LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

[svt-event title=”पुनर्वसन वस्तीला आग, 85 घरांची राखरांगोळी” date=”19/05/2019,12:05PM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्ह्यात सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागली आहे. ही घटना आज (19 मे) सकाळी 10 वा. तिवसामधील वळगाव पुनर्वसन लोक वस्तीत घडली आहे. या आगीत 85 घरं जळून खाक झाली आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी” date=”19/05/2019,11:25AM” class=”svt-cd-green” ] मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहनाच्यां धीम्या गतीमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. बोअरघाटात दत्तवाडी ते अम्रुतांजन ब्रिजपर्यंत ही कोडीं आहे. मुबंईहून पुण्याकडे जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने एक्सप्रेस वे वर वाहनांच्या तीन किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत.  [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात पोलीस पाटील पदासाठी चुलत भावावर गोळीबार” date=”19/05/2019,11:14AM” class=”svt-cd-green” ] पोलीस पाटील पदासाठी चुलत भावावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथे घडली. या घटनेत गोळीबारात जखमी झालेल्या महादवे पाटील याचा मृत्यू झाला आहे. सरपंच पिंटू उर्फ अण्णाराव पाटील असं आरोपीचं नाव आहे. [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या” date=”19/05/2019,10:39AM” class=”svt-cd-green” ] राज्यात आत्महत्येचं सत्र सुरुचं आहे. जालन्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून 30 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. गावातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना अंबड तालुक्यातील कुरण परीसरात घडली. तात्यासाहेब भाऊसाहेब थोरात असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे [/svt-event]

[svt-event title=”नक्षलवाद्यांकडून गडचिरोली बंदची हाक” date=”19/05/2019,10:35AM” class=”svt-cd-green” ] नक्षलवाद्यांकडून गडचिरोली बंदची हाक देण्यात आली आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर झाडे तोडून मार्ग बंद केला आहे. काही ठिकाणी पत्रके आणि बॅनर लावून रस्ते बंद केले आहेत. बससेवेसह इतर वाहतूकही बंद करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम बंगाल येथे बॉम्बस्फोट” date=”19/05/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. ही घटना मथुरापूरमधील रायडिगी परिसरात घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरु असून या मतदान दरम्यान हा स्फोट झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरमध्ये भीषण अपघात, दोन वर्षाच्या बाळाचा जागीच मृत्यू” date=”19/05/2019,8:57AM” class=”svt-cd-green” ] सांगली-कोल्हापूर हायवेवर हातकणंगले गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सकाळी 7 च्या सुमारास घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये दोन वर्षीय बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे.[/svt-event]

[svt-event title=”मोदी गुहेतून बाहेर” date=”19/05/2019,8:03AM” class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकीचे अंतिम टप्प्यात मतदान सुरु आहे. आज (19 मे) 59 जागांवर लोकसभा मतदान पार पडणार आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या गुहेत ध्यानधारणा करत होते. काल (18 मे) मोदी ध्यानधारणेसाठी बसले होते. आज सकाळी मोदींची ध्यानधारणा संपली आणि ते गुहेतून बाहेर आले. यानंतर मोदी बद्रीनाथ येथे दर्शनासाठी जाणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी-चिंचवडमध्ये फ्रिज कॉम्प्रेसरमधील गॅस लिकेजमुळे आग” date=”19/05/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवडमध्ये फ्रिज कॉम्प्रेसरमधील गॅस लिकेजमुळे आग लागली आहे. ही घटना कासारवाडी येथे घडली आहे. कासारवाडीमधील सागर हाईट्स इमारतीमधील पाचव्या मजल्यावर ही आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI