दीराकडून विनयभंग, तक्रार मागे घेण्यासाठी धमकी, विद्या चव्हाणांच्या सूनेचा दावा

स्वतःच्या आमदारकीची ताकद वापरुन त्यांनी मला माझ्या मुलीपासून तोडलं आहे, असा दावाही विद्या चव्हाणांच्या सूनेने केला आहे Vidya Chavan Daughter in Law answer

दीराकडून विनयभंग, तक्रार मागे घेण्यासाठी धमकी, विद्या चव्हाणांच्या सूनेचा दावा

मुंबई : ‘दीराने माझा विनयभंग केला होता. तक्रार दाखल केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्याने दिली होती’, असा आरोप राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या सूनेने केला आहे. एक बाई असून, एक आई असूनही माझ्या सासूबाईंनी केलेली माझी बदनामी दुर्दैवी आहे, असंही त्या म्हणाल्या. सूनेचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे तिने आपल्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केल्याचा दावा विद्या चव्हाण यांनी केला होता. (Vidya Chavan Daughter in Law answer allegations of Extra Marital Affair)

‘मुलगा व्हावा म्हणून गरोदरपणात माझ्यावर दबाव टाकला जात होता. माझी मुलगी पाच वर्षांची आहे. मोठी सून असल्यामुळे दुसऱ्या वेळीही माझ्यावर ‘वंशाच्या दिव्या’साठी दबाव होता. मात्र माझी आठव्या महिन्यातच प्रसुती झाली. मला दुसऱ्यांदाही मुलगी झाली. दुर्दैवाने आमचं बाळ सातव्या महिन्यात गेलं. डॉक्टरांनी मला पुन्हा गरोदर राहिल्यास जीवाचा धोका असल्याचं बजावलं. आता आपलं नातवाचं स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं समजल्यामुळे सासरी माझा छळ सुरु झाला’, असा आरोप विद्या चव्हाण यांच्या सूनेने केला आहे.

‘दीराने माझा विनयभंग केल्याची तक्रार मी 16 जानेवारीला केली होती. त्यानंतर 22 जानेवारीला मी कौटुंबिक हिंसाचाराची केस केली. त्यानंतर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी विद्या चव्हाण खोटेनाटे आरोप करुन माझी बदनामी करत आहेत’, असा दावा विद्या चव्हाणांच्या सूनेने केला आहे.

संबंधित बातमीसूनेचे विवाहबाह्य संबंध, आमदार विद्या चव्हाण यांचे गंभीर आरोप

‘स्वतःच्या आमदारकीची ताकद वापरुन त्यांनी मला माझ्या मुलीपासून तोडलं आहे. तुला तुझी मुलगी सुखरुप हवी असेल, तर सगळे आरोप मागे घे, असा दबाव माझ्यावर टाकला जात आहे, असा आरोपही सूनेने केला आहे. माझ्यावर विद्या चव्हाणांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. माझा नवरा आयटी क्षेत्रातील असल्याने त्याने खोटे पुरावे तयार केले आहेत’, असा दावाही तक्रारदार सूनेने केला.

‘चव्हाण कुटुंबाने सात डिसेंबरला मला घराबाहेर काढलं आहे. पण माझे दागिने, कागदपत्रं, पासबुक अशा वस्तू अजूनही घरातच आहेत. माझी मुलगी फक्त पाच वर्षांची आहे. मला तिचा ताबा हवा आहे’, अशी कळकळीची विनंती विद्या चव्हाण यांच्या सूनेने ‘टीव्ही9’ शी बोलताना केली. (Vidya Chavan Daughter in Law answer allegations of Extra Marital Affair)

पाहा व्हिडीओ :


Published On - 11:08 am, Wed, 4 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI