AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंची पावलं ‘मातोश्री’कडे

उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीला भेट दिली. यावेळी संजय राऊत आणि अंबादास दानवे देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आणि दोघांनी एकत्र फोटोसेशन केले. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चा निर्माण झाली आहे. ठाकरे बंधूंच्या या भेटीने शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंची पावलं 'मातोश्री'कडे
| Updated on: Jul 27, 2025 | 12:38 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चा सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व शिवसेना नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई देखील होते.

राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सकाळी ११.३० वाजता दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरुन मातोश्रीकडे रवाना झाले. साधारण १२ वाजता राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे हे दोघेही स्वत: राज ठाकरेंना घेण्यासाठी गेले. त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत होते.

यानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना घेऊन मातोश्रीबाहेरील मंचावर आले. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला. त्यासोबतच सदिच्छाही दिल्या. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र फोटोसेशन केले. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी १० मिनिट थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना घेऊन घरी गेले. सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनौपचारिक चर्चा सुरु आहे.

कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक मोठ्या उत्साहात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः प्रत्येक शिवसैनिकाला भेटत असल्याने कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ‘मातोश्री’ला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून, ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत, जे कार्यकर्त्यांमधील उत्साह द्विगुणित करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले शिवसैनिक मुंबईत दाखल झाल्याने मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळली आहे. या विशेष दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.