Video : ‘यू आर दी मोस्ट अॅक्टिव्ह मेयर, तुमच्या पक्षातील लोकही घाबरत असतील’, राज्यपालांकडून पेडणेकरांचं कौतुक

यू आर दी मोस्ट अॅक्टिव्ह मेयर, तुम्हाला तुमच्या पक्षातील लोकही घाबरत असतील अशा शब्दात कोश्यारी यांनी महापौर पेडणेकर यांचं कौतुक केलंय.

Video : 'यू आर दी मोस्ट अॅक्टिव्ह मेयर, तुमच्या पक्षातील लोकही घाबरत असतील', राज्यपालांकडून पेडणेकरांचं कौतुक
महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे नेते आज राज्यपाल कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आज राजभवनावर जात त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनीही महापौर पेडणेकर यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. (Happy Birthday to Governor Bhagat Singh Koshyari from Mayor Kishori Pednekar)

यू आर दी मोस्ट अॅक्टिव्ह मेयर, तुम्हाला तुमच्या पक्षातील लोकही घाबरत असतील अशा शब्दात कोश्यारी यांनी महापौर पेडणेकर यांचं कौतुक केलंय. कुणाचाही वाढदिवस असला तर आपण शुभेच्छा देतोच. शहराची प्रथम नागरिक म्हणून मी त्यांचं अभिष्टचिंतन करण्यास गेले. एखाद्या वडिलांनी आपल्या मुलीचं कौतुक करावं तशा पद्धतीने राज्यपाल आणि माझं बोलणं झालं, अशा भावना या भेटीनंतर महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केल्यात. इतकंच नाही तर ‘मला प्रोटोकॉल रोखतो, नाहीतर मलाही तुमच्या घरी यायला, सर्वांना भेटायला आवडलं असतं’, असं राज्यपाल म्हणाल्याचंही महापौरांनी सांगितलं.

मालमत्ता कर वाढीबाबत महापौरांची मोठी घोषणा

मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादणार नसल्याची घोषणाही महापौर पेडणेकर यांनी यावेळी केली. स्थायी समितीसमोर प्रस्तावित असलेली 14 टक्के मालमत्ता करवाढ होणार नाही, असं महौपारांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे मुंबईकरांवर असलेली करवाढीची टांगती तलवार सध्यातरी दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नालेसफाईबाबत मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांचा व्हिडीओ पाहिला. तो प्रशासनाला पाठवला आहे. प्रशासनाला अशा ठेकेदारांवर कारवाई करा, असा आदेश दिल्याचंही महापौरांनी यावेळी सांगितलं. तसंच कुणी खालच्या दर्जाचे आरोप करत असतील तर त्यांना उत्तर देणार नाही, असं महापौर म्हणाल्या.

राज्यपालांना संजय राऊतांकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा काही वेगळ्याच म्हणाव्या लागतील. कारण, संजय राऊत यांनी राज्यपालांना शुभेच्छा देताना विधान परिषदेच्या 12 आमदारांची रखडलेली नियुक्ती करुन महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहन केलंय.

संबंधित बातम्या : 

राज्यपाल कोश्यारींना संजय राऊतांकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 12 आमदारांच्या नियुक्तीचीही आठवण!

शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांची लिंक हिरेन प्रकरणाशी कशी?, वाझेंचा गॉडफादर कलानगरमध्ये आहे काय?; नितेश राणेंचा सवाल

Happy Birthday to Governor Bhagat Singh Koshyari from Mayor Kishori Pednekar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI