हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; कोण आहेत नगराळे?

सचिन वाझे प्रकरणी अखेर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. (who is hemant nagrale?, know about details)

हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; कोण आहेत नगराळे?
Hemant Nagrale
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 5:55 PM

मुंबई: सचिन वाझे प्रकरणी अखेर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपद हे डीजी दर्जाचं आहे. त्याच दर्जाचा अधिकारी या पदावर असावा म्हणून नगराळे यांच्याकडे हे पद सोपवण्यात आलं आहे. कोण आहेत नगराळे? कशी आहे त्यांची कारकिर्द याचा घेतलेला हा आढावा. (who is hemant nagrale?, know about details)

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण

नगराळे यांचं इयत्ता सहावीपर्यंतचं शिक्षण चंद्रपूरच्या भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी नागपूरला आले. नागपूरच्या पटवर्धन शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आताच्या व्हीएनआयटीमधून बीई मेकॅनिकलची पदवी घेतली. तर मुंबतून फायनान्स मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

19 महिनेपदावर राहणार

हेमंत नगराळे हे 19 महिनेच मुंबईच्या आयुक्तपदी राहणार आहेत. नगराळे हे 19 महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर मोठा काळ राहता येणार आहे.

पहिली नियुक्ती नक्षली भागात

आयपीएस अधिकारी झाल्यानंतर नगराळे यांची पहिली नियुक्ती चंद्रपूरच्या राजुरा येथे नक्षली भागात झाली होती. 1989 ते 92 दरम्यान त्यांनी या ठिकाणी एएसपी म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर त्यांना सोलापूरचे डीसीपी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 1992 मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर त्यांनी सोलापूरमधील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळली होती.

नगराळे यांची कारकीर्द

हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

नगराळे आणि वाद

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असताना मार्च 2018 मध्ये हेमंत नगराळे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं होतं. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी दिले होते. विधानपरिषदेच्या सभापतींच्या परवानगीविना कोणत्याही आमदारावर गुन्हे दाखल करता येत नाहीत. त्यामुळे नगराळेंसह उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश त्यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते. (who is hemant nagrale?, know about details)

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात तक्रार

नगराळेंच्या कार्यकाळात पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. एका बांधकाम व्यावसायिकाला पुरवण्यात आलेले संरक्षण हेमंत नगराळे यांनी काढून घेतले होते. या प्रकरणी बिल्डरने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर न्यायालयाने नगराळेंना झापलेही होते.

पुरस्कार

नगराळे यांना सेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळालं आहे. तसेच विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकानेही सन्मानित करण्यात आलं आहे. (who is hemant nagrale?, know about details)

संबंधित बातम्या:

 अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

‘पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनं काही साध्य होत नाही’, परमवीर सिंहांच्या उलबांगडीनंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

LIVE | राज्य सरकारचा मोठा निर्णय, परमबीर सिंग यांच्यावर गृहरक्षक दलाची जबाबदारी

(who is hemant nagrale?, know about details)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.