AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेच्या आखाड्यात राज्याचे आजी-माजी गृहमंत्री समोरासमोर? पाहा व्हिडीओ

अजित पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वैर काही संपताना दिसत नाहीये. आरोप-प्रत्यारोपानंतर आता देशमुख यांनी फडणवीसांविरोधात रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. पाहा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेच्या आखाड्यात राज्याचे आजी-माजी गृहमंत्री समोरासमोर? पाहा व्हिडीओ
| Updated on: Aug 26, 2024 | 11:31 PM
Share

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिग्गज नेते अनिल देशमुख आता थेट देवेंद्र फडणवीसांविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. तसे स्पष्ट संकेत खुद्द देशमुखांनीच दिलेत. त्यामुळे अनिल देशमुख आणि फडणवीसांमधील राजकीय वैर आता थेट निवडणुकीच्या मैदानात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर आमदार रोहित पवार यांचाही दावा आहे की अनिल देशमुख फडणवीसांना तगडी फाईट देऊ शकतात. तर दुसरीकडे देशमुखांनी काटोलमधूनच लढावं, त्यांचा फडणवीसांच्या मतदारसंघात लढून काही फायदा नाही असा दावा काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी केलाय.

दुसरीकडे देशमुख-फडणवीस फाईट झाली तर देशमुखांचं डिपॉझिट जप्त होईल, असा दावाच अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय. तर खरे मर्द असाल तर देशमुखांनी फडणवीसांविरोधातच लढावं, असं आव्हान परिणय फुके यांनी दिलंय. दरम्यान, देशमुखांनी काटोल सोडून फडणवीसांविरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढण्यासाठी शड्डू का ठोकलाय? असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांमधील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. 100 कोटीच्या वसुली प्रकरणात देशमुखांवर गंभीर आरोप झाले. परमबीर सिंग आणि सचिन वाझेला फडणवीसांनीच आरोप करायला लावल्याचा देशमुखांचा दावा आहे. फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यात डील झाल्याचा आरोपही देशमुखांनी केलाय. या प्रकरणात देशमुखांना तब्बल 14 महिने तुरुंगात राहावं लागलं, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, फडणवीसांनी देशमुखांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. इतकंच नाही तर आपल्याकडे अनेक ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग असून, ते योग्य वेळी बाहेर काढणार असा इशाराच दिलाय.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे अनिल देशमुखांचे चिरंजिव सलील देशमुखही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे स्वत: नागपूर दक्षिण-पश्चिम मधून आणि मुलाला काटोलमधून रिंगणात उतरवण्याची रणनीतीही देशमुखांची असू शकते. दरम्यान, नागपूर दक्षिण-पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या काही निवडणुकीत फडणवीसांसाठी चिंता वाढवणारी आकडेवारी पाहायला मिळतेय.

पाहा व्हिडीओ:-

2019 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी आशिष देशमुख यांचा 49 हजार 344 मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत फडणवीसांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांच्या विरोधात 58 हजार 942 मतांनी विजय मिळवला होता. म्हणजे 2014 च्या तुलनेत 2019 ला देवेंद्र फडणवीसांचं मताधिक्य 9 हजार 598 मतांनी कमी झालं. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या मतदारसंघातून गडकरींना फक्त 33 हजार 535 मतांचं लीड मिळालं. अशावेळी देशमुखांनी ठोकलेला शड्डू फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरणार? की देशमुखांचं आव्हान काटोलपुरतंच मर्यादित राहणार? हे जागावाटपानंतरच स्पष्ट होईल

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.