नागपूर महापालिकेकडून ‘आपली बस’चे हस्तांतरण, नागरिकांना चांगली सुविधा मिळणार?

यानंतर नागरिकांना चांगली सुविधा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (Nagpur Aapli Bus Will Transfer to Metro) 

नागपूर महापालिकेकडून 'आपली बस'चे हस्तांतरण, नागरिकांना चांगली सुविधा मिळणार?
नागपूर आपली बस
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 4:11 PM

नागपूर : नागपूर शहरातील ‘आपली बससेवा’ आता महामेट्रोतर्फे चालवली जाणार आहे. नागपुरातील बससेवा ही महामेट्रोकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावाला परिवहन समितीने मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे सध्या तोट्यात असलेली बससेवा फायद्यात आणणार का? तसेच यानंतर नागरिकांना चांगली सुविधा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (Nagpur Aapli Bus Will Transfer to Metro)

नागपूर महानगरपालिकेच्या शहर बससेवेमध्ये एकूण 438 बसेस आहेत. यात 237 स्टँडर्ड डिझेल बसेस आहेत. तर महिलांसाठी 6 विशेष तेजस्विनी बस, 150 मिडी बसेस आणि 45 मिनी बसेस आहेत. अटी आणि शर्तीसह महामेट्रोला परिवहन सेवा हस्तांतरित करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणाला बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली. संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महासभेपुढे विषय सादर करण्याचे एकमताने परिवहन समितीद्वारे निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार या सर्व बसेस महामेट्रोकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. या सर्व बसेसचे योग्य संचालन करून शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने त्या सुरळीत सुरू राहाव्यात. अशी सूचना परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केली.

संपूर्ण यंत्रणाही मेट्रोकडे हस्तांतरित करणार

या सर्व बसेस हस्तांतरीत करताना त्यासोबत संपूर्ण यंत्रणाही हस्तांतरीत केली जात आहे. यात मनपाचे परिवहन विभागाचे सर्व कर्मचारी आणि संगणक ऑपरेटर्सचाही समावेश असणार आहे. शहर बसचे व्यवस्थित संचालन व्हावे याकरिता महामेट्रोकडे मनपाचे निवडक पदाधिकारी विश्वस्त म्हणून कार्यभार पाहतील, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. मात्र ही सेवा आता कितपत यशस्वी होणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी नागपूर शहरातील सार्वजनिक व्यवस्थेचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी शहरातील मेट्रो आणि शहर बससेवा एकाच संस्थेने संचालित कराव्यात, असे अनेकदा सांगितले होते. त्यामुळे परिवहन विभागानेही नेमका हाच दाखला घेत याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता.

नागपूर मनपाच्या बसची सद्यस्थिती काय?

नागपूर शहरात विविध मार्गांवर धावणाऱ्या 360 लाल आणि आठ इलेक्ट्रिक बस आहे. नागपूर महापालिकेद्वारे आपली बससेवा ऑपरेटरच्या माध्यमातून संचालित करण्यात येते. महापालिकेच्या मालकीच्या 237 सर्वसाधारण आणि सहा इलेक्ट्रिक बस आहेत. तसेच दुसरीकडे आर. के. सिटीबस सर्व्हिसेस, मेसर्स ट्रॅव्हल टाईम बस सर्व्हिसेस आणि मेसर्स हंसा बस सर्व्हिस या तीन ऑपरेटरच्या माध्यमातून चालवण्यात येतात. याद्वारे 150 मिडी आणि 45 मिनीबस चालवण्यात येतात. या ऑपरेटरकडून बसचालक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर युनिटी सीक्युरिटी फोर्स आणि सीक्युरिटी अॅण्ड इन्टेलिजन्स सर्व्हिसेस यांच्यामार्फत वाहक उपलब्ध करून देण्यात येतात.

मनपाच्या जुन्या बसेस भंगारात 

महापालिकेच्या जुन्या 110 बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. या बसच्या विक्रीसाठी निविदा काढण्यात आली होती. 1 कोटी 86 लाखांत पुणे येथील सिद्धार्थ इन्टरप्रायजेस आणि दीपक इन्टरप्रायजेसला या भंगार बस देण्यात आल्या. विशेष म्हणजे या निविदासाठी आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. या समितीने ऑनलाईन निविदा मागितल्या होत्या.  (Nagpur Aapli Bus Will Transfer to Metro)

संबंधित बातम्या : 

विदर्भात मंगलकार्यालयांवर वॉच, कार्यक्रमांना बंदी, सिनेमागृहे बंद होणार; विजय वडेट्टीवार यांचे संकेत

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.