LIVE | नवी मुंबईमध्ये दिवसभरात 318 कोरोनाग्रस्तांची वाढ, उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | नवी मुंबईमध्ये दिवसभरात 318 कोरोनाग्रस्तांची वाढ, उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू
Breaking News

| Edited By: prajwal dhage

Mar 18, 2021 | 1:13 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 17 Mar 2021 11:01 PM (IST)

  नवी मुंबईमध्ये दिवसभरात 318 कोरोनाग्रस्तांची वाढ, उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू

  नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. नवी मुंबईत आज दिवसभरात तब्बल 318 रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 58 हजार 218 वर पोहोचली आहे. येथे सध्या  सक्रिय  कोरोनाबाधितांची संख्बाया 2012 असून येथे आतापर्यंत 1144 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, येथे सिनेमा, हॉटेल, रेस्टॉरंट येथे क्षमतेच्या 50 टक्के प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळ येथे  कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

  सर्व सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम- मिरवणुका सरसकट बंद, घरी बाधीत रुग्ण असल्यास दर्शनी फलक केला गरजेचा, बधिताने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्यास रुग्णाला बळजबरीने कोविड केंद्रात दाखल करणार, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी -खाजगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम प्रोत्साहित करण्याचे निर्देश

 • 17 Mar 2021 10:18 PM (IST)

  वसईमध्ये मार्केटला भीषण आग, 20 ते 25 दुकानं जळून खाक

  वसईत : वसई पूर्वेच्या वसंतनगरी येथील दिवाण मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.  सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 20 ते 25 दुकानं जळून खाक झाली आहेत. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंतर मिळवण्यास यश आले असून शॉट शर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीत भाजीपाला विक्रेते, कपड्याचे दुकान, मासे विक्रेते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 • 17 Mar 2021 10:15 PM (IST)

  मीरा भाईंदरमध्ये सेल टॅक्स ऑफिसर लाच लुचपतच्या जाळ्यात, 5 हजार रुपये लाच स्वीकारल्याचा आरोप

  मीरा भाईंदर : मीरा भाईंदरमधील वस्तू आणि सेवाकर विभागातील (सेल टॅक्स ऑफिसर) महिला अधिकारी मीना गिरीश सांडये यांना लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांनी 5 हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

 • 17 Mar 2021 08:46 PM (IST)

  रायगडमध्ये कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ, दिवसभरात 307 नवे रुग्ण

  रायगड : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

  जिल्ह्यात दिवसभरात 307 रुग्ण.

  पनवेल शहरात 212 नव्या रुग्णांची नोंद

  दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

  दिवसअखेर सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 737

  दिवसभरात बरे झालेले रुग्ण 147

 • 17 Mar 2021 08:12 PM (IST)

  राज्यात मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 23,179 नवे रुग्ण, दिवसभरात 84 जणांचा मृत्यू

  महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 23,179 नवे रुग्ण

  दिवसभरात 84 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

  दिवसभरात एकूण 9138 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी

 • 17 Mar 2021 08:05 PM (IST)

  सांगलीमध्ये दिवसभरात 64 नवे कोरोनाग्रस्त, सध्या 465 जणांवर उपचार सुरु

  सांगली कोरोना अपडेट

  जिल्ह्यात आज दिवसभरात 64 नवे कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात आज कोरोनामुळे 1 रुग्णाचा मृत्यू

  जिल्ह्यातील मृतांचा आकडा पोहोचला 1770 वर

  सांगलीमध्ये सध्या 465 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

  सांगलीमध्ये आतापर्यंत 46920 जण कोरोनामुक्त

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 49155 वर वर

 • 17 Mar 2021 07:40 PM (IST)

  चंद्रपूरमध्ये कोरोनाचे 164 नवे रुग्ण, दिवसभरात दोघांचा मृत्यू

  चंद्रपूर: गेल्या 24 तासात 2802 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 164 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

  24 तासात 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

  एकूण कोरोना रुग्ण : 25128

  एकूण कोरोनामुक्त : 23749

  सक्रिय  रुग्ण : 973

  एकूण मृत्यू : 406

  एकूण नमूने तपासणी : 237821

 • 17 Mar 2021 07:23 PM (IST)

  महाराष्ट्राचा डिएनए वेगळा, दबावाखाली येऊन बदल्या केलेल्या नाहीत- संजय राऊत

  राज्याचा डीएनए वेगळा आहे. राज्य सरकारने कोणाच्याही दबावाखाली येऊन पोलीस दलात बदल्या केलेल्या नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी हवेत आरोप करु नयेत. त्यांनी थेट नाव घेऊन आरोप करावेत. मागील काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरु आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बदल्यांचा निर्णय घेतला, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

  या सरकारला कोणाही काही करु शकत नाही. हे सरकार साडे तीन वर्षे टिकणार. आम्हाला आमची जबाबदारी माहिती आहे. नैतिकतेच्या आधावर उद्धव ठाकरे यांनी आजच्या बदल्या केल्या आहेत.

  देशात सर्वाधिक जास्त लोक मुंबईत सुरक्षित आहेत. मुंबईत जिलेटीनचे तुकडे सापडले आहेत. यामागे तुकडे-तुकडे गँगचा काहीही संबंध नाही. देशातील सर्वात बलवान संस्था एनआयए करत आहे. राज्यात एटीएसकडून तपास सुरु आहे. त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येतील.

  आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पाहिली. त्यांनी सत्यापासून फारकत घेतल्याचं दिसलं. स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु आहे. लवकरच तपास बाहेर येईल.

