AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : घरात घुसला, तलवार फिरवली अन्.. भाडकेरूच्या संतापाच्या उद्रेकात पाहुण्या महिलेचा बळी

नागपूरच्या अमरनगर परिसरात एका जुन्या भाडेकरूने घरमालक दांपत्यावर आणि पाहुण्या महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. जुन्या वादातून, त्या रागातून आरोपीने हे कृत्य केले. या हल्ल्यात पाहुण्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून घरमालक दांपत्य गंभीर जखमी झाले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Nagpur Crime : घरात घुसला, तलवार फिरवली अन्.. भाडकेरूच्या संतापाच्या उद्रेकात पाहुण्या महिलेचा बळी
जुन्या भाडेकरूच्या हल्ल्याने नागपूर हाजरलं., महिलेचा हकनाक बळीImage Credit source: TV9
| Updated on: Jul 29, 2026 | 10:15 AM
Share

माणसाचं आयुष्य किती क्षणभंगुर आहे याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येतो. कोणाचा जीव कसा कधी जाईल सांगू शकत नाही. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने तर याची प्रचितीच आली. नागपूरच्या अमरनगर परिसरात जुन्या भाडेकरूच्या संतापाने एका महिलेचा बळी गेला. आरोपीने जुन्हा घरमालाकाच्या घरात घुसून रागाच्या भरात तलवार, चाकूने त्या दांपत्यावर आणि त्याच्या घरात पाहुणी आलेल्या महिलेवर हल्ला केला.  यामध्ये घरमालक दांपत्य जबर जखमी झालं, तर घरात पाहुणी आलेल्या महिलेचा हकनाक बळी गेला. अतिरक्तस्त्रावामुळे संगीत चौधरी यांचा त्या घरात, जागीच मृत्यू झाला. रोशन नीळकंठराव तराळ असे आरोपीचे नाव असून घटनेची माहितची मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत त्याला बेड्या ठोकून अटक केली. तर या दुर्दैवी घटनेत धर्मपाल आणि वनिता डहाट हे जोडपं गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाडेकरूच्या या हल्ल्याने, रक्तरंजित कांडामपळे प्रचंड खळबळ माजली असून तेथील नागरिक तर दहशतीखाली जगत आहेत.

नेमकं काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन नीळकंठराव तराळ हा पूर्वी धर्मपाल डहाट यांच्या घरात भाड्याने राहत होता. तो नेहमी मोठ्या आवजात गाणी लावून ऐकायचा. मात्र याचा इतरांना त्रास व्हायचा. डहाटदांपत्याने त्याला वारंवार समज देऊनही तो ऐकत नव्हता. याचवरून त्यांच्यात वाद झाला, अकेर डहाट यांनी त्याला सोडण्यास, रिकामं करण्यास सांगितलं. जातानाही त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता अशी माहिती मिळत आहे.

तलवार चाकू घेऊन घरात घुसला अन्

याच गोष्टीचा रोशन याच्या मनात राग होता. त्याच रागाच्या भरात तो घटनेच्या दिवशी अमरनगर येथे पुन्हा आला. तलवार चाकू घेऊन तो डहाट यांच्या घरात घुसला. त्याच शस्त्रांनी रोशनने धर्मपाल डहाट, त्यांची पत्नी वनिता डहाट आणि त्या वेळी घरी आलेल्या पाहुण्या संगीता राजू चौधरी यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने तिघांवरही सपासप वार केल्याने परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात संगीता चौधरी यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर धर्मपाल डहाट आणि वनिता डहाट हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संपूर्ण घटनेचे दृश्य घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. फुटेजमध्ये आरोपी हातात शस्त्रे घेऊन घरात प्रवेश करताना आणि हल्ला करतानाची दृश्ये स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्ल्यानंतर पळून गेला नाही, घरातच राहिला बसून

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या हल्ल्यानंतर आरोपी रोशन घरातून पळून गेला नाही, तो तर घरात आतमध्येच शांत बसून राहिला होता. घटनेनंतर जमलेल्या स्थानिक नागरिकांनी त्याला एका खोलीत कोंडून ठेवलं आणि पोलिसांनी याबद्दल तातडीने कळवलं. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी रोशन तराळ याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपीचा हेतू आणि घटनेतील इतर बाबींचा तपास सुरू आहे. या थरारक घटनेमुळे अमरनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक दहशतीखाली आहेत.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप