मुंबईकरांसाठी खुशखबर! तुळशीपाठोपाठ विहार तलावही ओव्हर फ्लो!

गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठाही वाढू लागला आहे. (Vihar Lake Starts Overflowing Due to Heavy Rainfall)

मुंबईकरांसाठी खुशखबर! तुळशीपाठोपाठ विहार तलावही ओव्हर फ्लो!
Vihar Lake

मुंबई: गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठाही वाढू लागला आहे. तुळशीपाठोपाठ मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाण्याचं संकट कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Vihar Lake Starts Overflowing Due to Heavy Rainfall)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ आज सकाळी 9 वाजता भरुन‌‌ वाहू लागला आहे‌. गेल्यावर्षी दिनांक 5 ऑगस्‍ट 2020 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता.

9 कोटी लीटर पाण्याचा पुरवठा

27,698 दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष 2019 मध्ये 31 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच 2018 मध्‍ये 16 जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान तलाव आहे असून त्यानंतर तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी 90 दशलक्ष लीटर (9 कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तर मुंबईत पाणी भरणार?

विहार तलाव भरल्याने मिठी नदीची पाणी पातळी वाढत जाणार आहे. परिणामी याचा धोका मुंबईला जाणवू शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.

विहार तलावाचा इतिहास

>> बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 28.96 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.

>> या तलावाचे बांधकाम सन 1859 मध्ये पूर्ण झाले.

>> या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 65.5 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

>> या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 18.96 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 7.26 चौरस किलोमीटर एवढे असते.

>> तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा 27,698 दशलक्ष लीटर एवढा असतो.

>> हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते. (Vihar Lake Starts Overflowing Due to Heavy Rainfall)

 

संबंधित बातम्या:

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Mumbai Rain Live : मुंबईत काही भागांत पाऊस तर कुठे विश्रांती, मुंबईकरांची मात्र दाणादाण!

Mumbai Landslide : मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

(Vihar Lake Starts Overflowing Due to Heavy Rainfall)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI