AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : सदावर्तेंवर लाडका याचिकाकर्त्यांचा आरोप, पाहा व्हिडीओ

वकील सदावर्ते हा सरकारचा लाडका याचिकाकर्ता आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर टीका केलीय., महाराष्ट्र बंदविरोधात सदावर्तेंनी केलेल्या याचिकेवर राजकीय वातावरण तापलंय. वाचा हा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : सदावर्तेंवर लाडका याचिकाकर्त्यांचा आरोप, पाहा व्हिडीओ
| Updated on: Aug 24, 2024 | 11:33 PM
Share

महाविकास आघाडीच्या बंदविरोधात हायकोर्टात जाणारे गुणरत्न सदावर्ते हा महायुती सरकारचा लाडका याचिकाकर्ता असल्याची टीका संजय राऊतांनी केलीय. जेव्हा-जेव्हा शिंदे-फडणवीस सरकार संकटात येतं, तेव्हा तेव्हा लाडक्या याचिकाकर्त्याची मदत होते., असा आरोप राऊतांनी केलाय. एकीकडे मविआ नेत्यांनी बंदऐवजी काळ्या फिती लावून बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला. तर दुसरीकडे सदावर्ते दाम्पत्यानं सुद्धा आजच्याच दिवशी परिधान केलेला काळ्या रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाचा चष्मा आणि अनोखा लूक चर्चेत होता. सदावर्तेंनी आतापर्यंत केलेल्या याचिका किंवा तक्रारींवर विविध आरोप होत आले आहेत.

याआधीच्या फडणवीस सरकारमध्ये मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंनी याचिका केली. त्यानंतर आता शिंदे सरकारनं दिलेल्या १० टक्के आरक्षणाविरोधातही सदावर्ते कोर्टात गेले आहेत. गेल्यावर्षी अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संपात हायकोर्टात याचिका जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदविरोधात हायकोर्टात याचिका जरांगेंच्या मुंबईतल्या मोर्चाविरोधात हायकोर्टात याचिका मविआ काळात रश्मी ठाकरेंनी ध्वजास सॅल्यूट न केल्याचा आरोपात तक्रार मविआ काळातच मराठी पाट्यांसाटी देवनागरी फॉन्टच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा.

सदावर्तेंच्या पत्नींनी केलेल्या राजकीय याचिकेत अनिल देशमुखांविरोधातली याचिका विशेष गाजलेली

  • 25 फेब्रुवारी 2021 ला अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती.,
  • 5 मार्चला त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला
  • 13 मार्चला हिरेनच्या हत्याप्रकरणात सचिन वाझेला अटक झाली
  • 17 मार्चला मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन परमबीर सिंहांची होमगार्ड विभागात बदली केली गेली
  • 18 मार्चला गृहमंत्री अनिल देशमुखांनी अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंहाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले 2 दिवसांनी परमबीर सिंहांनीच ठाकरेंना पत्र लिहून देशमुखांवर १०० कोटी वसुलीचा आरोप केला (( 20 मार्च )) मार्च महिन्यातच परमबीर सिंहाच्या आरोपांची चौकशी व्हावी म्हणून सदावर्तेंच्या पत्नींनी हायकोर्टात याचिका केली
  • 5 एप्रिलला सीबीआयकडे तपास सोपवला गेल्यानंतर अनिल देशमुखांना अटकही करण्यात आली

तूर्तास एसटी विलीनीकरणासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ एसटी बंद करणाऱ्या सदावर्तेंनी यावेळी मात्र कायदा कोणत्याही बंदला परवानगी देत नसल्याच्या कारणावरुन हायकोर्टात धाव घेतली होती.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.