Uddhav- Raj Thackeray: ज्ञानेश कुमारांविरोधात गर्जना मोर्चा, मेट्रो सिनेमा ते महापालिका धडक मोर्चा, उद्धव आणि राज ठाकरेंच्या कोण कोण टार्गेटवर?

Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईतील मनसे-शिवसेनेच्या मोर्चा सभास्थळी दाखल झाला आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे, शेकापासह इतर पक्षांची भाऊगर्दी झाली आहे. या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय गर्जना करतात याची चर्चा सुरू झाली आहे.

Uddhav- Raj Thackeray: ज्ञानेश कुमारांविरोधात गर्जना मोर्चा, मेट्रो सिनेमा ते महापालिका धडक मोर्चा, उद्धव आणि राज ठाकरेंच्या कोण कोण टार्गेटवर?
उद्धव ठाकरे-राज ठाकरे गर्जना मोर्चा, मुंबई
| Updated on: Oct 04, 2026 | 12:12 PM

Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha Today: केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मनसे आणि शिवसेनाच्या मोर्चाला सुरुवात झाली.  मेट्रो सिनेमा ते महापालिका असा हा धडक मोर्चा निघाला. सकाळी 10 वाजेपासून या मोर्चासाठी कार्यकर्ते, नागरीक जमा होण्यास सुरुवात झाली होती. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर पक्षांचे नेते पायी चालत सभास्थळी दाखल झाले आहेत. प्रमुख पाच नेत्यांचे भाषण सभास्थळी होणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय गर्जना करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

ज्ञानेश कुमार ठाकरे बंधूंच्या हिटलिस्टवर

Loading...

केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार, मुख्य निवडणूक आयुक्तांचे कथित वादग्रस्त निर्णयाविरोधात दोन्ही बंधूंनी महाविकास आघाडीसोबत यापूर्वीही एल्गार केला होता. ईव्हीएम मशीनबाबत त्यांचा आक्षेप होता. तर त्याचवेळी निवडणूक याद्यांमध्ये घोळाचाही आरोप करण्यात आला होता. हिंदी भाषेच्या सक्तीनंतर दोन्ही ठाकरे एकत्र आले. त्यानंतर त्यांनी सत्याचा मोर्चा, तिरंगा मोर्चा काढला. आता ठाकरे बंधू यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी गर्जना मोर्चाचे आयोजन केले आहे. थोड्यावेळापूर्वी मुंबईत सकाळी गर्जना मोर्चा निघाला. या मोर्चात मनसैनिक, शिवसैनिक, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरीक सहभागी झाले. या मोर्चाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

मोर्चानंतर जाहीर सभा

शिवसेना आणि मनसेने गर्जना मोर्चासाठी मोठी तयारी केली होती. या मोर्चाला शिवसैनिक, मनसैनिकांनी मोठी गर्दी केली. या मोर्चात विविध पक्षाचे नेते, कार्यकर्तेही सहभागी झाली आहेत. नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली.  या मोर्चात कोणत्याही इतर पक्षाचा झेंडा दिसला नाही. तर हातात तिरंगा घेऊन हजारो जण रस्त्यावर उतरले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सभास्थळी दाखल झाले आहेत. आता या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले आहेत. या ठिकाणी पाच प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत.  उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह इतर नेते मोर्चात काय गर्जना करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गर्जना मोर्चाच्या बॅनरची चर्चा

राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आंदोलनाचे दादरसह मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. आज निवडणूक आयोगाच्या विरोधात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आंदोलन पुकारलेले आहे. याच आंदोलनासाठी नागरिकांना एकत्रित येण्यासाठी शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. गर्जना लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी असा उल्लेख या बॅनर वरती करण्यात आलेला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us