AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Final Result 2022 : राज्यात ठाण्याची कश्मिरा संखे प्रथम, यंदा मराठी मुलांचा दबदबा

UPSC Final Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ठाण्याच्या डॉ. कश्मिरा किशोर संखे राज्यात पहिल्या आल्या आहेत. त्यांनी डॉक्टरीचा व्यवसाय सांभाळून हे यश मिळवलं आहे. वंजारी समाजाच्या त्या पहिल्या महिला आयपीएस ठरल्या आहेत.

UPSC Final Result 2022 : राज्यात ठाण्याची कश्मिरा संखे प्रथम, यंदा मराठी मुलांचा दबदबा
kashmira sankhe
| Updated on: May 23, 2023 | 5:31 PM
Share

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. स्वतःच्या डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या आईवडलांना दिले असून आता IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करणार आल्याचं त्यांनी सांगितलं.

वंजारी समाजातील ती पहिला आयएए

कश्मिरा संखे ही वंजारी समाजातील पहिली महिला आयएएस झाली आहे. ऐकलारे येथील ठाणे स्थित डॅा.किशोर संखे यांची ती कन्या आहे. महाराष्ट्रातून पहिली तर देशातून २५ रँक तिला मिळाली आहे.

मराठी मुलांचा दबदबा

यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा दबदबा पाहायला मिळतोय. वसंत दाभोळकरने ७६ वा क्रमांक, प्रतिक जराड १२२ वा क्रमांक, जान्हवी साठे १२७ वा क्रमांक, गौरव कायंदे-पाटील १४६ वा क्रमांक तर ऋषिकेश शिंदे १८३ वा क्रमांक, अमर राऊत २७७ वा क्रमांक, अभिषेक दुधाळ २७८ वा क्रमांक, श्रुतिषा पाताडे २८१ वा क्रमांक, स्वप्नील पवारने २८७ वा क्रमांक, अनिकेत हिरडेने ३४९ वा क्रमांक, संकेत गरुड ३७० वा क्रमांक, ओमकार गुंडगेने ३८० वा क्रमांक, परमानंद दराडे ३९३ वा क्रमांक, मंगेश खिलारीने ३९६ वा क्रमांक पटकावला आहे.

सागर खराडे ४४५ वा क्रमांक, करण मोरे ४४८ वा क्रमांक, पल्लवी सांगळे ४५२ वा क्रमांक, आशिष पाटील ४६३ वा क्रमांक, अभिजीत पाटील ४७० वा क्रमांक, शशिकांक नरवडे ४९३ वा क्रमांक, प्रतिभा मेश्राम ५२७ वा क्रमांक, शुभांगी केकाण ५३० वा क्रमांक, प्रशांत डगळे ५३५ वा क्रमांक, लोकेश पाटील ५५२ वा क्रमांक, प्रतीक्षा कदम ५६० वा क्रमांक, मानसी सकोरे ५६३, जितेंद्र कीर ५६९ वा क्रमांक, अक्षय नेर्ले ६३५ वा क्रमांक, मानसी साकोरे ५६३ वा क्रमांक, अमित उंदिरवादेने ५८१ वा क्रमांक, अक्षय नेर्ले ६३५ वा क्रमांक, प्रतिक कोरडे ६३८, करण मोरे ६४८ वा क्रमांक, शिवम बुरघाटे ६५७ तर केतकी बोरकरने ६६६ वा क्रमांक, सुमेध जाधवने ६८७ वा क्रमांक पटकावला आहे.

शिवहर चक्रधर मोरे ६९३ वा क्रमांक, सिद्धार्थ भांगे ७०० वा क्रमांक, स्वप्नील डोंगरे ७०७ वा क्रमांक, उत्कर्षा गुरव ७०९ वा क्रमांक, राजश्री देशमुख ७१९, महारुद्र जगन्नाथ भोर ७५० वा क्रमांक, स्वप्नील सैंदणे ७९९ वा क्रमांक, संकेत कांबळे ८१० वा क्रमांक, निखिल कांबळे ८१६ वा क्रमांक, गौरव प्रकाश अहिरराव ८२८ वा क्रमांक, श्रुती उत्तम श्रोते ८५९ वा क्रमांक, तुषार पवार ८६१ वा क्रमांक, दयानंद रमाकांत तेंडोलकर ९०२ वा क्रमांक, आरव गर्ग ९१९ व्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा

UPSC Final Result 2022 : युपीएससीचा निकाल आला, इशिता किशोर देशात प्रथम, महाराष्ट्रातून कोणाला मिळाले यश

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.