NIA प्रमुख अनिल शुक्लांची तडकाफडकी बदली, हसन मुश्रीफांकडून संशय व्यक्त

NIA प्रमुख अनिल शुक्लांची तडकाफडकी बदली, हसन मुश्रीफांकडून संशय व्यक्त
NIA प्रमुख अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली

NIA प्रमुख अनिल शुक्ला यांच्या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात असून, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संशय व्यक्त केलाय.

सागर जोशी

|

Apr 12, 2021 | 11:26 PM

मुंबई : मुकेश अंबानी धमकी प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावणारे NIAचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करण्यात आली आहे. शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी सुरु होती. आतापर्यंत अनेक आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यात सचिन वाझे, विनायक शिंदे, रियाझ काझी यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत शुक्ला यांच्या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात असून, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संशय व्यक्त केलाय. (Transfer of NIA chief Anil Shukla, Hasan Mushrif Questions to Central Government)

NIAचे प्रमुख अनिल शुक्ला यांची बंदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलीय. अनिल शुक्ला हे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांना 6 वर्षे पूर्ण झाली होती. या संपूर्ण प्रकरणापूर्वीच शुक्ला यांची बदली होणार होती. पण त्यांना काही काळ मुदतवाढ दिली गेली होती. पण आता त्यांची अचानक बदली करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. दरम्यान, त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

हसन मुश्रीफांचा सवाल

NIA चे प्रमुख अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली करण्यामागे कारण काय? असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे. या बदलीची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केलीय. शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केलं हे केंद्राला मान्य नसावं. परमबीर सिंग माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत, याची आज खात्री झाली, अशा शब्दात मुश्रीफ यांनी अनिल शुक्ला यांच्या बदलीबाबत संशय व्यक्त करत भाजपवर टीका केलीय.

अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आता आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या कुंदन आणि पालांडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. सीबीआयने रविवारी या दोघांचे जबाब नोंदवले. त्यामुळे आता या चौकशीतून सीबीआयच्या हाती कोणती माहिती लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली होती. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि डीसीपी राजू पाटील यांना 100 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिली होती. प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: CBIकडून झाडाझडतीला सुरुवात; अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

Transfer of NIA chief Anil Shukla, Hasan Mushrif Questions to Central Government

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें