Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लोकसभेचे दाखले, विधानसभेचे आकडे, पुण्यामध्ये महायुती-मविआचे हेवे-दावे

लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झालीय. लोकसभेचा निकाल काय सांगतो. त्यावरुन विधानसभेचे कसे आडाखे बांधले जात आहेत. पुणे जिल्ह्याचा पाहा हा एक स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लोकसभेचे दाखले, विधानसभेचे आकडे, पुण्यामध्ये महायुती-मविआचे हेवे-दावे
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 11:36 PM

लोकसभेनंतर विधानसभेचे वेध लागलेत, पुणे जिल्ह्यात युती आणि आघाडी दोन्हीकडून दावेदारीही सुरु झालीय. पुणे लोकसभेचा विचार केल्यास त्यात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोनमेंट आणि कसबा पेठ या विधानसभांचा समावेश येतो. पुणे जिल्हा पकडला तर त्यात खडकवासला आणि हडपसर या दोन अशा ८ विधानसभा येतात.

पाहा व्हिडीओ:-

या घडीला ८ विधानसभांपैकी वडगाव शेरीत अजितदादा गटाचे सुनिल टिंगरे आमदार आहेत. शिवाजीनगरमध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, कोथरुडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील, पर्वतीत भाजपच्या माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोनमेंटमध्ये भाजपचे सुनिल कांबळे, कसब्यात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर, खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर आणि हडपसरमध्ये अजितदादा गटाचे चेतन तुपे आमदार आहेत. म्हणजे 8 पैकी कसबा मतदारसंघ सोडल्यास इतर ७ मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत.

2019 च्या विधानसभेत आघाडीत ८ पैकी 4 जागा राष्ट्रवादी लढली. 3 जागी काँग्रेसनं उमेदवार दिले., तर कोथरुडमध्ये उमेदवार न देता काँग्रेस-राष्ट्रवादीनं मनसेला पाठिंबा दिला होता. तर महायुतीत शिवसेनेला एकही जागा न देता भाजपनं सर्वच्या सर्व 8 जागा लढवल्या. कसब्यात स्वतःच्याच मतदारसंघात धंगेकरी पिछाडीवर राहिले., मात्र 2019 च्या तुलनेत काँग्रेसची परिस्थिती सुधारली.

2019 ला कसब्यात गिरीश बापटांना 52 हजार 391 चं लीड होतं., यंदा मोहोळांना 14 हजार 483 चं लीड मिळालं. शिवाजीनगरात गेल्यावेळी भाजपला 29 हजार 532 लीड होतं, यंदा 3 हजार 337, 2019 ला पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला 12 हजार 733 लीड होतं., यंदा धंगेकरांनी 13 हजार 297 नं आघाडी घेतली

पर्वतीत गेल्यावेळी भाजप 66 हजार 332 मतांनी पुढे होती., यंदा 28 हजार 997 ची आघाडी मिळाली. कोथरुडमध्ये 2019 ला भाजपनं 1 लाख 6 हजार 196 लीड घेतलं., यंदा 74 हजार 247 ची आघाडी मिळाली. गेल्यावेळी वडगाव शेरीत भाजपला 56 हजार 821 ची आघाडी होती., यंदा 14 हजार 985 चं लीड मिळालं. भाजपनं सलग तिसऱ्यांदा पुणे लोकसभा राखली., मात्र विधानसभानिहाय सर्व गणित अनुकूल असतानाही सहाही मतदारसंघातल्या मताधिक्क्यांत घट झाली. त्यामुळेच गेल्यावेळी 3 लाख 24 हजारांच्या फरकानं झालेला भाजपचा विजय यंदा 1 लाख 23 हजार मतांनी झाला.

या घडीला पुणे जिल्ह्यातल्या 8 विधानसभांपैकी भाजपचे 5 आमदार आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 2, तर काँग्रेसकडे १ आमदार आहेत. शिंदे किंवा ठाकरे दोन्ही शिवसेनेकडून पुण्यात एकही आमदार नाहीय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखीलृ नाही. मात्र महाआघाडीत ठाकरे आणि शरद पवारांच्या गटानं पुणे शहरात सर्वाधिक जागा लढवण्याचे दावे केलेत.

Non Stop LIVE Update
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही..
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही...
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?.
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?.
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य.
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू.
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया.
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द.
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्...
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्....
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?.
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?.