BIG BREAKING : शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टविरोधात तक्रार, उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढणार?

शिंदे गटाकडून शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhawan) दावा केला जाऊ शकतो, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु असताना ठाकरे गटाची डोकेदुखी वाढवणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

BIG BREAKING : शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टविरोधात तक्रार, उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढणार?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 6:54 PM

मुंबई : शिंदे गटाकडून शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhawan) दावा केला जाऊ शकतो, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु असताना ठाकरे गटाची डोकेदुखी वाढवणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यामुळे शिवसेना भवनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय घडामोडी घडतात, हे पाहणं सर्वात महत्त्वाचं असणार आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे (Yogesh Deshpande) यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. एखाद्या ट्रस्टची जागा शिवसेना भवनाला कशी दिली? असा प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित केलाय. योगेश देशपांडे यांनी शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टच्या विरोधात तक्रार केलीय.

योगेश देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत प्रतिक्रिया दिलीय. न्यूजमध्ये माहिती मिळाली की, शिवसेना भवनाची जागा ही शिवसेनेची नसून शिवाई ट्रस्टची आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊन तक्रार दाखल केलीय. कारण पब्लिक ट्रस्ट जागा रेंट आऊट करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया योगेश देशपांडे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“ट्रस्टच्या जागेमध्ये कुठल्याही राजकीय उपक्रम राबवता येत नाही. असं असताना सुद्धा इतक्या वर्षांपासून तिथे राजकीय उपक्रम सुरु आहेत. याबाबतल धर्मादाय आयुक्तांनी काय भूमिका घेतली होती? तसेच याबाबत काय कारवाई करणार? हे विचारण्याकरता नोटीस पाठवलीय. याशिवाय आपण PIL देखील करणार आहोत”, असं सामाजिक कार्यकर्ते योगेश देशापांडे यांनी सांगितलं.

आतापर्यंत का तक्रार केली नाही?

“आतापर्यंत हा विषयच समोर आला नव्हता. परवा कोणीतरी म्हणालं होतं की, बाळासाहेबांनी ही एक सिक्रेट अरेंजमेंट केलेली होती. याबद्दल थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं की, अशा अनेक काही जागा घेतलेल्या आहेत का? याची चौकशी व्हावी. म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा केलीय”, अशी भूमिका योगेश देशपांडे यांनी मांडली.

शिवसेनेची कोट्यवधींची मालमत्ता शिंदेंच्या शिवसेनेला

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार हे नक्की आहे. शिवसेना पक्षाचा फंड वापरण्याचीही परवानगी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आमि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नाव आणि पक्ष चिन्ह सह मालमत्ता आणि डिपॉझिट रक्कम वापरण्यासही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

शिवसेना भवनबद्दल शिंदे गटाची नेमकी भूमिका काय?

दरम्यान, शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना भवनाबाबतची शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे. ही लढाई पार्टी फंड किंवा शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती. पक्षाचं चिन्ह आणि नाव महत्त्वाचं होतं. त्यासाठी लढाई होती. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नाही. अधिकार सांगणार नाही. शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. काही लोकांना प्रॉपर्टी वाटत असली तरी आम्ही त्या रस्त्याने गेल्यावर शिवसेना भवनाला नमनच करू. ज्यांना पैशाचा लोभ आहे. त्यांनी बघावं. आमचं ते काम नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जायचं आहे. तोच आमचा अजेंडा आहे, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.