  सचिन वाझे  हे मुंबई पोलीस दलातले अधिकारी होते. त्यांना का निलंबित केलं होतं याची माहिती मुख्यमंत्री यांना माहिती आहे. एका दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर वाझे यांना संशयास्पद केलं होतं. फडणवीस या दहशतवाद्याच्या बाजूने बोलत आहेत. मला  तर तसं वाटत नाही, असा टोला संजय राऊत यांना लगावला.

 • 17 Mar 2021 07:11 PM (IST)

  मुंबई पोलिसांच्या मलीन झालेल्या प्रतिमेला सुधारण्याचं काम करणार- नगराळे

  येणाऱ्या काळात मुंबईची मलीन झालेली प्रतीमा त्याला चांगली करण्याचं काम करणार. यामध्ये  सर्वांचं सहकार्य हवं आहे. आणि ते निश्चित मला मिळेल याचा मला विश्वास आहे. आम्ही चांगलं पोलीस दल म्हणून काम करु अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. मागील काही दिवसांपासून पाहतो, की पोलिस अधिकाऱ्यांचा काही घटनांमध्ये समावेश असणे हे योग्य नाही. या प्रकरणाचा विविध संस्थांकडून तपास सुरु आहे. हा तपास योग्य दिशेने होईल असा मला विश्वास आहे. जो दोषी असेल त्याला निश्चित सिक्षा असेल.

  पत्रकारांना वैचारिक पातळीवर न बोलता, सत्य परिस्थितवर बोलावे. ज्या घटनेची चौकशी सुरु आहे. त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. मी नवीन कार्यभार स्वीकारला आहे. माझ्याकडे सध्या घडत असलेल्या घटनांचे कोणतीही माहिती नाही.

  महाराष्ट्र शासनाने मला ही जबाबदारी दिली त्यामुळे मी शासनाचे आभार म्हणतो. सद्या मुंबई पोलिसांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. या काळात सरकारने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली. याबद्दल मी सरकाचा आभारी आहे. चांगलं काम करुन मुंबई पोलिसांचं नाव राज्यात तसेच देशात पुन्हा मोठं करु, तसा मला विश्वास आहे.

 • 17 Mar 2021 06:38 PM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यात आज 34 नवे कोरोनाबाधित रुग्ण, सध्या 267 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

  गडचिरोली : आज जिल्हयात 34 नवे  कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील  कोरोनाबाधित 9966 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9591 वर पोहचली. तसेच सध्या 267 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्हयात एकूण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के असून सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.68 टक्के आहे.

 • 17 Mar 2021 06:17 PM (IST)

  वाझे यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राजकीय बॉसची चौकशी कोण करणार?

  सचिन वाझे, परमबीर सिंह फार छोटे अधिकारी आहेत. सचिन वाझे यांना दिशा देणारे सरकारमध्येे काही लोक बसले आहेत. त्यांचीही चौकशी व्हायला हवा. त्यांची चौकशी कोण करणार?

 • 17 Mar 2021 05:59 PM (IST)

  सचिन वाझे यांना वसुली आधिकार म्हणून सीआयूमध्ये बसवलं गेलं- फडणवीस

  सचिन वाझे यांना अधिकारी म्हणून नाही तर एक वसुली अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. वाझे हे मनसुख हिरेन यांना ओळखायचे. वाझे यांनी हिरेन यांच्याकडून एक गाडी खरेदी केली होती. पण पैसे दिले नव्हते. त्यांनतर पैशांची मागणी केल्यांतर वाझे यांनी हिरेन यांना गाडी वापस केली. त्यानंतर पुन्हा वाझे यांनी ही गाडी परत मागवली.

  जर गाडीची चोरी झाली असती, तर गाडीचे काहीतरी टॅम्परींग झालं असतं. दरवाजा उघडलेला असता. पण तसं काहीही झालं नाही. मला वाटतं की वाझे यांना गाडी अंबानी यांच्या घरासमोर उभं करायचं सांगण्यात आलं. तसेच ही चावी वाझे यांना त्यांना आणून देण्याचं सांगितलं. तसेच, दुसऱ्या दिवशी गाडी चोरीची तक्रार देण्याचेही वाझे यांनी सांगितलं.

  पोलीस हिरेन यांची तक्रार करुन घेत नव्हते. मात्र, यावेळी वाझे यांनी पोलिसांना फोन करुन तक्रार दाखल करण्याचे सांगितले.

  मनसुख हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली.  दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने हिरेन यांची चौकशी केली नाही. यावेळी हिरेन यांची चौकशी दुसऱ्या संस्था करु शकतात हे समजल्यामुळे वाझे हे हिरेन यांना वकिलाकडे घेऊन गेले. तसेच मला अनेकजण त्रास देतात, अनेकजण चौकशी करतात अशी तक्रार करण्याचे सांगितले. यावेळी वाझे यांनी स्व:तचे नाव सुद्धा टाकले.

  एका दिवशी मनसुख यांना फोन आला. गावडे यांनी बोलवलं असल्याचं हिरेन यांना सांगण्यात आलं. वाझे यांच्यावर एक्स्टॉर्शनचे आरोप आहेत, त्याच भागात हिरेन यांना बोलवण्यात आलं. त्यांतर त्यांचा मृतदेह आढळला.

  मला तर असं वाटतं, की वाझे यांना तिथेच मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर त्यांना खाडीत फेकण्याचा प्रयत्न केला गेला. हिरेन यांना हाय टाईडमध्ये फेकून देण्याचा प्रयत्न केला गेला.

