AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Jadhav: तू काय तुडवणार आम्हाला? खासदार संजय जाधवांचे संजय राऊत यांना थेट आव्हान, परभणीत राडा होणार?

Sanjay Jadhav Challenges to Sanjay Raut: उद्धव सेनेतील फुटीर खासदारांनी शिंदे सेनेचा कासरा हाती घेतलाच नाही तर आता उद्धव सेनेवर ते गुरगुरायलाही लागले आहेत. खासदार संजय राऊत हे शिवराळ भाषा वापरत असल्याचा आरोप करत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे.

Sanjay Jadhav: तू काय तुडवणार आम्हाला? खासदार संजय जाधवांचे संजय राऊत यांना थेट आव्हान, परभणीत राडा होणार?
उद्धव ठाकरे, संजय राऊत, संजय जाधवImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 23, 2026 | 11:00 AM
Share

Sanjay Jadhav Challenges to Sanjay Raut: उद्धव सेना पुन्हा एकदा फुटली. सहा खासदारांनी विकासाचा ध्यास असल्याचा दावा करत शिंदे सेना जवळ केली. त्यांच्या या निर्णयाने उद्धव सेनेते अस्वस्थता आहे. खासदार संजय राऊत बंडखोरांवर तुटून पडले आहेत. त्यांनी या खासदारांवर गंभीर आरोप करत जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशन तुडवा राबवणार असल्याचे म्हटले आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची भाषा केली आहे. तर उद्धव सेनेतून फुटून शिंदे सेनेत गेलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. ते शिवराळ भाषा वापरत असल्याचे म्हणत राऊतांना थेट आव्हान दिले आहे.

तू काय तुडवणार आम्हाला?

ऑपरेशन टायगरप्रमाणेच आम्ही ऑपरेशन तुडवा करणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर खासदार संजय जाधव यांनी थेट प्रतिक्रिया दिली. तु काय आम्हाला तुडवणार? अरे तुडवायला सुद्धा दम लागतंय ना. असं म्हटल्यानं काय होतं? संजय राऊत यांनी कधी कुणाला चापट मारली का, राऊतांनी अशा कोणत्याही गोष्टी करू नये, असे जशाच तसे उत्तर संजय जाधव यांनी दिले. त्यांच्या तोंडून ही भाषा शोभत नाही. ते वैचारिक लेव्हलने उंचीचे माणूस आहेत. त्यांनी वैचारिक भाषा करावी. तुडवायची भाषा त्यांनी करू नये. ती भाषा आम्ही करावी, असे जाधव म्हणाले.

राऊत साहेब मोठा वक्ता आहे. देशपातळीवरच्या माणसाने तुडवायची भाषा करु नये. त्यांना खालंच काहीच माहीत नाही. ते कधी लोकांमधून निवडूनच आले नाहीत.उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर कुणीही टीका करायची नाही उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे व्यतिरिक्त कुणाला मोजायची गरज नाही अशी बोचरी टीकाही संजय जाधवांनी राऊतांवर केली.

दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात

तर धनुष्यबाण हा उद्धव ठाकरे यांचा की एकनाथ शिंदे यावर ही त्यांनी भाष्य केले. 2029 ची निवडणूक आम्ही लढवू आणि ती जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी इच्छाही संजय जाधव यांनी व्यक्त केली. आम्ही शिवसेनेत पक्ष प्रवेश का केला याची कारणे तुम्हाला माहीत आहे. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आम्हाला निर्णय घ्यावा लागला. परभणीने कायम धनुष्यबाणाला साथ दिली आहे. आम्हाला पैश्येच घ्यायचेच असते तर आम्ही 2022 लाच गेलो असतो. एवढा उशीर लावला नसता. आम्ही ज्यांच्यासोबत राहीलो तेच आमच्यासोबत नव्हते. जर तुम्ही माझ्यासोबत (कार्यकर्त्यांना उद्देशून) नसते तर न बोलवता इथे आले नसते. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करुन बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा आम्हाला संधी मिळाली, असे संजय जाधव म्हणाले.

आरोप प्रत्यारोपाकडे लक्ष देऊ नका

ज्या दिवशी शिंदे साहेब येतील त्या दिवशी मनमुराद बोलू. आम्ही शिवसेनेत गेलो त्याला कारण हेच सगळे हे म्हणत होते तुम्ही येता का आम्ही जाऊ. कार्यकर्ते याच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतला. शिवसेनेला धनुष्यबाण परभणीने दिला तेव्हा पासून परभणीचा खासदार आणि आमदार पडले नाही. नंतर आघाड्या बिघड्या झाल्या बंड झालं काही लोक म्हनतात तुम्ही पैसे घेऊन गेलेत का पण आम्ही विकासासाठी गेलो विरोधी पक्षाला सत्ताधारी निधी देत नाहीत कार्यकर्ते यांची काम होत नाहीत म्हणून निर्णय घेतला. ज्यांच्या सोबत राहिलो ते सुद्धा आपल्या सोबत नाहीत. त्यामुळे विरोधात राहून विरोध करायचा असं ठरवलं, असे संजय जाधव म्हणाले.

आपल्या कडे तीन वर्ष आहेत त्या काळात विकास करून घ्यायचा. सईद खान हेच सगळा माल हेच खाऊ लागले आम्हाला काही मिळत नव्हतं शिवसेनेला घराचा आहेर दिला. आंनद राव यांचं स्वप्न पूर्ण होण्याच राहील लोकांमध्ये रहा तुम्हाला सुद्धा लोक आमदार करतील नाव न घेता राहुल पाटील याच्यावर बोचरी टीका केली. मुसलमान म्हणून सईद खान यांना विरोध झाला पण ते निवडून आले. आज पक्षाला एक आमदार आणि एक खासदार भेटला आपण विरोधी पक्षात नाहीत एकाच पक्षात आहोत. आता विरोधाकांनी ठरवा एकदा दूध का दूध पाणी पाणी होणार नाव न घेता आमदार राहुल पाटील यांच्यावर टीका केली. आपण मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे याच्या शिवसेनेत आलो कोण आरोप करतो यावर लक्ष देऊ नका असा कानमंत्र संजय जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?