मुंब्र्यात पोलिसांच्या मदतीला ड्रोन, बेशिस्त नागरिकांवर करडा पहारा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात (Police watch with drone camera mumbra) आला आहे.

मुंब्र्यात पोलिसांच्या मदतीला ड्रोन, बेशिस्त नागरिकांवर करडा पहारा
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 8:27 PM

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात (Police watch with drone camera mumbra) आला आहे. मुंब्र्यात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस ड्रोनद्वारे करडी नजर ठेवत आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाचा साऊंड सीस्टम असणारा ड्रोन पोलीस उडवणार आहेत. आज (7 एप्रिल) ड्रोन उडवून मुंब्रा पोलिसांनी नागिराकंना घरा बाहेर न पडण्याचे आवाहन (Police watch with drone camera mumbra) केले.

ठाण्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. ठाणे जिल्ह्यात तर कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली आहे. त्यात मुंब्रा सारख्या परिसरातील लोक प्रशासनाचे ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. कारण अनेक वेळा पोलिसांनी लोकांना घरी राहा, अत्यावश्यक सेवेशी निगडित काही काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले. तसेच वेळ पडली तर दंडुकेशाहीचाही उपयोग केला. परंतु मुंब्रामध्ये काही लोक अजूनही सुधारत नाहीत. त्यामुळे आता मुंब्रा पोलिसांनी अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी थेट ड्रोनचा उपयोग केला.

मुब्रा भागातील गल्लीबोळात जी लोक बाहेर येतात किंवा इमारतीच्या गच्चीवर गर्दी करतात, अशा लोकांवर खासकरून नजर ठेवण्यासाठी या ड्रोनचा उपयोग होत आहे. त्यात महत्वाचे म्हणजे या ड्रोनला साऊंड सीस्टम आहे. हा ड्रोन ज्या ठिकणी उडतोय त्या ठिकाणच्या लोकांना सूचना देण्यासाठी या ड्रोनला वॉकीटॉकीद्वारे साऊंड सीस्टम जोडण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी एका वॉकीटॉकीद्वारे व्हिज्युअल पाहून लोकांशी संवाद साधतात आणि हा आवाज एकूण लोक दचकून आपल्या घरात पळतात.

अशा प्रकारचा साऊंड स्यीस्टम असणारा हा ड्रोन पहिल्यांदा पोलिसांकडून उडवण्यात आला आहे आणि याचा उपयोग होताना दिसत आहे. लोकांनाही या ड्रोनची भीती आहे. त्यामुळे ड्रोनची नजर तर आपल्यावर नाही ना या शंकेमुळे लोक घराच्या बाहेर पडताना दिसत नाहीत.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....