मुंबईत 9 आणि 10 जुलैला पाणीपुरवठा बंद

पालिकेतर्फे येत्या 9 तारखेच्या दुपारी 12 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी  दुपारी 12 वाजेपर्यंत या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे

मुंबईत 9 आणि 10 जुलैला पाणीपुरवठा बंद
Follow us
| Updated on: Jul 07, 2019 | 12:53 PM

मुंबई : पालिकेच्या जल विभागातर्फे तानसा पश्चिम या जलवाहिनेचे आणि माहीम फाटकाजवळील जलवाहिनी खंडीत करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी 9 जुले आणि बुधवार 10 जुलै या दोन्ही दिवशी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई येथील तानसा पश्चिम १८०० मि.मी. व्‍यासाच्‍या जलवाहिनीच्‍या दुरुस्‍तीचे काम, तसेच जी-उत्तर विभागातील धारावी येथील माहीम फाटकाजवळ १८०० मि.मी. व्‍यासाची वैतरणा व अप्‍पर वैतरणा जलवाहिनी खंडि‍त करण्‍याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 9 व 10 जुलैला अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि धारावी परिसरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पालिकेतर्फे येत्या 9 तारखेच्या दुपारी 12 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी  दुपारी 12 वाजेपर्यंत या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास 24 तासांसाठी अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि धारावी परिसरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद

के-पूर्व अंधेरी : छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, एम. आय. डी. सी. ट्रान्‍स रेसिडेन्‍सी, सुभाषनगर, सारीपुतनगर, विजयनगर, पोलिस कॅम्‍प, मरोळ गावठाण, मिलिटरी रोड, भवानीनगर, चिमटपाडा, सगबाग, मकवाना रोड, ओमनगर, सहार गाव, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, इस्‍लामपुरा, पारसीवाडा, चकाला गांवठाण, जे. बी. नगर, मुळगाव डोंगरी, बामणवाडा, कबीरनगर, लेलेवाडी, टेक्निकल क्षेत्र, तरुण भारत सोसायटी, एअर पोर्ट परिसर

एच-पूर्व: वांद्रे टर्मिनस परिसर

जी-उत्तर : धारावी सायंकाळी ४ ते ९ या वेळेतील पाणीपुरवठा बंद, धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड व दिलीप कदम मार्ग

जी-उत्तर : धारावी सकाळी ४ ते दुपारी १२ या वेळेतील पाणीपुरवठा बंद, प्रेम नगर, नाईक नगर, ६०’ रोड, जस्मिन मिल रोड, मांटुगा लेबर कॅम्प, ९०’ रोड, एम. जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास रोड

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.