मोठी बातमी: CBIकडून झाडाझडतीला सुरुवात; अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

मोठी बातमी: CBIकडून झाडाझडतीला सुरुवात; अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स
अनिल देशमुख

प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. | Anil Deshmukh CBI

Rohit Dhamnaskar

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 12, 2021 | 12:28 AM

मुंबई: राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आता आपला मोर्चा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे वळवला आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या कुंदन आणि पालांडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. सीबीआय रविवारी या दोघांचे जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे आता या चौकशीतून सीबीआयच्या हाती कोणती माहिती लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (CBI summons Anil Deshmukh PA for probe in Parambir singh matter)

सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली होती. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि डीसीपी राजू पाटील यांना 100 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिली होती. प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे आता पालांडे सीबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर याबाबत काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबईतील बारमालक तपासाच्या फेऱ्यात

परमबीर सिंह यांच्या आरोपासंदर्भात सीबीआयकडून सुरु असलेल्या चौकशीत आता बोरिवलीतील एका बार मालकाचे नाव समोर आले आहे. एनआयएने मागील आठवड्यात गिरगाव भागात टाकलेल्या धाडीत एक डायरी सापडली होती. त्या डायरीत विविध प्रकारचे आकडे लिहिण्यात आले होते. आकड्यांसह महेश शेट्टी या व्यक्तीचे नाव आढळले. हे आकडे खंडणीचे असून शेट्टीचा त्या खंडणीशी संबंध असल्याचा सीबीआयचा संशय आहे. त्यानुसार सीबीआयने शेट्टीबाबत तपास सुरू केला आहे.

अनिल देशमुखांचा बचाव करण्यास असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरद पवार नाराज

परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करण्यात असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर शरद पवार (Sharad Pawar) प्रचंड नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची बाजू व्यवस्थितपणे मांडली नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा डागाळली होती. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज झाले आहेत. (Sharad Pawar is not happy with NCP leaders over Anil Deshmukh matter)

या संपूर्ण प्रकरणात शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन अनिल देशमुख यांची बाजू मांडली होती. परमबीर सिंह यांनी आयुक्तपद गेल्यानंतर हे आरोप केले आहेत. ते दिल्लीत जाऊन आल्यानंतर त्यांनी पत्र लिहले. या एकूण गोष्टी संशयास्पद असल्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र, शरद पवार वगळता राष्ट्रवादीचा एकही नेता असा मुद्देसूद प्रतिवाद करु शकला नव्हता. त्यामुळे शरद पवार नेत्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे समजते.

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh: सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीत; ‘या’ बड्या वकिलाची भेट

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

अनिल देशमुखप्रकरणात पहिल्यांदाच शरद पवारांचं नाव, अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या, भलेही तुम्ही मोठे मराठा नेते असाल

(CBI summons Anil Deshmukh PA for probe in Parambir singh matter)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें