महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक

महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक झालाय. ओबीसी समाजाताली तरुणांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं निवासस्थान असलेल्या प्रकाशगड इथं आंदोलन सुरु केलं आहे.

महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 3:09 PM

मुंबई: मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक झालाय. 11 महिन्यांपूर्वी निवड झाली मात्र अद्यापही नियुक्तीपत्र मिळालं नाही. त्यामुळे ओबीसी समाजाताली तरुणांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं निवासस्थान असलेल्या प्रकाशगड इथं आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनीही उपस्थिती लावली.(Youth agitation in OBC community against the Ministry of Energy)

मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत सगळी भरतीप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याचा फटका इतर समाजालाही बसतोय, असं मत शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजातील तरुणांना नोकरी दिली नाही तर राज्यात फिरु देणार नाही. ओबीसीच्या साडे आठ हजार मुलांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत तर त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, असा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे.

परीक्षा दिली, पासही झाले पण ओबीसी समाजातील उमेदवारांना अद्याप नियुक्त्या नाहीत. आंदोलन केल्यानंतर डायरेक्टरने आश्वासन दिलं की नियुक्ती पत्र जारी करु, पण विद्युत सहाय्यकांच्या निर्णय प्रलंबित ठेवला. त्यांचा निकाल का थांबवला, असा सवालही शेंडगे यांनी विचारलाय.

समीर भुजबळांच्या भूमिकेला विरोध

राष्ट्रवादीचे नेते समीर भूजबळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याला ओबीसी नेत्यांचा पाठिंबा नाही. आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही. ओबीसींच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरुच राहणार, असा दावाही शेंडगे यांनी केलाय. सरकार फक्त आश्वासनावर बोळवण करण्यात मग्न आहे. हे थांबलं नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिलाय.

औरंगाबादेतील आंदोलनाचं रुपांतंर आभार मोर्चात!

औरंगाबादमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. माजी खासदार समीर भुजबळ मोर्चात सहभागी झाले. महात्मा फुले पुतळ्यापासून सुरु होणाऱ्या मोर्चासाठी अनेक ओबीसी बांधव उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं आश्वासन सभागृहात दिल्यामुळे आम्ही आजचा ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आभार मोर्चात बदलत आहोत, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

…आणि समीर भुजबळांच्या ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’चं स्वरुप बदललं

Youth agitation in OBC community against the Ministry of Energy

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.