AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती क्लिप डीलिट करू नका, अतिशय भयंकर प्रकरण, 15 दिवस चालेल; सुरेश धस यांच्या विधानाने खळबळ

मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. मी नाही, प्रकाश सोळंकेंनी केली. मोर्चेकरी मागणी करत आहेत. मी कुठे करत आहे? मी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे अजितदादा निर्णय घेतील. अजितदादांनीच निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांचा याच्याशी काय संबंध? आमचं जरा लांबचं नातं आहे. मुंडे आमच्या पक्षाचे नाहीत.त्यामुळे दादांनीच निर्णय घ्यावा, असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.

ती क्लिप डीलिट करू नका, अतिशय भयंकर प्रकरण, 15 दिवस चालेल; सुरेश धस यांच्या विधानाने खळबळ
suresh dhasImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 28, 2025 | 6:00 PM
Share

खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये कराड एका महिला पोलीस अधिकाऱ्याला आरोपीला सोडून देण्यास सांगताना दिसत आहेत. शिवाय बीड जिल्ह्याचा मीच बाप आहे, असं म्हणतानाही वाल्मिक दिसत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण काय आहे? ही महिला पोलीस अधिकारी कोण आहे? आरोपी कोण आहे? असं काय घडलं होतं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. त्यातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ती क्लिप डीलिट करू नका. हे प्रकरण अत्यंत भयंकर असून पुढचे 15 दिवस चालणार आहे, असं मोठं विधान केल्याने या प्रकरणाचा सस्पेन्स अजूनच वाढला आहे.

भाजप आमदार सुरेश धस हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या क्लिपचा सीरिअसनेस तुम्हाला माहीत नाही. मला त्याचं गांभीर्य माहीत आहे. वाल्मिकने कोणत्या महिला अधिकाऱ्याला फोन केला? ही महिला अधिकारी कोण आहे? तो आरोपी कोण आहे? आकाने फोन करण्याचं कारण काय? या सर्व गोष्टी मला माहीत आहे. तुम्ही आधी जाऊन त्याचा शोध घ्या. नंतर मला विचारा. मी तुम्हाला उत्तर देईन, असं सुरेश धस म्हणाले.

माझ्याकडे भरपूर माहिती

किरकोळ केस आहे हे कोण म्हणालं? मी नाही म्हणालो. त्या क्लिपमध्ये आलंय. आकाने कोणत्या महिलेला फोन केला? प्रकरण काय आहे? हे मीडियाने बाहेर आणावं. त्यावर मी नंतर उत्तर देईल. या क्लिपच्या संदर्भात माझ्याकडे भरपूर माहिती आहे. पण याचं उत्तर मी आज देणार नाही.

माझी अपेक्षा आहे की, ही मुंबईची मीडिया आहे. तुम्ही मंत्रालयातील पत्रकार आहात. म्हणजे तुम्ही राज्याची पत्रकारिता करता. तुमचे प्रतिनिधी जिल्ह्यात आहेत. त्यांना पाठवा. 87 की 77 नंबरची महिला अधिकारी कोण? त्यांनी स्पीकर ऑन का केला? किरकोळ प्रकरण आहे हे आका कुणासमोर बोलला? सोडून दे असं का सांगितलं? याची चौकशी करा. ही क्लिप 15 दिवस चालणार आहे. लक्षात ठेवा. डीलिट करू नका, असं सूचक विधान सुरेश धस यांनी केलं.

पंकजाताईंचं वाक्य

या वर्षीच्या भगवान भक्ती गडावर जो दसरा मेळावा झाला, त्यात आमच्या पंकजा ताईंनी एक वाक्य वापरलं होतं. ज्यांच्याशिवाय धनंज मुंडे यांचं पान हलत नाही, असे वाल्मिक अण्णा. पंकजा ताईंचं हे वाक्य तुमच्याकडे स्टोर असेल तर ते वाक्य काढून ठेवा. कारण आज जो त्या लेडीजचा फोन झालाय तो अतिशय भयानक प्रकरणातील आहे. मग ते पानही धनंजय मुंडेंशिवाय हललंय की नाही हे मला बघायचंय, असंही ते म्हणाले.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल