AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचे ‘महाराष्ट्र बंद’चे संकेत; म्हणाले, चार दिवसात पार्सल नाही गेलं तर…

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. मिंधे सरकार आल्यापासून उद्योग बाहेर जात आहेत. हे कमी की काय आता राज्यपाल... मी त्यांना राज्यपाल म्हणणार नाही.

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचे 'महाराष्ट्र बंद'चे संकेत; म्हणाले, चार दिवसात पार्सल नाही गेलं तर...
सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचे 'महाराष्ट्र बंद'चे संकेत; म्हणाले, चार दिवसात पार्सल नाही गेलं तर... Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2022 | 5:40 PM
Share

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेतही दिले आहे. दोन चार दिवसात हे पार्सल राज्यातून नाही गेलं तर आम्ही महाराष्ट्र बंद करू किंवा विराट मोर्चा काढू असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सीमावादाच्या प्रश्नावरून कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.

येत्या दोन चार दिवसात राज्यपालांचा विषय तडीस न्यावा लागेल. जे महाराष्ट्र प्रेमी, फुले प्रेमी, आंबडेकर प्रेमी आणि छत्रपती प्रेमी आहेत. त्यांना उभे राहावे लागेल. शिवाजी महाराज नसते तर कोश्यारी कुठे असते. सावित्रीबाई फुले नसत्या तर महिला शिक्षणाचं काय झालं असतं? याचं साधं भान राज्यपालांना राहिलं नाही. हे आता अति झालं. ज्यांना आगा पिछा नाही असे लोक राज्यपाल पदावर बसवले गेले आहेत, असा हल्ला त्यांनी चढवला.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. मिंधे सरकार आल्यापासून उद्योग बाहेर जात आहेत. हे कमी की काय आता राज्यपाल… मी त्यांना राज्यपाल म्हणणार नाही. ही व्यक्ती कोश्यारी महाराष्ट्राचा अवमान करत आहे.

त्यांनी आधी सावित्रीबाई फुलेंवर टीका केली. मुंबई आणि ठाणेकरांवर टीका केली. आता त्यांनी आमचे दैवत शिवाजी महाराजांवर टीका केली आहे. बाप हा बाप असतो. तो जुना असतो का? त्यामुळे बेताल विधानं करणाऱ्या राज्यपालांना हटवलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

जे राज्यपाल येतात ते विचारधारा घेऊन येतात. कोश्यारी जे म्हणाले ती भाजपची विचारधारा आहे का? सर्वांनी एकत्र यावं. पार्टी बाजूला ठेवा. राज्याच्या अस्मितेसाठी एकत्रं येऊन बोललं पाहिजे. दोन चार दिवस वाट पाहू. हे पार्सल परत नाही गेलं तर आम्हाला काही तरी करावं लागेल. महाराष्ट्र बंद किंवा विराट मोर्चा काढावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

आमच्याकडे मुख्यमंत्री पैचान कोन सारखे आहेत. उपमुख्यमंत्रीच बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांमध्ये बोलण्याची हिंमत नाहीये, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

यावेळी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला. बोम्मईंच्या अंगात भूताने प्रवेश केला की काय असं वाटतं. त्यांनी 40 गावांवर दावा ठोकला आहे. आम्ही काय हिंमत सोडली आहे का? महाराष्ट्राबाबत कोणी काही बरळावं. आता हे सहन केलं जाणार नाही. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना वरून आशीर्वाद आहेत का? हीच केंद्राची मानसिकता आहे का? असा सवाल त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.