Mumbai Rains : घोडबंदर रोड येथील मानपाडा मुल्ला भागात संरक्षण भिंत कोसळली, 5 चारचाकी, 5 दुचाकी वाहनांचे नुकसान

| Updated on: Jul 19, 2021 | 12:07 AM

Mumbai Rain Live : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. जवळपास पाच-सहा तास तुफान पाऊस बरसला. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

Mumbai Rains : घोडबंदर रोड येथील मानपाडा मुल्ला भागात संरक्षण भिंत कोसळली, 5 चारचाकी, 5 दुचाकी वाहनांचे नुकसान
mumbai rain

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. जवळपास पाच-सहा तास तुफान पाऊस बरसला. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळतीय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Jul 2021 11:44 PM (IST)

    घोडबंदर रोड येथील मानपाडा मुल्ला भागात संरक्षण भिंत कोसळली, 5 चारचाकी, 5 दुचाकी वाहनांचे नुकसान

    ठाणे : घोडबंदर रोड येथील मानपाडा मुल्ला भाग येथील कॉसमॉस इमातीतील संरक्षण भिंत कोसळून 5 चारचाकी आणि 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आपत्तीव्यवस्थापनासह अग्निशमन दल तसेच jcb दाखल झाली आहे.  कोणतीही हानी झाली नसून गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे

  • 18 Jul 2021 11:09 PM (IST)

    ठाण्यात प्रचंड मुसळधार पाऊस

    ठाण्यात पावसाची जोरदार सुरुवात, काही काही सखल भागातील सोसायटीमध्ये पाणी साचायला सुरुवात, पुढील काही तासात ठाण्याला पावसाचा इशारा
  • 18 Jul 2021 11:05 PM (IST)

    जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी तालुक्यात 5 दिवसानंतर पाऊस

    जालना : जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी तालुक्यात 5 दिवसानंतर अवकाळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले तर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच जालना जिल्ह्यातील परतूर मध्येही काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

  • 18 Jul 2021 10:16 PM (IST)

    उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पाऊस

    ठाणे : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पाऊस

    अद्याप कुठेही पाणी साचलेलं नाही

  • 18 Jul 2021 09:57 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु, तसेच अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरातही पाऊस सुरु, पण अद्याप कुठेही पाणी साचल्याची माहिती नाही

  • 18 Jul 2021 09:22 PM (IST)

    भिवंडी तालुक्यातील दापोडे गावात घरांमध्ये शिरले पाणी

    भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडे गावात घरांमध्ये शिरले पाणी

    अनेक कुटुंबियांचे अत्यावश्यक साहित्य पाण्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

  • 18 Jul 2021 08:52 PM (IST)

    21 वर्षीय तरुण मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीपात्रात बुडाला

    पुणे -पर्यटनबंदीचा आदेश झुगारून पर्यटनासाठी आलेला 21 वर्षीय तरुण इंद्रायणी नदीपात्रात कुंडमळा येथे बुडाला

    -करन हंबीर असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव

    -करन आणि त्याचे मित्र आज पुण्यातील येरवडा येथून मावळ मधील कुंडमळा येथे वर्षा विहारासाठी आले होते

    -स्थानिक ग्रामस्थांकडून मृतदेह शोधण्यास यश

    -कलम 144 चा आदेश भंग करून मोठया प्रमाणात पर्यटक आजही झाले होते कुंडमळा येथे दाखल

    -तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल

  • 18 Jul 2021 08:50 PM (IST)

    खोपोली, खालापूर, रसायनी, पेण, अलिबाग परिसरात मुसळधार पाऊस

    रायगड : खोपोली, खालापूर, रसायनी, पेण, अलिबाग परिसरात मागील दोन तास मुसळधार पाऊस.

    खोपोलीतील DC नगर मध्ये पाणि साचुन तुडुबं भरलाय एरीया.

    पाताळगगां नदी धुतढी भरुन वाहत आहे.

    रसायनी भागातील औद्योगिक क्षेत्रातील सर्व मुग्य रस्ते पाण्याखाली. पोलीस स्टेशन चा रोड ही पाण्याखाली.

    रसायनी भागातील रिलायन्स सह अनेक कपंन्यांकडे जाणारे रस्ते पाण्याखाली.

    अलिबाग मध्येही मुसळधार पाऊस. मुख्य रस्ते व पेट्रोल पंपात पाणि शिरल्याने वाहनांची ताराबंळ.

  • 18 Jul 2021 07:56 PM (IST)

    मुबंई-पुणे राष्ट्रीय मार्गावर खोपोली ते पनवेल रोड पाण्याखाली 

    रायगड : मुबंई-पुणे राष्ट्रीय मार्गावर खोपोली ते पनवेल रोड पाण्याखाली

    हायवेवर पाण्यातून वाहतूक सुरु, रविवार असल्याने मुबंईकडे परतीच्या मार्गावर पर्यटक

    शेडुगं टोल नाका परिसरात पाण्यातून वाहतूक सुरु.

