AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election : मातोश्रीची रणनिती ठरली, मुंबई जिंकण्यासाठी ते 12 जण स्पेशल मिशनवर, काय आहे प्लान?

BMC Election : आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने विशेष रणनिती आखली आहे. ठाकरे गटाने पक्षातील 12 जणांवर खास जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरे गटासाठी एकप्रकारे ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे त्यांना विशेष आखणी करुनच पुढे जावं लागणार आहे.

BMC Election : मातोश्रीची रणनिती ठरली, मुंबई जिंकण्यासाठी ते 12 जण स्पेशल मिशनवर, काय आहे प्लान?
| Updated on: Jun 11, 2025 | 12:16 PM
Share

महाराष्ट्रात पुढच्या तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाच्या असतात. कारण या निवडणुका म्हणजे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. कार्यकर्ते घडवण्याबरोबर पक्षाची संघटनात्मक बांधणी भक्कम करता येते. म्हणून या निवडणुका सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत.

या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं. यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेसाठी प्रतिष्ठेची आहे. दोन्ही ठाकरे बंधुंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. कारण दोन्ही ठाकरेंचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटल्याच विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं होतं. आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने विशेष रणनिती आखली आहे.

त्यांच्यावर काय जबाबदारी असेल?

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुंबईतील उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून महानगर पालिकेच्या तयारीला आधीपासूनच सुरवात झाली आहे. यानंतर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटाकडून मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलं आहे. उपनेत्यांनी मतदार संघात जाऊन आढावा बैठका, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे. काल राज्य सरकारच्या वतीने प्रभागासंदर्भात शासन निर्णय काढला असून ठाकरे गटाच्या वतीने पालिकेची तयारी केली जात आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 वॉर्ड आहेत.

विधानसभानिहाय उपनेत्यांवर देण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

1. अमोल कीर्तीकर – दहिसर, बोरिवली, मागाठाणे

2. उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम

3. विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व

4. विश्वासराव नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम

5. रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम

6. गुरुनाथ खोत -, चांदिवली, कलीना, कुर्ला

7. नितीन नांदगावकर – विक्रोळी, भांडुप, मुलुंड

8. सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द

9. मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा

10. अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा

11. अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी

12. सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.