AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Raut : नारायण राणेंवर मोठं संकट, थेट खासदारकीलाच हायकोर्टात आव्हान, ठाकरे गट अ‍ॅक्शन मोडवर

Vinayak Raut Petition : नारायण राणे यांच्या खासदारकीवर मोठे संकट आले आहे. त्यांच्याविरुद्ध पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गट पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. या विजयाला आव्हान देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Vinayak Raut : नारायण राणेंवर मोठं संकट, थेट खासदारकीलाच हायकोर्टात आव्हान, ठाकरे गट अ‍ॅक्शन मोडवर
राऊतांचे आता राणे यांना हायकोर्टात आव्हान
| Updated on: Jul 13, 2024 | 9:18 AM
Share

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा तापले आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सेनेचे विनायक राऊत यांचा पराभव केला होता. मतदान प्रक्रियेवर त्यावेळी ठाकरे गटाने मोठा आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगावर पण आगपाखड केली होती. खासदार नारायण राणे यांच्या विजयाला आव्हान देण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले होते. राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

राऊतांची हायकोर्टात धाव

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी या निवडणुकीत मते विकत घेतली. त्यांनी मतदारांना धमकावले आणि विजय मिळवल्याचा आरोप शिवसेना नेते विनायक राऊतांनी केला होता. आता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

काय आहेत याचिकेत आरोप?

1. नारायण राणे यांनी मते विकत घेतली. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

2. नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले.

3. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही.

4. आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

5. प्रचारात मतदारांना धमकी तसेच पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याआधारे चौकशी करावी. त्यांची खासदारकी रद्द करावी.

6. याचिकेत नारायण राणे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे.

7. 7 मे रोजी झालेली लोकसभा निवडणूक आणि 4 जून रोजीचा निकाल अवैध आहे, असे घोषीत करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

8. राणे यांनी मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.

9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता