AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री कोण होणार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले…असे असणार सूत्र

who is next cm of maharashtra: मित शाह यांच्याप्रमाणे देशातील सर्व नेत्यांचे राज्यातील नेत्यांचे आम्ही आभार मानतो. या विजयात माझा सहभाग खूप लहान आहे. आमच्या टीमचे मोठे काम आहे. फक्त भाजपच्या जागांवर आम्ही काम केले नाही. तर संपूर्ण २८८ जागांवर भाजपने काम केले.

मुख्यमंत्री कोण होणार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...असे असणार सूत्र
devendra fadnavis
| Updated on: Nov 24, 2024 | 11:52 AM
Share

who is next cm of maharashtra: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवला आहे. त्यात भाजपला सर्वाधिक स्ट्रॉईक रेट आणि जागाही मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप नेते आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची निवड कशी होणार? त्याचे सूत्रच सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे नेते अमित शाह यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसतील. त्यावेळी भाजपचे केंद्रीय नेतृत्व असणार आहे. त्या बैठकीत सर्व संमतीने मुख्यमंत्रीपदाची निवड करण्यात येणार आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

विजयानंतर माध्यमांशी देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. महाराष्ट्राला जनतेला आमचे साष्टांग दडंवत आहे. त्यापेक्षा अधिक काही बोलता येत नाही.आम्ही सांगितले होते आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. चक्रव्यूह आम्ही तोडू शकतो आणि त्यातून बाहेर येऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास राज्यातील जनतेने ठेवलेला हा विश्वास आहे. मोदीजींनी जी घोषणा दिली होती ‘एक है तो सेफ है’ त्यामुळे राज्यातील जनता एक राहिला. राज्यातील लाडक्या बहिणींनी भरभरुन आशीर्वाद दिला.

सर्व राष्ट्रवादी संघटना मैदानात उतरल्या

राज्यात फेक नॅरेटिव्हचा प्रयत्न झाला. परंतु सर्व राष्ट्रवादी संघटना मैदानात उतरल्या. त्यांनी तो फेक नॅरेटिव्ह तोडून काढला. आम्हाला राज्यातील साधू संतांचा आशीर्वाद मिळाला. त्यांना गावागावत जागृती निर्माण केली.

विरोधकांचा सन्मान करणार

देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याप्रमाणे देशातील सर्व नेत्यांचे राज्यातील नेत्यांचे आम्ही आभार मानतो. या विजयात माझा सहभाग खूप लहान आहे. आमच्या टीमचे मोठे काम आहे. फक्त भाजपच्या जागांवर आम्ही काम केले नाही. तर संपूर्ण २८८ जागांवर भाजपने काम केले. राज्यात आता विरोधी पक्षनेता नसेल पण विरोधी पक्षाचे जे लोक निवडून आले आहे, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी पुन्हा निवडणुका बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाला की, जिंकले तर जनमताचा कौल आणि पराभूत झाला तर ईव्हीएममध्ये गोंधळ ही त्यांची नेहमीची कारणे आहे. पंरतु त्याऐवजी त्यांनी आता आत्मचिंतन करा. खरी कारणे काय याचा विचार करायला हवा.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.