मुंबई विद्यापीठातही राज्यपालांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेचे डावपेच

मुंबई विद्यापीठातही राज्यपालांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेचे डावपेच

कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच विद्यापीठातील विकासकामं देण्याचा प्रस्ताव सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात यावा, अशी युवासेनेच्या सदस्यांची मागणी आहे.

सागर जोशी

|

Jan 25, 2021 | 6:13 PM

मुंबई : शेतकरी आंदोलना दरम्यान मुंबईत उपस्थित नसलेल्या राज्यपालांवर शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे आणि शेतकऱ्यांसाठी नाही, अशी खोचक टीका पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केलीय. तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठातही राज्यपालांची कोंडी करण्यासाठी शिवसेना डावपेच आखत आहे.(Yuvasena’s attempt to trap Governor Bhagat Singh Koshyari)

युवा सेना सिनेट सदस्यांनी कुलगुरुंना निवेदन दिलं आहे. विद्यापीठातील विकासकामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया अनिवार्य करा अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच विकासकामं देण्याचा प्रस्ताव सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात यावा, अशी युवासेनेच्या सदस्यांची मागणी आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत कुलगुरुंनी नुकताच एक प्रस्ताव मांडला होता. राज्यपालांनी IIFCL या कंपनीला विद्यापीठातील विकासकामं देण्याबाबत शिफारस केली होती. राज्यापालांचं हे शिफारसपत्र कुलगुरुंनी परिषद समितीच्या सदस्यांना बैठकीत ऐनवेळी दाखवलं होतं. युवासेनेसह अन्य सदस्यांनीही आक्षेप घेतल्यानं राज्यपालांनी सुचवलेला प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की राज्यपालांवर ओढावली होती. त्यामुळे आता विकासकामांच्या प्रतिक्षेत असलेली मुंबई विद्यापीठ आणि उपकेंद्रांची कामं निविदा प्रक्रिया पार पाडूनच करण्यात यावे, अशी ठाम मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलनात पवार पुन्हा राज्यपालांवर बरसले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बरसले आहेत. सोमवारी अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाच्या माध्यमातूवन हजारो शेतकरी आझाद मैदानावर आले होते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार होतं. पण राज्यपाल आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गोव्याला आहेत. त्यावरुन राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही, असा घणाघात शरद पवार यांनी केलाय.

“राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातील कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येतोय. खरं म्हणजे त्यांनी याला सामोरं जायला हवं होतं. पण त्यांच्यात तेवढी सभ्यता नाही. त्यांनी कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवं होतं. पण तेही धैर्य त्यांनी दाखवलं नाही. मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही,” असंही शरद पवार यांनी राज्यपालांना खडसावलं.

संबंधित बातम्या :

असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

शेतकऱ्यांना राज्यपालांच्या दौऱ्याची पूर्वकल्पना दिली होती; राजभवनाचे स्पष्टीकरण

Yuvasena’s attempt to trap Governor Bhagat Singh Koshyari

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें