AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 कोटी चुका आहे, मग ही माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी कशी वापरता? : उद्धव ठाकरे

अधिवेशना दरम्यान विरोधकांनी विधिमंडळात केलेल्या गोंधळावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

8 कोटी चुका आहे, मग ही माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी कशी वापरता? : उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 6:13 PM
Share

मुंबई : अधिवेशना दरम्यान विरोधकांनी विधिमंडळात केलेल्या गोंधळावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आम्ही ओबीसींच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे माहिती मागितली, तर त्यात मिरच्या झोंबण्यासारखं काय आहे? त्या माहितीत 8 कोटी चुका असल्याचा दावा करता मग इतक्या चुका असलेली माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी कशी वापरता? या योजनेत घोटाळा आहे असं म्हणायचं का मग? असे प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना धारेवर धरलंय. ते मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना बोलत होते (Uddhav Thackeray criticize BJP on empirical data for OBC reservation).

उद्धव ठाकरे म्हणाले, “केंद्राच्या सर्वेत 8 कोटी चुका असल्याचा दावा करता मग ही माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी कशी वापरता? मग या योजनेत घोटाळा आहे असं म्हणायचं का? ही माहिती ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी देत नाहीत. ही माहिती मागितली की आग लागल्यासारखा थयथयाट करता. 8 कोटीचुका असल्याचं म्हणता आणि हीच माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी वापरता. मग हा घोटाळा आहे का?”

“ओबीसींच्या आरक्षणासाठी माहिती मागितली, तर त्यात मिरच्या झोंबण्यासारखं काय?”

“2011 ची सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाची आकडेवारी केंद्र सरकारकडे आहे. ती आम्हाला मिळावी अशी मागणी होती. त्याच मागणीसाठी अधिकृत ठराव विधानसभा अधिवेशनात आणला होता. त्यात चुकीचं काय आहे? यात इतक्या मिरच्या झोंबण्यासारखं काय आहे?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

“सर्वेक्षणाच्या माहितीत 8 कोटी चुका असतील, तर मग फडणवीस सरकारने का मागितली होती?”

उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधानांच्या योजनेसाठी चुकीची माहिती कशी वापरता? हे सगळं गौडबंगाल आहे. नेमका आमच्याकडून असा कोणता अपराध घडला? आम्ही ओबीसींना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारडे माहिती देण्याची मागणी केली. यात काय गुन्हा केला? भाजप सत्तेत असताना त्यांनीही ही माहिती मागितली होती. मग जर त्या माहितीत 8 कोटी चुका होत्या तर तुम्ही ती कशासाठी मागितली होती?”

“ती माहिती निरुपयोगी असेल तर त्यांनी सांगायला हवं होतं की तुमच्या समाधानासाठी आमचा पाठिंबा आहे. काय झालं असतं?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

“उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला असल्याचं पाहायला मिळतंय”

“विधानसभेत झालेल्या राड्यामुळे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले बाळासाहेब थोरातही अवाक झाले आहेत, मी तर अगदीच नवखा आहे. कालचा संपूर्ण प्रकार पाहून उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला असल्याचं पाहायला मिळतयं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावलाय.

“सोमवारी विधानसभेत जे काही झालं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजिरवाणं आहे. कालचं चित्र मान शरमेनं खाली घालणारं होतं. वेडं वाकडं वागायचं, आरडाओरड करायचा ही लोकशाही नाही. माईक असतानाही बेंबीच्या देठापासून ओरडायचं हे चूक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

सरकारने हुकुमशाही करत विधीमंडळाच्या मार्शलमार्फत आमचे माईक, स्पीकर काढून घेतले : प्रविण दरेकर

भाजपाचे मंगळवारी बडकस चौकात निदर्शने आंदोलन, भाजपा आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार, मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणांवरुन विधानसभेत खडाजंगी

व्हिडीओ पाहा :

Uddhav Thackeray criticize BJP on empirical data for OBC reservation

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....