पाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता

Weather Update : येत्या दोन दिवसांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या असून या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालेत आहे.

पाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता
धुळीच्या वादळानं मुंबईची दृश्यमानता ढासळली
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 7:58 AM

मुंबई : पाकमधील धुळीच्या वादाळानं (Dust Cyclone) मुंबईसह संपूर्ण राज्याच्या वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, येत्या दोन दिवसांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या असून या पावसामुळे (Unseasonal Rain) पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालेत आहे. वाढलेल्या थंडीत पावसाच्या शक्यतेनं बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईतील दादर , लोअर परेल, महालक्ष्मी आणि आसपासच्या भागात पावसाचा हलक्या सरींमुळे हवामानात गारवा (Low Temperature) वाढल्याचं जाणवलंय. मुंबई, ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली होती. मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण दिवसभर पाहायला मिळालं. दरम्यान, यापूर्वी थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र रविवारी कोसळलेल्या सरींमुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झालाय. येत्या काही दिवसात किमान तापमान 15 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे गावच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजा संकटात सापडलाय. तर दुसरीकडे मुंबईत हुडहुडी वाढली आहे.

कोकण पुन्हा अवकाळीची शक्यता

रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झालाय. पण पुढील दोन दिवसात कोकणात अवकाळी पावसाचा इ्शारा हवामान खात्याने वर्तवलाय. सध्या वातावरणाच अचानक बदल घडलेले पहायला मिळतायत. कडाक्याची थंडी गायब झालीय. तर सकाळपासून अनेक ठिकाणी मळभ असलेले पहायला मिळतेय. कोकणात पुढील दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सध्या किनारपट्टी भागात ढगाळ हवामान असलेलं पहायला मिळंतय.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. समुद्राचं तापमान वाढल्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये अवकाळी पाऊस झालाय. रविवारी सकाळपासून ढगाळ हवामान पाहायला मिळालं होतं. दरम्यान, येत्या 24 तासांत पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे ढगाळ हवामानामुळे आंबा बागायतदार धास्तावलेत.

जाणकारांचं काय म्हणणंय?

वातावरणात कार्बनचं प्रमाण वाढलं असून तापमान वाढ झाली असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. सहारा वाळवंटात ऐतिहासिक बर्फवृष्टी सुरू आहे. त्याचेही परिणाम जाणवू लागले आहेत. सिमेंट आणि वीज निर्मितीमुळेही वातावरणात बदल घडत असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत यांनी व्यक्त केलंय. मानवजात आणि पृथ्वीच्या ऊच्चाटनाची ही सुरवात असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुढील 12 तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे (तास 20-30 किमी) येण्याची शक्यता आहे. मुंबई ठाणे पालघर आणि आसपासच्या भागांत या सगळ्याचा परिणाम जाणव्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Video | बारीक, सडपातळ लोकांनी किनाऱ्यावर जाऊ नका, उडून जाल- चांद नवाब

हवामानातील बदलाचा मुंबईकरांना फटका

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.