  हिरेन यांचा यांच्या तोंडात रुमाल टाकले गेले. हिरेन यांची हत्या झाली. पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट दिलेलं आहे की हिरेन यांच्या फुप्फुसात पाणी नाही. त्यांनी जर खाडीत आत्महत्या केली असती तर त्यांच्या फुफ्फुसात पाणी गेलं असतं. पण तसं नाहीये. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाली.

  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण या दोन्ही घटना एकमेकांशी कनेटक्टेड  आहेत. हो दोन्ही प्रकरणं  एनआयने स्वत:तकडे सोपवली पाहिजेत.

  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपाससुद्धा एनआयकडे गेला पाहिजे.

 • 17 Mar 2021 05:55 PM (IST)

  मुंबईतील सर्व हायप्रोफाईल केसेस सीआययूकडे का जात होत्या? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

  मुंबईतील सर्व हायप्रोफाईल केसेस असतील त्या केसेस ज्या कार्यक्षेत्रात घडत होत्या त्या केसेस सीआययूकडं येत होत्या. त्या केसेस सीआयूला दिल्या जात होत्या. मुंबई पोलीस आयुक्तांच्यानंतर कुणाचं मोठं पद असेल तर सचिन वाझे यांचं होतं. मुख्यमंत्र्यांना ब्रिफींग करातना ते दिसत असतं.

  सचिन वाझे यांनी ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्याकडून खरेदी केली. पण चार महिने पैसे दिले नाहीत. वाझे यांनी ती गाडी मनसुख हिरेन यांना परत दिली. मनसुख हिरेन यांनी गाडी ज्या दिवशी पार्क केली, तिथून गाडी चोरी झाली. मनसुख हिरेन यांची तक्रार घेण्यात आली नाही.

  मनसुख हिरेन यांची चौकशी दुसऱ्या कोणी केली नाही. मनसुख हिरेन यांची चौकशी सचिन वाझे यांनी केली.

  समुद्रात लो टाईड आली त्यामुळे मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत राहिला. हिरेन यांच्या चेहऱ्यावर रुमाल कसे आढळले. त्यांचा श्वास कोंडला जाईल, अशा पद्धतीनं रुमाल बांधले गेले होते. पाण्यात पडून मृत्यू झाला असेल तर त्यांच्या फुप्फुसात पाणी सापडायला हवं होतं. एटीएसनं ज्या प्रकारानं कारवाई केली पाहिजे तशी कारवाई केली पाहिजे तशी होताना दिसत नाही. पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर पुरावे आहेत. एनआयए आणि एटीएसकडे टेप आहेत. त्यामध्ये हिरेन आणि वाझे यांच्यातील संवाद आहेत. एटीएस सुरुवातीसारखं सक्रिय दिसत नाही.

  एटीएसन चौकशीला उशीर केला  आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएने केला पाहिजे. एटीएसवर अविश्वास नाही पण त्यांच्यावर दबाव आहे का? त्यांच्याकडून जसा तपास व्हायला हवा, तसा तपास होत नाही त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएने करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा सर्व प्रकार पोलिसांचं अपयश नसून राज्य सरकारचं अपयश आहे.

  सचिन वाझे यांना त्या पदावर बसवलं त्याप्रकारे सरकारची अडचण  त्यांना माहिती असावी. या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं,ज्या उद्देशानं वाझे यांना त्या पदावर बसवलं त्याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 • 17 Mar 2021 05:49 PM (IST)

  रक्षण करणारेच गुन्हेराग झाले तर रक्षण कोण करणार हा प्रश्न आहे?- देवेंद्र फडणवीस

  मनसुख हिरेने यांची हत्या, अनिल अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं असणं अशा घटना महाराष्ट्रात कधीही घडल्या नाहीत.

  सचिन वाझे यांना सेवेत का घेतले.

  सत्तेत असताना सचिन वाझे यांना सेवेत घेण्याचा दबाव माझ्यावर शिवसेनेने टाकला होता.

  त्यानंतर मी वकिलांचा सल्ला घेईल असं सांगितलं. त्यानंतर वकिलांचा सल्ला आल्यानंतर त्यांच्यावर गंभीर गुन्हे असून त्यांना सेवेत घेता येणार नाही असं मी सांगितलं.

  2020 मध्ये शिवसेनेची सत्ता आली, तेव्हा पुन्हा सचिन वाझे यांना परत सेवेत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या.

  त्यांतर कोरोनाचे नाव समोर करुन, एक रिव्ह्यू कमिटी तयार करण्यात आली. या कमिटीने सांगितले की कोरोनाकाळात अधिकाऱ्यांची गरज आहे.

  हे कारण सांगून सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यात आलं.

  यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सचिन वाझे यांच्यासोबत एक दोन आणखी अधिकाऱ्यांना वापस घेण्यात आलं. बाकीच्या कोणालाही सेवेत परत घेतलं नाही.

  2017 मध्ये एस्क्टॉर्शनचा आरोप झाले. यामध्ये त्यांना जामीन मिळाला.

  सचिन वाझे यांचे एवढे खराब रिपोर्ट असून सुद्धा यांना गुन्हे शाखेत दाखल करण्यात आलं.

  सीआययू  विभागाचे प्रमुख म्हणून सचिन वाझे यांना नियुक्त करण्यात आलं.

  मुंबईतील सर्व हाय प्रोफाईल केकेस सीआयूकडे दिल्या जात होत्या.

