग 8 मध्ये ब्लूटूथ सपोर्ट उपलब्ध आहे. यामध्ये सेप्टेशन अलर्ट, जीपीएस सपोर्ट, अँटी थेफ्ट आदी फीचर्स उपलब्ध आहेत. या फीचर्सचा वापर करण्यासाठी युजर्सना डॉल्फिन ट्रॅकर अॅप डाउनलोड करावे लागेल. हे अॅप iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

काय आहेत फीचर्स ?

ब्रँडच्या दाव्यानुसार, वॉलेटमध्ये ब्लूटूथ ट्रॅकर आणि अँटी लॉस्ट अलार्म सिस्टम आहे. या फीचर्सच्या कामासाठी वॉलेटमध्येच बॅटरी बसविण्यात येत असते. दरम्यान, आपण ही बॅटरी बदलू शकत नाही. यातील बॅटरी 36 महिन्यांपर्यंत टिकू शकते, असा दावा केला जात आहे. प्रोडक्टमधील ब्लूटूथ रेंज 250 फूटांपर्यंत असून युजर्स डिव्‍हाइस रेंजच्‍या बाहेर असल्‍यावर सेपरेशन अलार्म वाजायला सुरुवात होते.

लोकेशन ट्रॅकर

संबंधित स्मार्ट वॉलेट GPS सिस्टीमसह उपलब्ध आहे. वॉलेट हरवल्यास युजर्स अॅपच्या मदतीने त्याचे लोकेशन ट्रॅक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हरवलेले स्मार्ट वॉलेट सहज परत मिळवू शकता. डिव्हाइस तुमच्या रेंजच्या बाहेर जाताच, तुमच्या फोनवर सेपरेशन अलार्म वाजतो. यामध्ये यूजर्सना कम्युनिटी सर्चचा पर्यायही मिळेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हे प्रोडक्ट Amazon वर 2199 रुपयांना उपलब्ध असून ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर त्याची किंमत 2499 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.