AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon update : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये नदी नाले एक होणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये धो-धो पाऊस कोसळत आहे. दरम्यान त्यानंतर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Monsoon update : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये नदी नाले एक होणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 25, 2026 | 10:12 PM
Share

आनंदाची बातमी आहे, तळकोकणात अडकून बसलेला मान्सून अखेर तळकोकणातून बाहेर पडला आहे. आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापून टाकला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील काही दिवस म्हणजे 26 जून ते 30 जून या कालावधीमध्ये राज्यात दमदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) कडून वर्तवण्यात आला आहे. या सर्वा पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा देखील मान्सून अंदाज समोर आला असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

काय आहे नवा अंदाज?

पुढील पाच दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, 26 जुन ते 30 जुन या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या ज्या भागांमध्ये अजूनही चांगला पाऊस झालेला नाही तिथे देखील चांगला पाऊस होईल, शेतकऱ्यांनी चिता करू नये, सर्वांच्या पेरण्या होणार आहेत. राज्यात पुढील काही दिवस चांगला पाऊस होणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. येत्या 26 ते 30 जूनपर्यंत पश्चिम महाराष्ट्र,  सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा मराठवाड्यात बीड,  लातूर, या पट्ट्यांमध्ये चांगला पाऊस होणार आहे, असं डख यांनी म्हटलं आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीचा इशरा 

दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा डख यांनी दिला आहे. या काळात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून, काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस होईल असं डख यांनी म्हटलं आहे. तसेच यंदा राज्यता दुष्काळ पडणार नाही, राज्यात परतीचा पाऊस जोरदार होणार आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. फक्त शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यावी, जर एक इतिपेक्षा जास्त ओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा शेतात चांगली ओल होण्याची वाट पहावी असं आवाहानही डख यांनी केलं आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!