 • 17 Mar 2021 04:53 PM (IST)

  राज्य सरकारचा मोठा निर्णय, परमबीर सिंग यांच्यावर गृहरक्षक दलाची जबाबदारी

  सरकारचा मोठा निर्णय

  हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त

  रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

  संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी

  परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जवाबदारी

 • 17 Mar 2021 04:49 PM (IST)

  चंद्रपुरात 33 लाखांचा दारुसाठा जप्त, एकाला अटक

  चंद्रपूर: शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला 33 लाखांचा दारुसाठा

  शहरातील छोटा बाजार आणि नागपूर मार्गावर झाली कारवाई

  टेम्पोतून 2 वेगवेगळ्या घटनांत केली जात होती देशी-विदेशी दारूची वाहतूक

  पोलिसांनी एका आरोपीसह 2 टेम्पो घेतले ताब्यात

  अजूनही 3 जण फरार, होळीच्या पार्श्वभूमीवर दारू तस्करीविरोधातील कारवाई तेजीत

 • 17 Mar 2021 04:09 PM (IST)

  पालघर जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित निवासी आश्रमशाळा, खासगी वस्तीगृह बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  पालघर  : पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित निवासी आश्रम शाळा, खासगी वस्तीगृह आजपासून बंद

  जिल्ह्यात शाळांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे वस्तीगृह निवासी आश्रमशाळा बंदचे आदेश

  पुढील आदेश येईपर्यंत शासकीय अनुदानित निवासी आश्रम शाळा तसेच शासकीय व खाजगी संस्थांची वस्तीग्रहं बंद

  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक राहण्याची व्यवस्था

 • 17 Mar 2021 04:00 PM (IST)

  अंबानींची वकिली करण्याचा अधिकार यांना कोणी दिला?, नाना पटोलेंचे भाजपवर टीकास्त्र

  मुंबई : भाजप नेते आशीष शेलार यांचे आरोप बालिशपणाचे- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

  त्यांच्या आरोपांची कीव करावीशी वाटते

  पेट्रोल, डिझेल दरवाढीकडे लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून हा विषय लावून धरला जातोय

  अंबानींची वकिली करण्याचा अधिकार यांना कोणी दिला

  सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही- नाना पटोले

 • 17 Mar 2021 03:22 PM (IST)

  सध्या राज्याकडे 10 दिवस पुरेल एवढा लसीचा साठा शिल्लक- राजेश टोपे

  दर आठवड्याला 20 लाख कोरोना लसीचे डोस देणे आपेक्षित आहे

  - सध्या राज्याकडे 10 दिवस पुरेल एवढा लसीचा साठा शिल्लक आहे.

  - मी काल केंद्रीय आरोग्य मंत्री यांना याबाबत सांगितलं तसेच मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान मोदी यांना याविषयी माहिती दिली.

 • 17 Mar 2021 03:20 PM (IST)

  राज्यात 85 टक्के कोरोनाग्रस्तांना कोणतेही लक्षण नाही, 3 टक्के रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार

  मुंबई :  राज्यात कोरोना रुग्ण 1 लाखाच्या आसपास आहेत

  85 टक्के  रुग्णांनाकोणतेही लक्षण नाही

  5 टक्के रुग्णांना कृत्रीम ऑक्सीजनवर ठेवले आहे.

  एकूण 3 टक्के रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

  राज्यात कोरोनामुळे मृत्यूदर 4 टक्के आहे

 • 17 Mar 2021 03:02 PM (IST)

  सांगली मार्केटयार्डमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन, शेतकरी हमीभावासाठी आक्रमक

  सांगली : मार्केटयार्डमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन

  जोपर्यंत बेदाण्याला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

  शेतकरी हमीभावासाठी आक्रमक

 • 17 Mar 2021 02:48 PM (IST)

  सचिन वाझे यांच्या घरी NIA ची टीम दाखल

  ठाणे : सचिन वाझे यांच्या घरी NIA ची टीम दाखल, मुंबईहून दोन गाड्यांमध्ये आठ जणांची टीम आली, यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे

 • 17 Mar 2021 02:47 PM (IST)

  महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस द्या, केंद्राकडे मागणी

  PM Narendra Modi Meeting with All state CMs over Covid-19 situation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे नवा प्रस्ताव मांडला. यानुसार 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात यावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या 45 ते 60 या वयोगटातील त्यांनाच लस दिली जाते, ज्यांना अन्य व्याधी आहेत. याव्यतिरिक्त 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस टोचली जात आहे.

 • 17 Mar 2021 12:20 PM (IST)

  मनसुख हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडूनच, फुफ्फुसात खाडीचं पाणी - शवविच्छेदन अहवाल

  मनसुख हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडूनच, फुफ्फुसात खाडीचं पाणी मिळालं आहे, शवविच्छेदन अहवालात हे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे,

 • 17 Mar 2021 11:57 AM (IST)

  गृहखात्यातल्या शिवसेनेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळं शरद पवार नाराज - सूत्र

  गृहखात्यातल्या सेनेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळं शरद पवार नाराज, सूत्रांची माहिती

  परिवहन मंत्री अनील परब गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची शरद पवारांकडे‌ तक्रार

  पवारांनी देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केला विषय

  मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्याच्या स्थगिती प्रकरणानंतर अनील परब यांचा हस्तक्षेप वाढल्याची तक्रार गृहमंत्री यांनी केली होती

 • 17 Mar 2021 11:37 AM (IST)

  गृहमंत्र्यांचा ताफा वर्षा बंगल्यावर दाखल, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

