AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीच्या लग्नासाठी पै पै जमवणाऱ्या 28 वर्षीय राहुलचा रेल्वे अपघातात मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का

राहुल गुप्ता हा 28 वर्षीय तरुण दररोज मुंब्रा येथून लोकलने प्रवास करुन मुंबईला जायचा. तो मुंबईतील एका स्टेशनरी दुकानात कामाला होता. त्याचा मृत्यू झाला आहे.

बहिणीच्या लग्नासाठी पै पै जमवणाऱ्या 28 वर्षीय राहुलचा रेल्वे अपघातात मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का
Mumbra Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 09, 2025 | 6:13 PM
Share

रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आजची सकाळ ही सर्वात वाईट सकाळ होती. कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून 13 प्रवासी पडले. त्यातील 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 4 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्या प्रवशांमध्ये गरीब कुटुंबातील एकुलता एक कमावणारा राहुल गुप्ता देखील होता. आपल्या लहान बहिणीच्या लग्नासाठी पै पै साठवणाऱ्या भावाने आजच्या दुर्घटनेत जीव गमावला आहे. राहुलच्या निधनाची बातमी ऐकून गुप्ता कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

एकटा कमावणारा मुलगा गेला

राहुल गुप्ता हा 28 वर्षीय तरुण दररोज मुंब्रा येथून लोकलने प्रवास करुन मुंबईला जायचा. तो मुंबईतील एका स्टेशनरी दुकानात कामाला होता. आई, वडील, धाकटी बहिण आणि भाऊ असा त्याचा परिवार आहे. गुप्ता कुटुंबातील राहुल हा एकमेव कमावणारा मुलगा होता. दर महिन्याला मिळणाऱ्या पगारातून तो त्यांचे घर चालत होते. तसेच तो लहान बहिणीच्या लग्नासाठी पै पै जमा करत होता. राहुलच्या मृत्युची बातमी समजल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मित्र मुकेश चौबेसह इतर मित्रांना अश्रू अनावर झाले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे गुप्ता कुटुंबीयांची मदत करण्याची मागणी केली आहे.

वाचा: काका, आय लव्ह यू, तुझ्याशिवाय…; पुतण्यासोबत शारिरीक संबंध, भावाला कळाल्यानंतर.. पोलिसही हादरले

नाईट ड्युडी करुन येणाऱ्या जीआरपी कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी हे दारात लटकत होते. लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले. त्यामुळे दारत असलेले प्रवासी खाली कोसळले आणि आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जीआरपी कर्मचारी विकी बाळासाहेब मुख्यादल यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विकी हे नाईट ड्यूटी करुन घरी परतत होते. दरम्यान, लोकल अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.

लोकल ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशांची माहिती-

  • कळवा रुग्णालयात एकूण दाखल रुग्ण- 10
  • मृत- 5 विकी बाबासाहेब मुख्यादल, राहुल गुप्ता, केतन सरोज, एक अज्ञात
  • गंभीर जखमी- 2 (शिवा गवळी, अनिल मोरे)
  • सिव्हिल रुग्णालयात चार प्रवाशांचा मृत्यू
  • स्नेहा कोंडे, प्रियांका भाटिया, आदेश भोईर, तुषार भगत, मनीष सरोज, मच्छिंद्र गोतराणे, रेहान शेख यांच्यावर उपचार सुरू
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.