    पनवेलमधील बाजरपेठेतील मुख्य रस्ते पाण्याने भरले.

    कर्जतमधून वाहणारी उल्हास नदी दुथडी भरुन वाहत आहे.

  • 18 Jul 2021 07:55 PM (IST)

    मुंबईतील डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आपत्कालीन अधिकाऱ्यांसोबत घेतलेली बैठक संपली

    हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे असतील

    आपत्तीबाबात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा मांडताना मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

    अतिधोकादायक इमारती, डोंगराळ भागातील रहिवाशांचे स्थलांतर लवकर करण्याचे आदेश

    आपत्कालीन बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त, पालिका अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, हवामान विभागाचे अधिकारी रेल्वे अधिकारी उपस्थित होते

  • 18 Jul 2021 07:33 PM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस, पोलीस ठाण्यात साचले पाणी

    कल्याण : डोंबिवलीत गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकली, कल्याण पश्चिमेतील अत्रे रंगमंदिर परिसरात पाणी भरले आहे. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पोलीस कर्मचारी अधिकारी या पाण्यात काम करत आहेत . पाऊस असाच पडत राहिला तर सखल भाग जलमय होणार आहे.

  • 18 Jul 2021 07:08 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तासभरापासून मुसळधार पाऊस 

    सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या तासभरापासून मुसळधार पाऊस

    कुडाळमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात साचले पाणी

    तर माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला आला पूर

    आंबेरी पुलावर आले गुडघाभर पाणी, वाहतूक ठप्प

    माणगावमधील 27 गावांचा तालुक्याशी संपर्क तूटला

    अजूनही पावसाची रिपरिप सुरूच

  • 18 Jul 2021 06:45 PM (IST)

    पुढचे 24 तास अतिवृष्टीचे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

    पुढचे 24 तास अतिवृष्टीचे

    मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

  • 18 Jul 2021 06:27 PM (IST)

    महापालिकेच्या हद्दीतील पाण्याची जबाबदारी राज्य सरकारची : रावसाहेब दानवे

    मुंबई : मुंबईमध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याच्या परिस्थीवर रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच मोठं वक्तव्य

    सध्याच्या परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत

    अधरिकाऱ्यांसोबत सीएसटी ते कल्याण पर्यंत प्रवास करणार

    पाणी साचत असलेले पॉईंट आयडेंटिफाय केले असतील तर केंद्र सरकार त्याची व्यवस्था करेल

    महापालिकेच्या हद्दीतल  पाणी रेलवेच्या हद्दीत येत असेल तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे त्यांनी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे

  • 18 Jul 2021 06:04 PM (IST)

    आदित्य ठाकरेंनी दिली दुर्घटनाग्रस्त बूर, विक्रोळी, भांडुप येथे भेट

    आदित्य ठाकरेंनी दिली दुर्घटनाग्रस्त तीन ठिकाणांना भेट

    बूर, विक्रोळी, भांडुप येथे दिली भेट

  • 18 Jul 2021 05:50 PM (IST)

    नालासोपाऱ्यात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून 4 वर्षांचा मुलगा गेला वाहून

    नालासोपारा: नालासोपाऱ्यात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून 4 वर्षांचा मुलगा गेला वाहून

    अमोल सिंग असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे

    वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवणाकडून मुलाचा शोध सुरू

    नालासोपारा पूर्व बिलालपाडा तलाव जवळील मोठ्या नाल्यात आज सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास घडली घटना

  • 18 Jul 2021 05:49 PM (IST)

    मुंबईवरून सुटणाऱ्या 9 प्रवासी रेल्वेगाड्या रद्द

    मनमाड :  मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द

    मुंबई वरून सुटणाऱ्या 9 प्रवासी रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द

    मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनाद्वारे काही गाड्या रद्द  करण्यात आल्या आहेत. त्या पुढील

    प्रमाणे

    02188 मुंबई जबल्पुर गरिब रथ विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द

    02811 लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष यात्रा आरंभ दिनांक 19.07.2021 ला रद्द

    02169 मुंबई नागपूर विशेष विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द

    01141 मुंबई आदिलाबाद विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द

    02105 मुंबई गोंदिया विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द

    02109 मुंबई मनमाड विशेष यात्रा आरंभ दिनांक

    19 .07.2021 ला रद्द गाड्या

    07057 मुंबई सिकंदराबाद विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द

    02111 मुंबई अमरावती विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द

    07612 मुंबई नांदेड राज्यराणी विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द

    कृपया प्रवाशांनी याची नोंद घ्यावी

  • 18 Jul 2021 05:16 PM (IST)

    उद्धव ठाकरेंची 6 वाजता बैठक, पावसामुळे उद्भवलेल्या आपत्तीचा घेणार आढावा

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 6 वाजता महत्त्वाची बैठक

    पावसामुळे उद्भवलेल्या आपत्तीचा घेणार आढावा

  • 18 Jul 2021 05:06 PM (IST)

    नालासोपाऱ्यात 3 रुमच्या भिंती कोसळल्या, घरातील संसार, सामान सर्व गेले वाहून

    नालासोपारा : नालासोपारा पूर्वमध्यो धणीवबाग श्रीधर नगरमध्ये चाळीतील 3 रुमच्या भिंती कोसळल्याची घटना घडली आहे.