  गृहमंत्री अनिल देशमुखांचा ताफा वर्षा बंगल्यावर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्यांना बोलावलं, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

 • 17 Mar 2021 11:10 AM (IST)

  सरकार आम्ही पाडण्याची गरज नाही - प्रवीण दरेकर

  सरकार आम्ही पाडण्याची गरज नाही, जर अशाच घटना घडत राहिल्या तर साडे तीन तासात सरकार पडेल

 • 17 Mar 2021 11:07 AM (IST)

  सचिन वाझेंच्या लॅपटॉपमधील डेटा डिलीट

  वाझेंच्या लॅपटॉपमधील डेटा डिलीट, एनआयएच्या सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती, मोबाईलही हरवल्याचा वाझेंचा जबाब

 • 17 Mar 2021 10:57 AM (IST)

  विकेंडला जुहू बीचवर नागरिकांना जाण्यास बंदी करावी, भाजपा आमदाराचं आयुक्तांना पत्र

  भाजपा आमदार अमित साटम यांची मुंबई आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी

  मुंबई कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असताना जुहू बीच परीसरात शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टयांच्या दिवशी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते

  या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार जास्त होईल म्हणून या तीन दिवसात जुहू बीच परीसरात नागरिकांना जाण्यास बंद करण्यात यावा

 • 17 Mar 2021 10:51 AM (IST)

  अनिल देशमुखांच्या प्रगती पुस्तकावर मुख्यमंत्री शेरा देतील : संजय राऊत

  कोणती कलमं लावावी याचं मार्गदर्शन फडणवीसांनी करावं, विरोधकांनी वकील असावंच

  पैलवान चितपट झाला बोट वरती आहे, पण मी हरलो नाही हे कोणत्या पैलवानाबद्दल बोलतायेत

  अनिल देशमुखांच्या प्रगती पुस्तकावर मुख्यमंत्री शेरा देतील : संजय राऊत

 • 17 Mar 2021 10:51 AM (IST)

  शार्जील इमाम नावाचे सदगृहस्थ उत्तर प्रदेश सरकारचे - संजय राऊत

  शार्जील इमाम नावाचे सदगृहस्थ उत्तर प्रदेश सरकारचे, त्यांच्याच राज्यात आराम करत आहेत, योगी सरकारने पकडून द्यावं

 • 17 Mar 2021 10:47 AM (IST)

  खाते बदलावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

  खाते बदल हा मुख्यमंत्र्याच्या अधिकारातील विषय, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात, तीन पक्षांचं सरकार असल्याने तिन्ही पक्षाचे नेते याबाबत निर्णय घेतील

 • 17 Mar 2021 10:44 AM (IST)

  एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही - संजय राऊत

  एपीआयमुळे सरकार पडेल, या भ्रमातून बाहेर पडा, केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे, त्यात लक्ष घालण्याची गरज नाही, आमचं सर्व घडामोडींवर लक्ष आहे, त्यामुळे मंत्रीमंडळाच्या बैठका त्यामुळे होताहेत हा विचार करु नका - संजय राऊत

 • 17 Mar 2021 10:42 AM (IST)

  पीपीई किटमधील व्यक्ती सचिन वाझेच - सूत्र

  पीपीई किटमधील व्यक्ती सचिन वाझेच, एएनआयच्या चौकशीत स्पष्ट, सीसीटीव्हीतील व्यक्ती सचिन वाझेच,  - सूत्र

 • 17 Mar 2021 09:50 AM (IST)

  पुण्यातील शासकीय रुग्णालयातले बेड संपले, खाजगी रुग्णालयात रुग्ण भरती करायला सुरुवात

  पुणे -

  - पुण्यातील शासकीय रुग्णालयातले बेड संपले,

  - खाजगी रुग्णालयात रुग्ण भरती करायला सुरुवात,

  - बेड कमी पडत असल्यानं सीओईपीच्या मैदानावरचं जम्बो कोव्हीड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा पालिकेचा निर्णय,

  - जम्बोसाठी 30 कोटी रुपये खर्चाला स्थायी समितीनं दिली मान्यता,

  - सुरुवातीला 200 बेडची व्यवस्था करणार जम्बो हॉस्पिटलमध्ये,

  - दिल्लीच्या आय आय टीनं जम्बोचा सांगाडा योग्य स्थितीत आहे असा अहवाल दिल्यावर जम्बो सुरू करण्याचा घेतला निर्णय ,

  - वाढत्या रुग्णसंख्येनं प्रशासनं हादरलं ,आताचं बेड पडायला लागले कमी.....

  - जम्बो हॉस्पिटल होणार पुन्हा सुरु,

  - स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

 • 17 Mar 2021 09:37 AM (IST)

  त्या स्काॅर्पिओची खरी नंबर प्लेट मर्सिडीजच्या आत सापडली - सूत्र

  अंबानी यांच्या घराबाहेर ऊभ्या असलेल्या स्काॅर्पिओची खरी नंबर प्लेट आणि त्याव्यतिरिक्त इतर नंबर्स प्लेट या काल जप्त केलेल्या मर्सिडीजच्या आत सापडल्याची सूत्रांची माहिती,

  मर्सिडीज कारच्या आत पाच लाख 75 हजारांची रोकड सापडली, केरोसिनची बाॅटल सापडली ज्याचा वापर वाझे हे पीपीई किट आणि हुडीला जाळण्यासाठी करणार होते

