आमदार रविंद्र वायकर यांच्या तारांकीत प्रश्‍नाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सकारात्मक उत्तर

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी मुंबईच्या विविध भागांमध्ये उड्डाणपूल उभारण्‌यात आले आहेत. एवढेच नव्हे तर एमएमआरडीएच्या माध्यमातूनही अनेक ठिकाणी मेट्रोची कामेही सुरू आहे. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातही जेव्हीएलआर व पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत.

आमदार रविंद्र वायकर यांच्या तारांकीत प्रश्‍नाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सकारात्मक उत्तर
'ती' 14 गावे अखेर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होणारImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:12 AM

मुंबई : मुंबईसह जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणांवर उभारण्यात आलेल्या व येणार्‍या उड्डाणपुलाखालील वाढती अतिक्रमणे दूर करुन त्या जागा सुशोभित करण्यात येणार असून पश्‍चिम द्रूतगती महामार्ग (जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शन), ऑबेरॉय मॉल व आरे जंक्शन येथील उड्डाणुपलाखालील मोकळी जागा सुशोभिकरणाकरीता ऑबेरॉय रियल्टी यांना देण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी तारांकीत प्रश्‍नांद्वारे विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिली. (Urban Development Minister Eknath Shinde is positive about beautification of space under flyover)

उड्डाणपुलाखालील जागांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी मुंबईच्या विविध भागांमध्ये उड्डाणपूल उभारण्‌यात आले आहेत. एवढेच नव्हे तर एमएमआरडीएच्या माध्यमातूनही अनेक ठिकाणी मेट्रोची कामेही सुरू आहे. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातही जेव्हीएलआर व पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत. यात पश्‍चिम द्रुतगती महामार्ग,जोगेश्‍वरी वाहतूक चौकी, सिप्झ गेट नंबर ३ समोर, जेव्हीएलआर, आरे जंक्शन, पश्‍चिम द्रुतगती महामार्ग येथील ऑबेरॉय मॉल, येथील उड्डाणपुलाखालील जागांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याचे वायकर यांनी तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणले. या उड्डाणपुलाखाली बेकायदेशीरीत्या अनेक नादुरुस्त वाहने अनधिकृतरित्या उभी असतात. याच उड्डाणपुलाखाली अनधिकृत बांधाकम करुन वास्तव्यास असलेले लोक त्यांचे प्रात:विधी याच परिसरात करीत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.

उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभिकरण करुन आकर्षक रचनेची उद्याने बांधावी

ज्या ज्या उड्डाणपुलाखाली अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करुन तसेच या जागेवर अनधिकृतरित्या उभी करण्यात आलेली जुनी व नादुरुस्त वाहने हटवून या उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभिकरण करुन आकर्षक रचनेची उद्याने बांधून ती जनतेसाठी खुली करावीत, अशी मागणी आमदार वायकर यांनी तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून सभागृहात केली. याप्रश्‍नाला उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी,‘सिप्झ गेट नंबर 3 येथील काही मोकळ्या जागेत काही वेळा बेघर लोक वास्तव्य करीत असल्याचे मान्य केले. जेव्हीएलआर, आरे व ऑबेरॉय मॉल जवळील उड्डाणपुलाखाली मेट्रोलाईन-7 व व मेट्रो लाईन 6 चे कार्यालय असून ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यावर हे कार्यालय तेथेच राहणार असून पश्‍चिम द्रुतगती महामार्ग (जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शन), ऑबेरॉय मॉल व आरे जंक्शन येथील उड्डाणपुलाखालील मोकळी जागा सुशोभिकरणारकरीत मे. ऑबेरॉय रियल्टी यांना वाटप करण्यात आल्याची माहिती, एकनाथ शिंदे यांनी तारांकीत प्रश्‍नाला उत्तर देताना दिली. (Urban Development Minister Eknath Shinde is positive about beautification of space under flyover)

इतर बातम्या

School : दप्तराचं ओझं होणार आणखी कमी, सर्व धडे एकाच पुस्तकात, काय आहे शिक्षण विभागाचा नवा निर्णय?

मुंबईतील जलवाहतुकीसाठी ऐतिहासिक निर्णय, apollo बंदरात किती नवे धक्के तयार होणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.