    मध्यरात्रीच्या पावसाने या रूमच्या भिंती कोसळल्या आहेत. घरातील नागरिक तत्काळ घराबाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसार, सामान हे सर्व वाहून गेले आहे.

    स्थानिक नगरसेवक पंकज पाटील यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची भेट घेऊन त्यांना तातडीची मदत करत तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

  • 18 Jul 2021 05:04 PM (IST)

    नवी मुंबईत मुसळधार पाऊस,12 तासात 200 मीमी पावसाची नोंद

    नवी मुंबई : शहरात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे एका ठिकाणी भिंत कोसळली. तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले. नवी मुंबई शहरात सरासरी दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबईत शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पहाटे सहा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. शहरात एका ठिकाणी भिंत कोसळली. यामध्ये कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तसेच पाच ठिकाणी झाडे कोसळली. तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले. एक शॉर्टसर्किट तर एक गॅस लिकेजची घटना घडली. शहरात 200.88 मिमी पावसाची 12 तासांत नोंद झाली आहे. एकूण 1455.44 मिमी पावसाची नोंद झाली.

  • 18 Jul 2021 04:56 PM (IST)

    पालघर जिल्ह्यात पावसाचा हाहा:कार, अनेक भागात जनजीवन विस्कळीत

    पालघर :  जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे . मात्र असं असतानादेखील पालघर मनोर रोडवरील वाघोबा घाटात असणारी वानर या पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. पालघर मनोर रोडवरील वाघोबा घाटातील वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात ही वानर उड्या मारताना चा व्हिडिओ सध्या पालघर मध्ये समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होताना दिसतोय
  • 18 Jul 2021 04:40 PM (IST)

    पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात, मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन

    पुणे - पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात

    - मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन

    - शहरासह धरण क्षेत्रातही पाऊस सुरु

    - सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण

    - उकाड्यापासून हैरान असलेलेल्या पुणेकरांना दिलासा

  • 18 Jul 2021 04:31 PM (IST)

    वसईच्या मधूबन परिसरात पडलेल्या पावसाचै थैमान, कार, मोटारसायकल पाण्यात बुडून झाल्या खराब

    वसई : वसईच्या मधूबन परिसरात पडलेल्या पावसाने अक्षरश: दैना उडवली आहे. शेकडो कार, मोटारसायकल पाण्यात बुडून खराब झाल्या आहेत. तर एक महिंद्रा कंपनीची xuv500 ही कार पुराच्या पाण्यात वाहून एका किनाऱ्यावर अडकली आहे. दुपारी 1 च्या पाणी ओसरायला सुरवात झाल्याने गाड्यांची झालेली दयनीय अवस्था समोर येत आहे. मधूबन परिसरात अक्षरशा समुद्र निर्माण झाला की काय अशीच अवस्था निर्माण झाली आहे.

  • 18 Jul 2021 03:57 PM (IST)

    लोकांना सेस्क्यू करण्यासाठी मुंबई पोलीस, महापालिका, अग्निशमन दलाची मेहनत, आतापर्यंत 4423.50 दशलक्ष लिटर पाणी उपसले : आदित्य ठाकरे

    मुंबई पोलीस, महापालिका, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान यांनी लोकांना सेस्क्यू करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. वरील सर्व दल रात्रीपासून ही मेहनत घेत आहेत. मिनी पंपांव्यतिक्त इतर पंपिग स्टेशन्सनी आतापर्यंत 4423.50 दशलक्ष लिटर पाणी उपसले आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

  • 18 Jul 2021 03:36 PM (IST)

    दुर्घटनेची चौकशी होणारच आहे, राजकारण करायची ही वेळ नाही : भाई जगताप

    मुंबई : विक्रोळी आणि चेंबूरमध्ये संरक्षक भिंत कोसळल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.  "नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची चौकशी तर होणारच आहे. राज्य सरकारने मदत केलीय आहे. दुर्घटनेच्या घटनेचे राजकारण करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की गंगेचं काय झालं ? राजकारण करायची ही वेळ नाही," असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.

