Nagpur Corona Hospital Fire : मृतांचा आकडा वाढता, नितीन राऊतांकडून चौकशीचे आदेश

आग लागल्यानंतर काही काळ रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. (Nagpur Corona Hospital Fire)

Nagpur Corona Hospital Fire : मृतांचा आकडा वाढता, नितीन राऊतांकडून चौकशीचे आदेश
नागपुरातील वेल ट्रीट रुग्णालयात आग

नागपूर : नागपुरातील वेल ट्रीट या कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयातील अग्नितांडवात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर तिथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या घटनेनंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (Nagpur Corona Hospital Fire Nitin Raut order for Inquiry the incident)

नितीन राऊतांकडून चौकशीचे आदेश

नागपुरातील कोरोना रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. याप्रकरणाची संबंधित विभागातर्फे चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच या रुग्णालयातील विद्युत कनेक्शन बरोबर होते की नाही, याचीही चौकशी केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

अनेक रुग्णांना आगीत होरपळावं लागतं ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. यातील एका रुग्णांचा आधीच मृत्यू झाला होता. तर इतर दोघांचा दुसरीकडे शिफ्ट करताना मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काल रात्री अचानक आगीची घटना 

दरम्यान नागपुरात वेल ट्रीट हे एकूण 30 बेडचं रुग्णालय आहे. या रुग्णालयात रात्री साडे दहाच्या दरम्यान अचानक आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार ही आग रुग्णालयातील एसीला लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आग लागल्यानंतर काही काळ रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.

या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. या रुग्णालयातील अग्नितांडवात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त 

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे. नागपुरातील कोरोना रुग्णालयातील अग्नितांडवात मृत्यू झालेल्याप्रती मी दु:ख व्यक्त करतो. मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. तसेच जखमी झालेल्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  (Nagpur Corona Hospital Fire Nitin Raut order for Inquiry the incident)

संबंधित बातम्या : 

Corona Hospital Fire : नागपुरात कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग, तिघांचा मृत्यू!

RSS सरसंघचालक मोहन भागवतांना कोरोनाची लागण, नागपुरातील रुग्णालयात दाखल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI