Nagpur Weekend Lockdown | नागपुरात शनिवार-रविवारी विकेंड लॉकडाऊन, नंतर 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन

नागपुरात आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे (Nagpur Weekend Lockdown).

Nagpur Weekend Lockdown | नागपुरात शनिवार-रविवारी विकेंड लॉकडाऊन, नंतर 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन
Lockdown
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 8:48 AM

नागपूर : नागपुरात आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे (Nagpur Weekend Lockdown). तर, सोमवार 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. मात्र, लॉकडाऊनची खरी सुरुवात आज पासूनच सुरु होणार आहे (Nagpur Weekend Lockdown On Saturday And Sunday Due To Increase The Corona Cases).

नागपुरात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात नागपुरात 1,957 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 जणांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, नागरिक आता तरी याला गांभीर्याने घेईल का?, हा प्रश्न आहे.

नागपुरातील लॉकडाऊनला भाजपचा विरोध

भाजपने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. लॉकडाऊन म्हणजे लोकांना वेठीस धरण्याचा उद्योग आहे. लॉकडाऊन करुन काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका भाजपचे माजी महापौर संदीप जोशी यांनी मांडली होती. संदीप जोशी गुरुवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन हा वेडेपणाचा निर्णयआहे. पालकमंत्र्यांनी हेकेखोरपणाने हा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होणार नाही. त्याऐवजी दंडवसुली वाढवून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करता आली असती, असे संदीप जोशी यांनी म्हटले.

एकीकडे भाजप कडून याला विरोध होत आहे. व्यापारी सुद्धा लॉकडाऊन नको, पर्याय शोधा, अशी मागणी करत आहेत. तर, नागपूरच्या महापौरांनी लॉकडाऊन संदर्भात विश्वासात न घेता निर्णय घेण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनवरुन आता पालकमंत्री नितीन राऊत यांना घेरण्याची तयारी होत आहे. लॉकडाऊनवरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये काय सुरु काय बंद?

  • मद्य विक्री बंद
  • डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरु
  • लसीकरण सुरु राहणार
  • खासगी कंपन्या  बंद, सरकार कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु राहणार

नागपूर विभागात 3 लाख 93 हजार डोस पोहचले

नागपूर विभागासाठी काल 3 लाख 93 हजार डोस पोहचले आहेत. यात नागपूरसाठी पावणे दोन लाख कोरोना प्रतिबंधात्मक लस पोहचल्या आहेत. 2 लाख 76 हजार कोव्हिशिल्ड तर 1 लाख 17 हजार हजार 760 कोव्हाक्सिन चा समावेश आहे.

विनामास्क वावर

नागपुरात अनेक जण बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरात निम्मे लोक सर्रास विनामास्क वावरतात. भाजीपाला खरेदीसाठी हजारो लोक एकत्र आले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नागपूर शहरात 14 तारखेपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानुसार शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं, याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले, मात्र रस्त्यावर बिनकामाचे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही.

Nagpur Weekend Lockdown On Saturday And Sunday Due To Increase The Corona Cases

संबंधित बातम्या :

नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर, 21 मार्चपर्यंत कडक निर्बंध

महाराष्ट्राची लॉकडाऊनमध्ये घोडदौड, नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.