  यापैकी डोक्यावरिल कॅप, फेसशिल्ड याला वाझेंनी जाळल्याची धक्कादायक माहिती

  ज्या ठिकाणी हे कॅप आणि फेसशिल्ड जाळण्यात आले, त्याठिकाणी एनआयएची टीम पुरावे गोळा करण्यासाठी जाणार असल्याची एनआयए सूत्रांची माहिती

  कालच्या चौकशीतही हे सगळे केवळ प्रसिद्धी झोतात येण्यासाठी, गेलेली प्रतिष्ठा मिळवण्यासी केल्याचं वारंवार वाझेंनी एनआयए चौकशीत सांगितलंय, या थेयरिवर एनआयएला विश्वास नसल्याचीही माहिती

  जिलेटिनच्या कांड्या कुणी दिल्या, कुठून आणल्या याचा सध्या एनआयएकडून युद्ध पातळीवर तपास सुरु

 • 17 Mar 2021 09:33 AM (IST)

  मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार नाहीत - सूत्र

  मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार नाहीत, पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह हेच आयुक्त असणार आहेत, काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या नेनृत्त्वात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे - सूत्र

 • 17 Mar 2021 09:28 AM (IST)

  पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे आता दिल्लीत साकडे

  कोल्हापूर -

  पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे आता दिल्लीत साकडे

  खासदार संभाजीराजे छत्रपती,संजय मंडलिक,धैर्यशील माने यांच्या सह पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट

  जावडेकर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली बैठक

  राज्यसरकार करत असलेल्या उपाययोजना केंद्रा कडून सहकार्याची केली विनंती

  आवश्यक सहकार्य करण्याची जावडेकर यांची ग्वाही

 • 17 Mar 2021 09:13 AM (IST)

  नाशकात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना, बाजारपेठांमध्ये गर्दी कायम

  नाशिक -

  कोरोनाचा उद्रेक झालेला असताना, बाजारपेठांमध्ये गर्दी कायम

  शहरातील मुख्य बाजारपेठा गजबजलेल्याच

  सोशल डिस्टनसिंग चा फज्जा आणि मास्क चा विसर

  नाशिककरांच्या गर्दी मुळे लॉक डाऊन ची शक्यता बळावली

  जिल्हाधिकारी आज किंवा उद्या निर्णय घेण्याची शक्यता

 • 17 Mar 2021 09:12 AM (IST)

  कोरोना वाढत असल्याने अहमदनगर शहरातील गर्दीवर दक्षता पथकांचा राहणार वॉच

  अहमदनगर -

  कोरोना वाढत असल्याने शहरातील गर्दीवर दक्षता पथकांचा राहणार वॉच,

  महापालिकेकडून चार पथकांची नियुक्ती, तर नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई

  रुग्ण वाढत असल्याने शहरातील दहा ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित

  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची रस्त्यावर उतरून कारवाई

 • 17 Mar 2021 09:11 AM (IST)

  नाशकात आजपासून विवाह सोहळ्यांना पूर्ण बंदी

  नाशिक -

  शहरात आजपासून विवाह सोहळ्यांना पूर्ण बंदी

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांचा निर्णय

  यापूर्वी 50 लोकांमध्ये सोहळा करायला होती परवानगी

  मात्र नाशिक हॉटस्पॉट ठरत असल्याने निर्बंध लागू

  पुढील आदेश येई पर्यंत शहरातील सगळ्या विवाह सोहळ्यावर बंदी

 • 17 Mar 2021 09:11 AM (IST)

  अहमदनगरात लग्नाची वरात काढून डीजेच्या तालावर विनामास्क नाचणाऱ्यांवर गुन्हा

  अहमदनगर -

  रात्री लग्नाची वरात काढून डीजेच्या तालावर विनामास्क नाचणाऱ्यांना गुन्हा दाखल

  कोरोना प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत गर्दी जमवून अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता

  वरपित्यासह डीजेचालकावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  तर डीजेही जप्त करण्यात आला

 • 17 Mar 2021 09:09 AM (IST)

  सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी पदाधिकारी, नगरसेवक, पालिका कर्मचारी पत्रकारांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

  सोलापूर -

  महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी पदाधिकारी, नगरसेवक, पालिका कर्मचारी पत्रकारांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

  निगेटिव्ह अहवाल पाहूनच पालिकेच्या महासभेसाठी देण्यात येणार प्रवेश

  याकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार

  शुक्रवारी होणार आहे पालिकेची महासभा

 • 17 Mar 2021 09:05 AM (IST)

  सचिन वाझे प्रकरणातील मर्सिडीज कार कोणाला विकली गेली होती?

  धुळे -

  सचिन वाझे प्रकरणातील मर्सिडीज कार कोणाला विकली गेली होती

  कोणाकडे होती मर्सडीज कार याचा खुलासा 12 वाजता होणार

  गाडीचे आधीचे मालक सारांश भावसार करणार खुलासा

  प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता

 • 17 Mar 2021 09:04 AM (IST)

  वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश  

  वसई :

  वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

  NGO च्या नावाखाली, फोनवर संपर्क करून, आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघड

  वसई च्या कृष्णा टाऊनशीप परिसरात चालत होते सेक्स रॅकेट

  2 पीडित महिलेची सुटका तर एक आरोपी महिलेला केले अटक

  नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाही

 • 17 Mar 2021 09:01 AM (IST)

  सोलापूर शहरात कोरोनाचा पुन्हा फैलाव सुरु

  सोलापूर -

  शहरात कोरोनाचा पुन्हा फैलाव सुरु

  शहरात सहा महिन्यानंतर बधितांचा आकडा शंभरी पार

  काल शहरात आढळले कोरोनाचे 109 रुग्ण

  तर ग्रामीण भागात 147 कोरोनाचे रुग्ण

  मागील आठवडाभरात नव्याने एक हजार अधिक रुग्णांची भर

 • 17 Mar 2021 09:01 AM (IST)

  सचिन वाझे यांच्या मर्सिडीस गाडीत नोटा मोजण्याची मशीन सापडल्याने आश्चर्य

  सचिन वाझे यांच्या मर्सिडीस गाडीत नोटा मोजण्याची मशीन सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे

  नोटा मोजण्याची मशीन ही बँकेत , होलसेल व्यापार आलेले व्यापारी,आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपन्या वापरत असतात.

