AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एखाददूसरा व्यक्ती मेल्याने काय होतं? कबूतर बचाओ धर्मसभेत कैवल्य रत्न महाराजांच वक्तव्य

"एखादा माणूस झाडाचं पान अंगावर पडून मेला हे मान्य कराल का? हा मूर्खपणा आहे. कबुतराच्या विष्ठेमुळे जीव जाईल का? असं बोलत असतील, तर मी डॉक्टरांना सुद्धा मूर्ख मानतो" असं वक्तव्य कैवल्य रत्न महाराजांनी केलं.

एखाददूसरा व्यक्ती मेल्याने काय होतं? कबूतर बचाओ धर्मसभेत कैवल्य रत्न महाराजांच वक्तव्य
kaivalya ratan maharaj
| Updated on: Oct 11, 2025 | 12:14 PM
Share

कोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतील कबूतर खाने बंद झाले आहेत. हे कबूतर खाने पुन्हा सुरु व्हावेत अशी मागणी काहीजण करत आहेत. त्यासाठी आज दादरच्या योगी सभागृहात कबूतर बचाओ धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. या धर्मसभेच्या निमित्ताने जैन, हिंदू,बौद्ध धर्मगुरु एकाच मंचावर आले. या धर्म सभेत कैवल्यरत्न महाराज यांनी एक वक्तव्य केलं. त्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘एखाददुसरा व्यक्ती मेल्याने काय होतं?’ असं कैवल्य रत्न महाराज यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘मी डॉक्टरांना मूर्ख मानतो’ असं देखील ते म्हणाले. “कबूतर एक बहाणा आहे. कबुतराला एक शस्त्र बनवलं आहे. कबूतराशी काही देणंघेणं नाही. कबूतराच्या विष्ठेतून जो रोग पसरतो त्याच्याशी देणंघेणं नाही. एखादा माणूस मेला त्याच्याशी काही देणं घेणं नाही” अशी वक्तव्य कैवल्य रत्न महाराज यांनी केली आहेत.

झाडाचं पान अंगावर पडून मेला हे मान्य कराल का?

“हजारो, लाखो निष्पाप लोक मरतायत, त्या बद्दल कोणी विचार करत नाहीय. पाण्यासासाठी तडफडतायत त्या बद्दल कोणाकडे विचार करायला वेळ नाही. एखादा माणूस झाडाचं पान अंगावर पडून मेला हे मान्य कराल का? हा मूर्खपणा आहे. कबुतराच्या विष्ठेमुळे जीव जाईल का? असं बोलत असतील, तर मी डॉक्टरांना सुद्धा मूर्ख मानतो” असं वक्तव्य कैवल्य रत्न महाराजांनी केलं.

‘मिशनरी वाले गरिबांना फसवत आहेत’

“ही शांती सभा नाही तर क्रांती सभा आहे. एक संकल्प करण्यासाठी जमलो आहोत.⁠ आज असं वाटते की एक छोटासा कुंभ होतोय. ⁠जेव्हा राष्ट्र धर्माची हानी होते म्हणून एवढे आक्रमक व्हावे लागत आहे. आमचा वारकरी संप्रदाय मोठा आहे. ⁠कोणत्याही ⁠कसायाजवळ हत्यार आहे, गाय वाचवण्यासाठी निघाले त्यांच्या जवळ हत्यार नाही. ⁠या देशाच्या संस्कृतीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. ⁠आपला धर्म गायीला मानतो. मिशनरी वाले गरिबांना फसवत आहेत” असं अखिल भारतीय सन समिती महामंत्री भारतानंद सरस्वती म्हणाले.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.