  • 18 Jul 2021 03:31 PM (IST)

    महापालिका अधिकाऱ्याच्या संगनमतानं संरक्षण भिंतीचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं : प्रविण दरेकर

    मुंबई : विक्रोळी संरक्षण भिंत दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झालय. एका रहिवाशांचा शोध अग्निशामक दल घेत आहे. यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचं होतं त्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे. कंत्राटदार महापालिका अधिकारी यांच्या संगनमतानं निकृष्ट दर्जाच काम करण्यात आल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

  • 18 Jul 2021 12:48 PM (IST)

    मुंबईत पावसाने 2 दुर्घटना, 23 जण मृत्यूमुखी; केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर

    मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

  • 18 Jul 2021 12:40 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळीत दुर्घटना, मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

    मुंबई : मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असं त्यांनी जाहीर केलं.

  • 18 Jul 2021 11:24 AM (IST)

    येणाऱ्या 4 तासांत मुंबईत जोरदार पाऊस बरसेल, हवामान विभागाचा इशारा

    मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी ढगांचा कडकडाट, वीज कोसळणे आणि जोरदार वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

  • 18 Jul 2021 10:52 AM (IST)

    मुंबई, पालघर,डहाणूसाठी पुढील 24 तास महत्वाचे, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

    मुंबई, पालघर,डहाणूसाठी पुढील 24 तास महत्वाचे आहे. हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

  • 18 Jul 2021 09:14 AM (IST)

    मुंबईत पावसाला सुरुवात

    अर्ध्या-एक तासाच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. आकाशामध्ये ढगांनी दाटी केलीय. आज दिवसभर मुंबईत अशाच पद्धतीने पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

  • 18 Jul 2021 08:01 AM (IST)

    एकीकडे पाऊस, दुसरीकडे वाहतूक कोंडी

    मुंबईत पावसाने पाच ते सहा तास दमदार बॅटिंग केली. पावसाने अनेक भागांत पाणी साचलंय. वेस्टर्न हायवेवर सध्या प्रचंड ट्राफिक जाम झालंय.
  • 18 Jul 2021 07:46 AM (IST)

    Vikroli Landslides : वाशीनाका-चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

    वाशीनाका-चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, घरांवर संरक्षक भिंत कोसळून 10 जणांचा मृत्यू, 6 ते 8 जण अडकल्याची भीती...

    एनडीआरएफ पोहोचण्यापूर्वी स्थानिक बीएमसी/अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 मृतदेह बाहेर काढले आहेत. 6 ते 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी आहे आणि शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे...

  • 18 Jul 2021 07:37 AM (IST)

    विक्रोळीच्या पंचशील नगरात 3 ते 4 घरे कोसळली, 3 जणांचा मृत्यू,

    विक्रोळीच्या पंचशील नगर विभागात तीन ते चार घरे कोसळली, 3 जणांचा मृत्यू आणखी सात ते आठ लोक अडकले असून बचाव कार्य सुरू आहे

  • 18 Jul 2021 07:13 AM (IST)

    विरारमध्ये दमदार पाऊस, सखल भागामध्ये साचले पाणी

    विरारमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात पाऊस
    काही सखल भागामध्ये साचले पाणी
    तर सखल भागांतली काही वाहने पाण्याखाली
  • 18 Jul 2021 07:12 AM (IST)

    सायन रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

    पाठीमागच्या पाच तासांपासून मुसळधार पाऊस सायन रेल्वे स्टेशनचा ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली ट्रॅकवर इतकं पाणी साचलंय की तो ट्रॅक आता नदीसारखा भासू लागला आहे.

  • 18 Jul 2021 07:09 AM (IST)

    अंधेरी पश्चिम सबवे परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं

    पाऊसच एवढा धो धो कोसळतोय की अंधेरी पश्चिम सबवे परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. अनेकांना तशाच अवस्थेत रात्र काढावी लागली.

  • 18 Jul 2021 07:07 AM (IST)

    विरारमध्ये मुसळधार पाऊस

    विरारमध्ये मुसळधार पाऊस
    विरारमध्ये कुंभार पाडा भागात लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं
    पावसाने उडवली दाणादाण
  • 18 Jul 2021 07:07 AM (IST)

    बोरीवलीतील रस्त्यांना नदीचं स्वरुप

    मुंबई उपनगरमध्ये मुसळधार पाऊस, बोरीवलीत पावसाची दमदार बॅटिंग, जवळपास पाच तास तुफान पाऊस
    रस्त्यांना नदीचं स्वरुप
  • 18 Jul 2021 07:05 AM (IST)

    मिरारोड स्टेशन परिसरात पाणी, पाणी तुंबल्यामुळे परिसरातील गाड्या पाण्याखाली

    मध्यरात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे मिरारोड परिसरात पाणीच पाणी... पाणी तुंबल्यामुळे परिसरातील गाड्या गेल्या पाण्यात...मिरारोड स्टेशन परिसरात पाणी

Published On - Jul 18,2021 7:01 AM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.