  त्याच प्रमाणे नोटा मोजण्याची मशीन ही नेहमी बँकेत, दुकानात किंवा कार्यलयात असते

  वाझे हे ही मशीन गाडीत का ठेवत होते याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

 • 17 Mar 2021 08:08 AM (IST)

  नागपुरात रस्त्यावर फिरणाऱ्या कोरोनाबाधितांवर पाच हजाराचा दंड

  नागपूर -

  रस्त्यावर फिरणाऱ्या कोरोनाबाधितांवर पाच हजाराचा दंड

  महापालिका आयुक्तांचा दणका

  नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणा-या एका कोरोना बाधित रुग्णावर ५,००० चा दंड लावला.

  हा रुग्ण घराचा बाहेर फिरत होता.

  मनपा आयुक्तांनी नुकतेच निर्देश दिले होते की गृह विलगीकरणाचे पालन न करणा-या रुग्णांवर दंड करा

  तसेच त्यांना विलगीकरण केन्द्रात पाठवा. त्या अनुसार ही कारवाई करण्यात आली

 • 17 Mar 2021 08:06 AM (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये गर्दीच्या नियंत्रणासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना '50-50'चा फॉर्म्युला

  पिंपरी चिंचवड -

  -गर्दीच्या नियंत्रणासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना '50-50'चा फॉर्म्युला

  -कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील गर्दी नियंत्रणात असावी यासाठी 50 टक्केच कर्मचारी उपस्थितीचा निर्णय

  - 31 मार्चपर्यंत कर्मचा-यांनी आळीपाळीने महापालिकेत उपस्थित राहण्याचे आदेश

  -वैद्यकीय, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, विद्युत अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना हा आदेश लागू राहणार नाही.

 • 17 Mar 2021 08:05 AM (IST)

  रोह्यातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग, आगीत दुकान पुर्णपणे जळून खाक

  रत्नागिरी -

  रोह्यातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग, आगीत दुकान पुर्णपणे जळून खाक

  रोहा अष्टमी नगर परिषद समोरील भूमिका कलेक्शन ह्या प्रसिद्ध कपड्याच्या दुकानाला पहाटे च्या दरम्यान भीषण आग.

  घटनास्थळी लागलीच रोहा नगरपरिषद अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग विझविण्यात आली.

  परंतु पहाटे ४.३० वा. सुमारास आग लागुन दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविले परंतु त्या आगोदर दुकान पुर्ण पणे जळुन खाक झाले.

  घटनास्थळी उपनगराध्यक्ष. महेशजी कोल्हटकर, नगरसेवक मयूर दिवेकर,नगरसेवक राजू जैन यांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले.

  आगीमध्ये दुकान मालकाचे सुमारे 10 ते 12 लाखाचे नुकसान झाल्याचा अदांज व्यक्त करण्यात येतोय.

 • 17 Mar 2021 07:40 AM (IST)

  नागपुरात लॉकडाऊन आणखी कडक होण्याची शक्यता

  नागपूर -

  नागपुरात लॉकडाऊन आणखी होणार कडक

  आतापर्यंत परवानगी असलेली किराणा, भाजीपाला, फळे, मांस दुकाने (stand alone ) आता दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरु राहतील

  मनपा आपुक्त राधाकृष्णन बी यांनी काढले आदेश

  आज पासून लागू होणार आदेश

  नागपुरात लॉकडाऊन सुरू आहे मात्र या दुकानांना परवानगी देण्यात आली होती

  त्यात बदल करण्यात आला आणि त्या नुसार ही दुकान आता 1 वाजता पर्यंत च राहणार सुरू

  शहरात बंदोबस्त सुद्धा वाढणार

  पोलीस दुकानात जाऊन चेकिंग करणार

 • 17 Mar 2021 07:38 AM (IST)

  नागपुरात कोरोनाचा मोठा ब्लास्ट, गेल्या 24 तासात 2 हजार 587 कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर -

  नागपुरात कोरोनाचा मोठा ब्लास्ट

  गेल्या 24 तासात 2 हजार 587 कोरोना रुग्णांची नोंद

  तर 18 जणांचा मृत्यू झाला

  वर्ष वर्ष भरातील हा सगळ्यात उच्चांकी आकडा

  शहरात लॉक डाऊन सुरू आहे , सगळे निर्बंध कडक असताना सुद्धा रुग्ण संख्या सतत वाढत आहे

  यामुळे प्रशासनाची चिंता वाढली

  प्रशासनाला आणखी कडक पावलं उचलण्याची गरज

 • 17 Mar 2021 07:15 AM (IST)

  नाशकात सहा दिवसात पाचव्यांदा कोरोना बाधितांची संख्या हजारांच्या पार

  नाशिक -

  जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट

  सहा दिवसात पाचव्यांदा कोरोना बाधितांची संख्या हजारांच्या पार

  काल दिवसभरात 1354 नवीन रुग्ण, तर 8 जणांचा मृत्यू

  शहरात कोरोना संदर्भातील निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता

 • 17 Mar 2021 06:53 AM (IST)

  नागपुरात लसीकरण केंद्रांमध्ये आणखी 11 केंद्राचीची भर

  नागपूर -

  नागपुरात लसीकरण केंद्रांमध्ये आणखी 11 केंद्राचीची भर

  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकातर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे नवीन ११ केन्द्र उघडण्यात आले आहे.

