UPSC Final Result 2022 : यूपीएससीचा निकाल आला, इशिता किशोर देशात प्रथम, महाराष्ट्रातून कोणाला मिळाले यश

UPSC Final Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. पहिल्या चारमध्ये मुलीच आहेत. पहिला क्रमांक इशिता किशोरने पटकवला आहे. पुण्यातील मंगेश खिल्लारी याला यश मिळाले आहे.

UPSC Final Result 2022 : यूपीएससीचा निकाल आला, इशिता किशोर देशात प्रथम, महाराष्ट्रातून कोणाला मिळाले यश
ishita kishore
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 5:14 PM

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल (Final Result UPSC) जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. यंदा पहिल्या चारमध्ये मुलीच आहेत. पहिला क्रमांक इशिता किशोरने पटकवला आहे. दुसऱ्या स्थानावर गरिमा लोहिया तर तिसऱ्या स्थानावर उमा हरथीआहे. चौथा क्रमांक स्मृती मिश्राने पटकवला आहे.

UPSC ने यदा 1022 जणांची निवड केली आहे.. त्यात IAS साठी 180, इंडियन फॉरेन सर्विससाठी (IFS) 38 IPS साठी 200 जण आहेत. तसेच 473 कँडिडेट ग्रुप A आणि 131 कँडिडेच ग्रुप B साठी निवडले गेले आहे.

हे आहे पहिले दहा

  1. इशिता किशोर
  2. गरिमा लोहिया
  3. उमा हरथी एन
  4. स्मृती मिश्रा
  5. मयूर हजारिका
  6. गहना नव्या जेम्स
  7. वसीम अहमद भट
  8. अनिरुद्ध यादव
  9. कनिका गोयल
  10. राहुल श्रीवास्तव

इशिता नेहमी राहिली टॉपर

UPSC CSE 2022 च्या परीक्षेत ऑल इंडिया टॉपर असलेली इशिता किशोर नेहमीच टॉपर राहिली आहे. एअरफोर्स बालभारती स्कूल आणि दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये तिचे शिक्षण झाले. इशिताने लहानपणीच ठरवलं होतं की ती आयएएस अधिकारी व्हायची.

वडील एअरफोर्समध्ये

इशिता किशोरचे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत आणि संपूर्ण कुटुंब ग्रेटर नोएडामध्ये राहते. इशिताने 2014 मध्ये बाल भारतीमधून तिचे 12 वी इयत्ता पूर्ण केले, त्यानंतर तिने 2017 मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्ससह पदवी पूर्ण केली. यूपीएससी परीक्षेतील त्याचा हा तिसरा प्रयत्न होता.

टॉपरची अपेक्षा नव्हती

इशिता आज निकालाची वाट पाहत होती, पण ती ऑल इंडिया टॉपर होईल याची तिला अपेक्षा नव्हती. निकाल लागताच तिचे नाव सर्वत्र पसरले. इशिताने सांगितले की, मी माझ्या वडिलांना नेहमीच देशसेवेसाठी तत्पर पाहिले आहे. म्हणूनच माझ्या वडिलांना पाहून मला लहानपणीच विचार आला होता की, मी मोठी झाल्यावर देशहितासाठी काम करेन, जेणेकरून मला माझ्या वडिलांप्रमाणे देशाची सेवा करता येईल.

महाराष्ट्रातून मंगेश खिल्लारीला यश

मंगेश खिल्लारी यूपीएससी परीक्षेत देशात 396 आला आहे. तो नगर जिल्ह्यातील सुकेवाडी येथील रहाणारा आहे.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.