DJ चा बँडबाजा वाजवणारे विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; उदय सामंतांकडून सत्कार, 22 वर्षांपूर्वीच्या फोटोने इंटरनेटवर जिंकली मने!
Vidyanand Bapat Uday Samant: DJ चा बँडबाजा वाजवणारे विद्यानंद बापट यांना जनमाणसातून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांच्या तर्कनिष्ठ आणि तत्वनिष्ठ विचारांनी भल्याभल्यांना घाम फोडला. डीजेच्या दणदणाटाला आणि गोंधळाला राज्यातील अनेक शहरात चपराक बसली. आता विद्यानंद बापट यांचा लहानपणीचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

पुण्यासह राज्यात DJ चा बोऱ्या वाजवणारे विद्यानंद बापट राज्यात व्हायरलच झाले नाही तर त्यांनी समाजासमोर एक आदर्शही घालून दिला. त्यांच्या एका कृतीने सण, उत्सवाचे पावित्र्य जपलेच नाही तर ध्वनी प्रदूषणालाही आळा बसला. अनेक शहरातील डीजे दणदणाट आणि गोंधळ थांबला. अबालवृद्धांना दिलासा मिळाला. सणउत्सवाच्या नावाखालील सुरू असलेल्या वाह्यातपणाला चपराक बसली. विद्यानंद बापट हे त्यांच्या मराठी आणि तर्कनिष्ठ विचारांनी सुद्धा चर्चेत आले. रत्नागिरीच्या मातीतील या विचारवंताने अनेकांना तत्वनिष्ठेच्या आखाड्यात लोळवले. बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी लोकांवर गारूड घातले. विद्यानंद बापट हे लहानपणापासूनच कुशाग्र असल्याचे समोर आले आहे. त्यांचा लहानपणाचा एक खास आणि जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यानंद बापट हे लहानपणापासूनच तल्लख बुद्धिमत्तेचे धनी आणि अभ्यासू असल्याचे त्यावरून समोर आले आहे. 22 वर्षांपूर्वीच्या त्या फोटोची नेटकऱ्यांनी दखल घेतली आहे.
उदय सामंतांकडून विद्यानंद बापटांचा गुणगौरव
सध्या इंटरनेटवर, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. राज्याचे तत्कालीन नेतृत्व आणि आताचे विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विद्यानंद बापट यांचा 22 वर्षांपूर्वी गुणगौरव करण्यात आला. रत्नागिरीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात विद्यानंद बापट यांना सामंतांनी कौतुकाची थाप दिली. शैक्षणिक आणि अष्टपैलू कामगिरीनिमित्त त्यांचा सत्कार केला आणि मानचिन्ह दिले. आदर्श युवक भारत या कार्यक्रमात हा कौतुक सोहळा जवळपास दोन तपापूर्वी रंगला. 2004 साली एका कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रवादीत असलेले सध्या शिंदे सेनेचे तडफदार शिलेदार उदय सामंत यांच्या हस्ते बापटांचा गौरव करण्यात आला होता. रत्नागिरी तालुक्यातील गोळप पंचशीलनगरमध्ये हा कार्यक्रम झाला होता.
22 वर्षांपूर्वीच्या कौतुक सोहळ्याला उजाळा
हा व्हायरल फोटो 22 वर्षांपूर्वीचा आहे. तत्कालीन उगवते नेतृत्व आणि विद्यामान मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विद्यानंद बापट यांचा गुणगौरव करण्यात आला. सत्कार करण्यात आल्याचे या फोटोतून स्पष्ट होते. हा फोटो सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक जण विद्यानंद बापट यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभ्यासू वृत्ती आणि तर्कनिष्ठपणा त्यांनी लहानपणापासूनच जपल्याचे दिसते.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ज्यांच्यात कर्तृत्व असेत त्यांच्या गुणांची ओळख बालपणीच होते अशा आशयाच्या कमेंट्सचा पाऊस सध्या युझर्स करत आहेत. अनेकांनी या फोटोवरून विद्यानंद बापट यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. तर उदय सामंत यांनी स्थानिक गुणवंत तरुणांना प्रोत्साहन देण्याची परंपरा जपल्याचेही अनेक जण सांगत आहेत. हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
