AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे परमबीर सिंह कोण आहेत?

मुंबई पोलिस आयुक्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्या कामाची सविस्तर माहिती समजून घेऊयात.

गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे परमबीर सिंह कोण आहेत?
| Edited By: | Updated on: Mar 20, 2021 | 6:57 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना अक्षरश: अणूबाँब टाकला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितल्याचा आरोप केला आहे. परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदावरून होमगार्डच्या महासमादेशक पदावर  परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेल्या दहा ते बारा जणांना मागे टाकत परमबीर सिंह यांची यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त पदावर वर्णी लागली होती. (Param Bir Singh Mumbai Police Commissioner)

परमबीर सिंह 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलिस खात्यात अनेक पदांवर काम केलं. ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. त्यांनी सुरुवातीला ठाण्याचे पोलिस उपायुक्त म्हणून देखील काम केलं. यानंतर 2015 मध्ये त्यांची ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात झाली. या काळात त्यांनी ठाण्यातील अनेक मोठ्या प्रकरणांचा छडा लावला. त्यांच्या काळात ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये जवळपास 10 टक्क्यांची घट झाली. तसेच विविध गुन्ह्यांमधील दोषी सिद्ध होण्याचं प्रमाण 8 टक्क्यावरुन 45 टक्के झाले.

परमबीर सिंह यांच्या नेतृत्वाखील ठाणे पोलिसांनी देशभरात गाजलेल्या प्रकरणांचा तपास केला. ठाणे पोलिसांनी मीरा रोड कॉल सेंटर प्रकरणी इक्बाल कासकरला अटक केली. ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या नेतृत्वात सैन्य भरती प्रकरण, अमेरिकेच्या ड्रगविरोधी पथकाने लक्ष घातलेल्या 2000 कोटींचं ड्रग प्रकरण, बेकायदेशीर कॉल रेकॉर्डींग प्रकरण यांचा तपास केला. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर आणि भंडऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे.

हरियाणामधील फरीदाबाद जिल्ह्यातील पावटा मोहबताबाद हे परमबीर सिंह यांचं मूळ गाव. त्यांचे वडील होशियार सिंह हरियाणा नागरी सेवेत अधिकारी होते. त्यांचा भाऊ मनवीर सिंह भडाना हरियाणा पब्लिक सर्विस कमिशनचे प्रमुख आहेत.

कोण आहेत परम बीर सिंह? • परम बीर सिंह हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. • त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागात अनेक पदांवर काम केलं. • लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक पद सांभाळलं. • ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. • परम बीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.

Mumbai Police Commissioner Param Bir Singh

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.