मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! 27 सप्टेंबर रोजी फक्त महिलांचे लसीकरण, महापालिकेचा निर्णय

महानगरपालिका कोविड 19 लसीकरण केंद्रांवर, सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! 27 सप्टेंबर रोजी फक्त महिलांचे लसीकरण, महापालिकेचा निर्णय
VACCINATION
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 9:47 PM

मुंबई : कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड 19 लसीकरण केंद्रांवर, सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. (vaccination on 27 september is only for women in mumbai government vaccination centres)

28  सप्टेंबर रोजी शिक्षक विद्यार्थ्यांचे लसीकरण

तसेच, मंगळवार दिनांक 28  सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच 18 वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे कोविड लसीकरण होईल. याच दिवशी दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत दुसरी मात्रा (डोस) देय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही.

पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे

महिला तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना पहिली किंवा पहिली मात्रा घेऊन विहित कालावधी पूर्ण झाला असेल तर (कोविशिल्‍ड संदर्भात पहिल्या डोसनंतर 84 दिवस आणि कोव्‍हॅक्‍सीन असल्यास पहिल्या डोसनंतर 28 दिवस पूर्ण झाल्‍यास) दुसरी मात्रा देखील घेता येईल. त्याचप्रमाणे, दुसरी मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांना पहिला डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत आणणे आवश्यक असेल.

ऑनलाईन पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही

या दोन्ही दिवशी, मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केद्रांवर थेट येवून (वॉक इन) संबंधित घटकातील पात्र नागरिकांना लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना, शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र देखील सोबत आणणे आवश्यक आहे.

सत्राचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, पालिकेचे आवाहन

कोविड 19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र नागरिकांनी सदर सत्राचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

इतर बातम्या :

WEATHER ALERT | सावधान…! बंगालच्या उपसागरावर घोंघावतेय चक्रीवादळ; महाराष्ट्रालाही अलर्ट

काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत किती जागांवर लढणार?; भाई जगतापांनी सांगितला आकडा

शाळा, मंदिरांनंतर आता राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुद्धा सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय

(vaccination on 27 september is only for women in mumbai government vaccination centres)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.