मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार गारगार, पश्चिम रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

mumbai ac local | लोकल प्रवासात नेहमी घामाघूम होणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबईकरांचा प्रवास सोमवार ६ नोव्हेंबरपासून अधिक चांगला होणार आहे. पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे आणखी वातानुकूलित रेल्वे सुरु करणार आहे.

मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार गारगार, पश्चिम रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय
ac local on western railwayImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 10:03 AM

गोविंद ठाकूर, मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : मुंबईकरांना लोकल प्रवासाचा चांगला अनुभव मिळणार आहे. घामाघूम होणार मुंबईकरांचा प्रवास गारगार होणार आहे. पश्चिम रेल्वेने 6 नोव्हेंबरपासून आणखी 17 एसी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वातानुकूलित रेल्वेतून मुंबईकरांचा प्रवास होणार आहे. पश्चिम रेल्वे 6 नोव्हेंबरपासून आणखी 17 एसी ट्रेन सुरु करणार असल्यामुळे एकूण ट्रेनची संख्या 96 वर जाणार आहे. तसेच मध्य रेल्वे मार्गावर आणखी 10 एसी लोकल ट्रेन सुरु होणार आहे. ही लोकल ट्रेन सीएसटीएम ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा दरम्यान धावणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नवीन एसी ट्रेन चर्चगेट ते विरार दरम्यान धावणार आहे.

या वेळेत धावणार ट्रेन

पश्चिम रेल्वे 6 नोव्हेंबरपासून आणखी 17 एसी कंडिशन ट्रेन सेवा सुरू करणार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये 31 एसी लोकल धावत होत्या. आता ही संख्या 96 वर जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. नवीन एसी रेल्वेमुळे प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे. आरामदायक प्रवासाचा अनुभव त्यामुळे मुंबईकरांना मिळणार आहे.

  • 17 एसी लोकल सेवांपैकी बोरिवली ते चर्चगेट दरम्यान सकाळी 7.47, सकाळी 9.35 आणि 11.23 वाजता जलद ट्रेन धावतील.
  • चर्चगेट येथून संध्याकाळी 3.07 वाजता (विरार जलद), संध्याकाळी 6.22 (विरार जलद) आणि रात्री 9.23 (भाईंदर स्लो) या एसी लोकल सुरु होणार आहे.
  • या सेवा सोमवार ते शुक्रवार एसी सेवा म्हणून चालतील आणि शनिवार आणि रविवारी नॉन-एसी सेवा म्हणून चालतील. पश्चिम रेल्वे नवीन एसी लोकल सुरु करत असले तरी लोकल फेऱ्या वाढणार नाही. लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणेच 1394 असणार आहेत.
  • डहाणू-अंधेरी (am 6.05) सेवांची एक जोडी चर्चगेटपर्यंत वाढवण्याचा निर्णयही WR ने घेतला आहे. चर्चगेट येथून ही ट्रेन सकाळी ७.१७ वाजता डहाणूसाठी सुटेल. त्यामुळे काही उपनगरीय सेवांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत.
  • मध्य रेल्वेने देखील 6 नोव्हेंबरपासून आपल्या मेनलाइनवरील AC सेवांची संख्या 66 पर्यंत वाढवली आहे. याआधी पश्चिम रेल्वेत 56 AC लोकल धावत होत्या.
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO.
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते.
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया.
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी.
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?.
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम.
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.