  या केन्द्रांमध्ये आज पासून सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत ६० वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांना व ४५ ते ५९ वर्षापर्यंतचे विविध आजाराने ग्रस्त नागरिकांचे लसीकरण केल्या जाईल.

  यासाठी त्यांना डॉक्टर कडून विहीत नमून्यात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  आता नागपूरात ७२ केन्द्रांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

  शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण नि:शुल्क आहे आणि खाजगी रुग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे रु. २५० दर आकारले जात आहे.

  महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नुकतीच झालेल्या एका बैठकीत लसीकरण केन्द्र वाढविण्याचे निर्देश दिले

 • 17 Mar 2021 06:52 AM (IST)

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकले

  पुणे

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकले

  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी विद्यापीठाला शासनाकडून 144 कोटी 62 लाख 88 हजार रुपये येणं बाकी

  थकीत रकमेमुळे विद्यापीठाच्या वेतनावरील भार वाढला

 • 17 Mar 2021 06:51 AM (IST)

  पुणे शहरातील मोठ्या सोसायट्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

  पुणे

  शहरातील मोठ्या सोसायट्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

  शहरात अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 121 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषीत ,

  यामध्ये जवळपास 95 टक्के मोठ्या सोसायट्या तसेच इमारती आहेत

  सर्वाधिक 19 प्रतिबंधित क्षेत्र औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत

  कोरोना रुग्णवाढ झोपडपट्ट्यांच्या तुलनेत सोसायट्यांमध्ये सर्वाधिक

  त्यातही प्रामुख्याने औंध-बाणेर, हडपसर, कोथरूड तसेच सिंहगड रस्ता परिसरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ

 • 17 Mar 2021 06:40 AM (IST)

  पुणे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पाॅट असलेल्या गावांची संख्या वाढली

  पुणे :

  पुणे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पाॅट असलेल्या गावांची संख्या वाढली

  पाच दिवसांपूर्वी केवळ ५० गावे हॉटस्पॉट होती, यात १७ ने वाढ

  जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या ६७ वर

 • 17 Mar 2021 06:40 AM (IST)

  दगडुशेठ हलवाई गणपतीला अपर्ण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार सीआयडीकडून जप्त

  पुणे

  समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारने दगडुशेठ हलवाई गणपतीला अपर्ण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार "सीआयडी'कडून जप्त

  समृद्ध जीवन फुडस्‌च्या महेश मोतेवार याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने(सीआयडी) जप्त केला.

  या सव्वा किलो सोन्याच्या हाराची किंमत 58 ते 60 लाख रुपये इतकी असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून संबंधीत सोन्याचा हार "सीआयडी'कडे सुपुर्द करण्यात आला आहे

 • 17 Mar 2021 06:39 AM (IST)

  पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई, भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवले 

  पुणे

  पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई, भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवले

  बॅंकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती (डेटा) चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

  डेटा खरेदीवेळी 25 लाख रुपये घेताना 10 जणांना अटक, अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्‍यता

  भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी यांच्यासह दहा जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक

 • 17 Mar 2021 06:27 AM (IST)

  नदीत हात धुण्यास जाणे जीवावर बेतले, बल्लारपूर शहरातील वर्धा नदीच्या पाण्यात अल्पवयीन मुलगी बेपत्ता

  चंद्रपूर : वाढदिवस साजरा केल्यावर नदीत हात धुण्यास जाणे जीवावर बेतले, बल्लारपूर शहरातील वर्धा नदीच्या पाण्यात गणपती घाटावर 12 वर्षीय मुलगी बेपत्ता, अक्षरा बबन सोनटक्के असे मुलीचे नाव, अन्य 2 मैत्रिणींसह नदीवर वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती, खोल पाण्यात बुडणाऱ्या अक्षराला वाचविण्याचा दोघींने केला प्रयत्न, पोलिसांना माहिती मिळताच राबविण्यात आले शोध अभियान, बल्लारपूर शहरातील सोनटक्के कुटुंबीय शोकाकुल

 • 17 Mar 2021 06:25 AM (IST)

  चंद्रपुरातील घुग्गुस येथे विवाहित महिलेचा गळफास

  चंद्रपूर : घुग्गुस शहरातील शास्त्रीनगर परिसरात 27 वर्षीय विवाहित महिलेची गळफास घेवून आत्महत्या, लक्ष्मी कुममरी असं मयत महिलेचं नाव असून तिला 5 वर्ष आणि 8 महिण्याचे दोन अपत्य, प्राथमिक माहितीनुसार ही महिला आणि तिच्या पतीमध्ये मोबाईल संबंधात काही तरी वाद होता आणि याच कारणामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज, पती सुरेश कुममरी हा पेंटिंगचे काम करत असून संध्याकाळी तो कामावरुन परत आल्यावर उघडकीस आला प्रकार, घुग्गुस पोलीस करताहेत प्रकरणाचा अधिक तपास

Published On - Mar 17,2021 11:01 PM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें