मुंबई फोर्ट परिसरातील अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक
फोर्ट मधील अग्निशमन दलाच्या कार्यालयात दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या कारवाईने अग्निशमन कार्यालयात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील फोर्ट परिसरातील अग्निशमन दलाच्या कार्यालयात दोन अधिकाऱ्यांवर लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे हॉटेलचे कंपलायन्स लेटर मिळवण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात त्यांना आज लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
मुंबईतील फोर्ट परिसरातील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलचे कम्पायन्सचे लेटर देण्यासाठी तक्रारदाराकडे ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात तक्रारदाराने या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पहिला हप्ता देण्यासाठी तक्रारदार आला असताना हे पैसे स्वीकारताना अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी आणि त्यांचे सहकारी दोघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अरुण देवळे आणि अमोल मुळीक अशा दोघा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फोर्ट कार्यालयात एसीबीची कारवाई
एका हॉटेल व्यावसायिकाला फायरचे सर्टिफिकेट देण्यासाठी केंद्र अधिकारी अरुण देवळे आणि अमोल मुळीक यांनी तक्रारदाराकडे दीड लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ८० हजारावर सौदा ठरला. अखेर आज ८० हजार स्वीकारताना या दोघा अधिकाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली.
