व्हायरल फोटोने धमाल, सगळे म्हणतात ‘आमची कमाल’!, वाचा एका व्हायरल फोटोची कथा!

ग्रामपंचायत निवडणूक किंवा सरपंचपदाची निवडणुकीला काही एबी फॉर्म वगैरे नसतो. गावपातळीवर पॅनेल उभे करुन ही निवडणूक होत असते. Murbad Bhuvan sarpanch Viral Photo

व्हायरल फोटोने धमाल, सगळे म्हणतात 'आमची कमाल'!, वाचा एका व्हायरल फोटोची कथा!
Murbad Bhuvan Gram Panchayat

ठाणेग्रामपंचायत निवडणूक किंवा सरपंचपदाची निवडणुकीला काही एबी फॉर्म वगैरे नसतो. गावपातळीवर पॅनेल उभे करुन ही निवडणूक होत असते. मात्र अलीकडच्या काळात निवडणूक पार पडली की अमुक-ग्रामपंचायत आमची, तमुक सरपंच आमचा असे दावे नेतेमंडळी करत आहेत. असाच प्रसंग मुरबाडच्या भुवन ग्रामपंचायतीत पाहायला मिळाला. नवनिर्वाचित सरपंचाने सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांसोबत फोटो काढले आणि दिवसभरात तो फोटो एवढा व्हायरल झाला की सगळ्या नेत्यांनी आव्हाना दावा केला की भुवन ग्रामपंचायतीवर आमचाच झेंडा…! (Murbad Bhuvan sarpanch took a photo with the leaders of all parties, photo Goes on Viral)

नुकत्याच झालेल्या मुरबाड तालुक्यातील नावाजलेल्या भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच- उपसरपंच निवडणुकीत एकमताने दर्शना दौलत बांगर यांची सरपंचपदी तर युवा कार्यकर्ते सुनील बांगर यांची उपसरपंचपदी निवड झाली. नवनिर्वाचित उपसरपंचांचे सर्वपक्षीय संबंध असल्याने नेत्यांसोबत फोटोसेशन झालं. परंतु त्यानंतर सगळेच दावा करायला लागल्यावर मात्र उपसरपंचांना स्पष्टीकरण द्यावं लागलं.

मी महाविकास आघाडीचा…

मी एक शिवसेनेचा कार्येकर्ता आहे. त्यामुळे मी निवडून आल्यावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे सुभाष पवार हे माझे अभिनंदन करण्यासाठी प्रत्यक्ष माझ्याकडे आले. मी महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव हे सुद्धा अभिनंदन करण्यासाठी प्रत्यक्ष माझ्याकडे आले होते. त्यानंतर भाजप आमदार किसन कथोरे यांनाही मी भेटलो. मात्र काही लोकांनी फोटो व्हायरल करत मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे फोटो पसरवले. मात्र मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नसून काही लोकांनी मुद्दामहून फोटो पसरविल्याचा आरोप नवनियुक्त उपसरपंच सुनील बांगर यांनी केला.

भुवन गावचा अधिकाधिक विकास होण्यासाठी व त्यान्वये गटातटाचे राजकारण न करता सर्व गावकऱ्यांना बरोबर घेऊन गावचा विकास करु व ग्रामविकासाच्या विविध योजना राबवू असे निवनिर्वाचित उपसरपंच सुनील बांगर यांनी प्रत्यक्ष टीव्ही 9 शी बोलताना सांगितले.

(Murbad Bhuvan sarpanch took a photo with the leaders of all parties, photo Goes on Viral)

हे ही वाचा :

औरंगाबादेत मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा, भाजप कार्यकर्त्यांची रस्त्यावर जमून घोषणाबाजी

केवळ हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करुन चालणार नाही…., सामना अग्रलेखातून मोदींवर टीका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI