मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात विशेष चेंबरची उभारणी; रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षण

वैद्यकीय शिक्षण संचालनालाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते या चेंबरचे उद्घाटन करण्यात आले. हा प्रयोग वैद्यकीय क्षेत्रातील मोठी क्रांती मानली जात आहे. | Virus protection chamber

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 7:39 AM, 7 Mar 2021
मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात विशेष चेंबरची उभारणी; रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षण
या चेंबरमध्ये रुग्णावर सोनोग्राफीपासून व्हेंटिलेटरवर लावणे, इतर तपासणी व उपचार योग्य खबरदारी घेऊन करता येतात.

मुंबई: मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ये-जा करणारे रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व्हायरस प्रोटेक्शन प्रेशराईज चेंबरची’ उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांचे कोणत्याही विषाणुपासून (Virus) संरक्षण होईल. हे देशातील पहिले व्हायरस प्रोटेक्शन प्रेशराईज चेंबर आहे. (Virus protection chamber in Mumbai Hospital)

वैद्यकीय शिक्षण संचालनालाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते या चेंबरचे उद्घाटन करण्यात आले. हा प्रयोग वैद्यकीय क्षेत्रातील मोठी क्रांती मानली जात आहे.

व्हायरस प्रोटेक्शन प्रेशराईज चेंबरमुळे नक्की काय होणार?

कोरोनाबधित किंवा इतर कोणत्याही विषाणूबाधित रुग्णापासून विषाणू संसर्ग हा आरोग्य कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक यांना होऊ नये, यासाठी या आयसोलेटेड चेंबर्सची निर्मिती जे.जे. रुग्णलयाच्या सर्जरी डिपार्टमेंटच्या डॉक्टरांच्या टीमने केली आहे.

या चेंबरमध्ये रुग्णावर सोनोग्राफीपासून व्हेंटिलेटरवर लावणे, इतर तपासणी व उपचार योग्य खबरदारी घेऊन करता येतात. तसेच रुग्णाला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेताना सुद्धा संसर्गाची शक्यता इतरांना कमी असते. प्रायोगिक तत्वावर हे चेंबर मुंबईतील रुग्णलयात वापरण्यात येणार असून भविष्यात याची संख्या वाढवली जाऊ शकते.

गेल्या 24 तासांत राज्यात 10 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाची स्थिती पाहायची झाली तर कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाचे 10 हजार 187 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात दिवसभरात 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईची आकडेवारी पाहिली तर मुंबईत शनिवारी 1 हजार 188 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 5 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक पातळीवरही जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक नियमावली जारी करण्यात आलीय. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. अशास्थितीतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

राज ठाकरे मास्क घालत नाहीत! पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय

कोरोनाने घेरले, नागपूर आज आणि रविवारी बंद; मिनी लॉकडाऊनही सुरू

(Virus protection chamber in Mumbai Hospital)